कोबी

पानकोबी , पत्ताकोबी (वनस्पतीशास्त्रीय नाव : Brassica oleracea Linne ; कुळ: Brassicaceae ; इंग्लिश: Cabbage (कॅबेज) ; हिंदी: बंद गोभी ;) ही एक फळभाजी आहे. पांढरट हिरव्या रंगाची फळासारखी दिसणारी ही फळभाजी बहुसंख्य पानांचा एक गुच्छ आहे.

Cabbage (PSF)
पानकोबी
Cabbage Estonia
पानकोबी
अमेरिका फुटबॉल संघ

अमेरिका फुटबॉल संघ (इंग्लिश: United States men's national soccer team) हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. अमेरिका आजवर १२ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

कोबी स्मल्डर्स

जॅकोबा फ्रांसिस्का मरिया कोबी स्मल्डर्स (३ एप्रिल, १९८२:व्हँकूवर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - ) ही केनेडियन-अमेरिकन चित्रपट अभिनेत्री आहे.

हीने हाउ आय मेट युअर मदर या दूरचित्रवाणीमालिकेत रॉबिन शर्बात्स्कीची भूमिका केली होती. स्मल्डर्सने मार्व्हेल कॉमिक्सवर आधारित चित्रपटांतून मरिया हिलच्या भूमिका केल्या आहेत. याशिवाय तिने पंधरा चित्रपट आणि तितक्याच दूरचित्रवाणीमालिकांतूनही अभिनय केला आहे.

गुराखी साहित्य संमेलन

गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील कंधार येथील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते

पोतराज, तमाशा कलावंत, वाघ्या-मुरळी, वारू, अस्वलवाले, माकडवाले, पांगूळ, चुडबुडकेवाले, राईंदर, देवकरीणमाता,

देवकर (तृतीयपंथी), मनकवडे, बहुरूपी, नंदीबैलवाले, वराहपालक, मसणजोगी, नाथगोसावी, फकीर, वासुदेव, कोळी, वैदू,

गोंदणवाल्या बाया, जाते उपटणार्‍या माउल्या, बाळ सतूष म्हणणार्‍या माया, खेळवाले, दशावतारी अशा अनेक भटक्या-उपेक्षितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, त्यांची कला, त्यांची व्यथा, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गुराखी संमेलनाला सुरुवात झाली.

‘नाहीरे’ वर्गातल्या उपेक्षित दलित-पददलित, अस्पृश्य म्हणून फेटाळलेल्या, विटाळलेल्या, बहिष्कृत, मायमाउल्यांच्या कष्टाच्या रक्त-घामातून हे गुराखी साहित्य जन्माला येते.. कुठलाही भपकेबाजपणा, जाहिरातबाजी न करता उत्स्फूर्तपणे हे साहित्य निसर्गाशी एकरूप होत जन्म घेते.

पशुपतीनाथ, पशुसंवर्धक, पशुपालक असा गुराखी राजा आजही वनवासी जीवन जगतो. त्याला ना ज्ञानाचा हक्क, ना क्षमतेचा अधिकार, ना धर्माचा संचय, ना विद्येचा टिळा, ना समतेची माळ गळ्यात. वर्णाश्रमी उतरंडीत अडकलेले जीवन घेऊन गुरेढोरे राखण्याचा त्याचा जन्मसिद्ध अधिकार बालकामगार कायद्याने गुन्हा ठरला; पण तो कायदा अजूनही बाल

गुराख्याला लागू नाही. सक्तीचे शिक्षण वार्‍यावर सोडून जन्मताच तो निरक्षरतेच्या कुडीतून जगात येतो, अक्षरशत्रू म्हणून जगतो. त्याच्या सुख-दुःखाचा विचार कोणी करत नाही. या वेदनेला गुराखी गडावर मोकळी वाट करून दिली जाते.

चटाळे

चटाळे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातले गाव आहे.

गुणक: 19.57°N 72.75°E / 19.57; 72.75

चहाडे

चहाडे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.

टोमॅटोची कोशिंबीर

टोमॅटो जगात अनेक ठिकाणी कच्चा खाण्यात वापरला जातो. हा पूर्ण पिकल्यावरही कोशिंबीरीत खाल्ला जातो आणि कच्चा असतानाही खाल्ला जातो. दोन्ही कृतीत याची चव निराळी असते.

निमगाव सावा

साचा:माहितीचौकट भारतीय गाव

निमगाव सावा हे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाततल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला दक्षिण-वाहिनी कुकडी नदीच्या तीरी वसलेले एक शेतीप्रधान गाव आहे. चांगले रस्ते, वीज, पाणी आदी सोयी असल्याने निमगाव सावा हे विकासाचे एक 'मॉडेल व्हिलेज' म्हणून ओळखले जाते.

निमगाव सावाच्या पूर्वेला पारगाव तर्फे आळे हे गाव, दक्षिणेला औरंगपूर व भागडोबा (सुळक्या) डोंगर व वळती आंबेगाव तालुका, पश्चिमेला सुलतानपूर-शिरोली, उत्तरेला कुकडी नदी आहे.

गावात पश्चिमेला गाडगे मळा बागवाडी, शिवमळा, पाईनमळा, खराडी, बोऱ्हाडेमळा, गोकुळमळा, गहिणेमळा, मतेमळा, खरसड व मंचररोड, दक्षिणेला घोडेमळा रामवाडी, ठिके, खाडेमळा, शेकेमळा, खामगाव हे पुनर्वसित गाव व कॉलेजवस्ती, पूर्वेला पटाडी,कारवाडी भालेरावमळा, जावळेवस्ती, कारवस्ती, मिरावस्ती, पाचपडाळ, कारफाटा वस्ती], मध्यवर्ती [गावठाण] आदी ठिकाणे आहेत.

निमगाव सावा हे एक जुन्नर तालुक्याच्या पूर्वेला असून मध्यवर्ती बाजारपेठेचे गाव आहे. गावात शासकीय कार्यालये, सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक/पतसंस्था, शाळा/महाविद्यालय, लघु उद्योग व पेट्रोल पंप आदी गोष्टी आहेत.

इ.स. २०११च्या खानेसुमारीनुसार गावची लोकसंख्या ५१००पेक्षा जास्त आहे . सन २००१मध्ये ती ४८०० होती.

शैक्षणिक संस्था : निमगाव सावा ह्या गावात आठ आंगणवाड्या, एक पूर्व प्राथमिक, दोन प्राथमिक, एक माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक शाळा, एक महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांसाठी एक वसतीगृह आहे.

वैद्यकीय स्थिती- प्राथमिक आरोग्य केंद्र-१, खासगी दवाखाना-४

अर्थ स्थिती- बँक-१, पतसंस्था-५

सामाजिक स्थिती- मुख्यत्वे करुन हिंदु, मुस्लिम व बौद्ध इ.

ऊस, कांदा, कोबी, फ्लॉवर, टॉमेटो, गहू, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मूग व अन्य कडधान्ये ही पिके, आंबा, केळी, डाळिंब, चिकू, सिताफळ, नारळ ही फळे, फळभाज्या, भाजीपाला व फुले अशी विविध प्रकारची शेती निमगाव सावामध्ये केली जाते.

गावात पडणाऱ्या पावसाचे स्वरूप मध्यम संततधार व जोरदार पडणारा पाऊस असे आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे ह्या गावाचा परिसर बिबट्याप्रणव क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे.

भैरवनाथ मंदिर, पाबळ

पाबळ या गावात पाच मंदिरे आहेत त्यापैकी गावाचे ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ मंदिर आहे. गावाची यात्रा माघ पौर्णिमेला भरते. परंपरेने चालत आलेले व यात्रेचे मुख्य आकर्षण ठरलेली बैलांची शर्यत (गाडे) सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बंद करण्यात आले आहेत. गावकर्यांच्या मनोरंजनासाठी यात्रेच्या दिवशी संध्याकाळी महाराष्ट्राची लोककला लावणी नृत्य (तमाशा) असतो,महिला, तरुण वर्ग, बालके यांच्यासाठी कृत्रिम दागिने, खेळणी, झोके, खाद्य पदार्थ (गुडी शेव- रेवडी वैशिष्ट्य) इ. गोष्टींने यात्रेच्या दिवशी एक वेगळीच शान येते.गावात प्रवेश करताना वेशिलगत हनुमानच व शंकराचे मंदिर आहे. वेशीतून आत आल्यावर सय्यद बाबाची मशीद आहे.दोन तीन दुकाने सोडूनच भव्य असे जैन मंदिर आहे.येथे देशभरातुन लोक दर्शनासाठी येतात.

प्रत्येक शुक्रवारी पाबळ येथे मोठा बाजार भरतो.बाजारामध्ये छोटे-छोटे व्यापारी,वांगी,वाटाणा,मेथी,कोबी,बटाटा,गाजर,कांदे,कोथिंबीर,भेंडी,या प्रकारच्या,पालेभाज्या घेऊन येतात. तसेच मटकी,हुलगा,चावली,मसूर,हरभरा,मुग हि कडधान्ये घेऊन येतात.अशा प्रकारे एकूणच बाजारामध्ये भव्य अशी गर्दी असते.गावात सर्व सण उस्ताहाणे साजरे केले जातात.इतकेच नव्हे तर गावात स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिन तितक्याच जल्लोषाने साजरे केले जातात.गावातून खूप मोठी प्रभात फेरी काढली जाते.शिरूर तालुक्यातील सर्वात मोठा घाट म्हणून पाबळचा घाट ओळखला जातो.परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या गाडे बंद करण्यात आले आहे. पाबळच्या यात्रेची एक वेगळीच शान असते.बाहेरगावी गेलेल्या लोकांना परत आपल्या गावी येण्याचे हे एक उत्तम माध्यम आहे.या यात्रेत एक वेगळीच मजा येते.

पाबळ गावाला एकूण १२ वाड्या आहेत.

व्हेज मन्चुरिअन

व्हेज मन्चुरिएन ही चायनीज पदार्थ आहे.

रेसिपी-

साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची

कृती-

शब्द सिध्दी

शब्द सिध्दी (Shabd siddhi)

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार :

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात.

शब्दांचे खालील प्रकार पडतात:

1. तत्सम शब्द

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द असे म्हणतात.

उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश, पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध

2. तदभव शब्द

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना तदभव शब्द असे म्हणतात.

उदा. घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय

3. देशी/देशीज शब्द

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्याध शब्दांना देशी शब्द असे म्हणतात.

उदा. झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार लाकूड ओटी वेडा अबोला लूट अंघोळ उडी शेतकरी आजार रोग ओढा चोर वारकरी मळकट धड ओटा डोंगर

परभाषीय शब्द

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना परभाषीय शब्द असे म्हणतात.

1. तुर्की शब्द

उदा. कलगी, बंदूक, कजाग

2. इंग्रजी शब्द

उदा. डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.

3. पोर्तुगीज शब्द

उदा. बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस,

4. फारशी शब्द

उदा. रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना, हप्ता.

5. अरबी शब्द

उदा. अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल

6. कानडी शब्द

उदा. हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे

7. गुजराती शब्द

उदा. सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट

8. हिन्दी शब्द

उदा. बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली

9. तेलगू शब्द

उदा. ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी

10. तामिळ शब्द

उदा. चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा

सिद्ध व सधीत शब्द

1. सिद्ध शब्द

भाषेत जे शब्द मुळात धातू असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.

उदा. ये, जा, खा, पी, बस, उठ, कर, गा इत्यादी.

सिद्ध शब्दांचे तीन प्रकार पडतात.

1. तत्सम 2. तदभव 3. देशी

2. सधीत शब्द

सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून साधित शब्द तयार होतो.

साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात

अ) उपसर्गघटित ब) प्रत्ययघटित क) अभ्यस्त ड) सामासिक

अ) उपसर्गघटित शब्द

शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात. तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

उदा. अनुभव, अपयश, अधिकार, अवगुण अधिपती, उपहार, आकार, साकार, प्रतिकार, प्रकार इ.

वरील शब्दांमध्ये अनु. अप, अधि, अव, अधि, उप, आ, सा, प्रति,प्रइ. उपसर्ग लागलेली आपल्याला दिसतात. असे उपसर्ग लागून तयार होणार्याि शब्दांना उपसर्ग घटित शब्द असे म्हणतात.

ब) प्रत्ययघटित शब्द

धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

उदा. जनन, जनक, जननी, जनता इ.

वरील शब्दांना न,क, नी ता ही प्रत्यय लागलेली आपल्याला दिसतात असे प्रत्यय लावून तयार होणार्याा शब्दांना प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात.

क) अभ्यस्त शब्द

एखाधा शब्दांत एका शब्दाची अथवा काही अक्षरांनी पुनरावृत्ती झालेली असते. अशा शब्दांना अभ्यस्त शब्द असे म्हणतात. अभ्यसतचा अर्थ दुप्पट करणे असा होतो.

उदा. आतल्या आत, शेजरीपाजारी, किरकिर इ.

अभ्यस्त शब्दांचे खालील तीन प्रकार पडतात.

1. पूर्णाभ्यस्त 2. अंशाभ्यस्त 3. अनुकरणवाचक

1. पूर्णाभ्यास शब्द

एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येऊन जोडशब्द तयार होतो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. बारीक बारीक, कळाकाळा, आतल्या आत, हळहळ, वटवट, कळकळ, मळमळ, बडबड, समोरासमोर, हळूहळू, पुढेपुढे, पैसाच पैसा, मजाच मजा, हिरवेहिरवे इ.

2. अंशाभ्यस्त शब्द

जेव्हा पूर्ण शब्द हा जोडशब्दात जशाच्या तसा पुन्हा येतो एखादे अक्षर बदलून येतो तेव्हा त्या जोडशब्दांना अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात.

उदा. अदलाबदल, उलटसुलटा, शेजारीपाजारी, बारीकसारीक, लाडीगोडी, सोक्षमोक्ष, जिकडेतिकडे, गोडधोड, गडबड, जाळपोळ, दगडबिगड, किडूकमिडूक, घरबीर इ.

3. अनुकरणवाचक शब्द

ज्या शब्दांमध्ये एखाधा ध्वनिवाचक शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते, अशा शब्दांना अनुकरणवाचक/नादानुकारी शब्द असे म्हणतात.

उदा. किरकिर, खडखडाट, रिमझिम, गुणगुण, घणघण, कडकडाट, टिकटिक, गडगड इ.

ड) सामासिक शब्द

जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकमेकांमधील परस्पर संबंधामुळे एकत्र येऊन तयार होणार्याध शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात.

उदा. पोळपाट, देवघर, दारोदार इ.

टीप: अगदी उपयुक्त माहिती आहे आपल्या मित्राला नक्की पाठवा .

हाऊ आय मेट यॉर मदर

हाऊ आय मेट यॉर मदर ही एक विनोदी इंग्लिश दूरचित्रवाणी मालिका आहे.या मालिकेत टेड मोझबी नावाचे पात्र आपल्या मुलांना स्वतः आणि त्यांच्या आईची भेट कशी घडली याची गोष्ट सांगत आहे. आत्तापर्यंत या मालिकेचे ७ हंगाम झाले आहेत. यात टेडला त्याच्या ६ घनिष्ट मित्रांनी या भेटीसाठी कशी मदत केली हे दाखवलेले केले आहे.

हाफ मून आम्लेट

हाफ मून ऑम्लेट हे अंड्यांपासून तयार केलेला खाद्यपदार्थ आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.