खारकच्छ

खारकच्छ[श १], किंवा खाजण[१], म्हणजे समुद्रकिनारा व त्यापासून थोड्या अंतरावर वाळूचे संचयन होऊन निर्माण झालेले वाळूचे दांडे किंवा बांध या दोहोंमधील खाऱ्या पाण्याची पट्टी अथवा सरोवर होय [२].

वाळू, खडे, गाळ यांनी बनलेल्या जमिनीच्या अरुंद बांधामुळे आखाताचे किंवा उपसागराचे मुख बह्वंशी किंवा पूर्णपणे बंद झाले असल्यास जमिनीची पट्टी व मुख्य किनारा यांच्यामधील जलसाठ्यासही खारकच्छ म्हणून उल्लेखले जाते. काहीवेळा किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या राहिलेल्या प्रवाळभित्तींमुळेही खारकच्छे बनतात [२]. खारकच्छला लगून (इंग्रजी), अनूप (संस्कृत), पश्चजल, समुद्रताल, कयाल (मल्याळम) आदि अन्य शब्द आहेत.

Kara-Bogaz Gol from space, September 1995
तुर्कमेनिस्तानाच्या कास्पियन समुद्रालगतच्या किनाऱ्यावरील "काराबोगाझ गोल" नावाच्या खारकच्छाचे विहंगम दृश्य

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ खारकच्छ (इंग्लिश: Lagoon, लगून). अन्य नावे : खाजण, कायल

संदर्भ व नोंदी

  1. ^ कुलकर्णी, एल.के. (इ.स. २००९). भूगोलकोश (मराठी मजकूर). राजहंस प्रकाशन. आय.एस.बी.एन. ९७८-८१-७४३४-४४४-१ Check |isbn= value (सहाय्य).
  2. a b कुमठेकर,ज.ब. खारकच्छ (मराठी विश्वकोशातील नोंद) (मराठी मजकूर). महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई. १८ नोव्हेंबर, इ.स. २०१२ रोजी पाहिले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.