कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग


लष्करी यांत्रिकी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (College of Military Engineering) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. कॉलेजचा परिसर मुळा नदीच्या काठावर ३,६०० एकर (१५ चौ. किमी) क्षेत्रावर पसरला असून येथे केवळ लष्करी अधिकार्‍यांना व व लष्करातील नागरी कर्मचार्‍यांना प्रवेश मिळतो.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग
सी.एम.ई.
स्थापना इ.स. १९४३
विद्यार्थी ५५०
स्थान दापोडी, पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत
18°21′14″N 73°30′05″E / 18.354°N 73.5014°E
आसाम रेजिमेंट

आसाम रेजिमेंट तथा असम रेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती.

पुणे

हा लेख पुणे शहराविषयी आहे. पुणे शहर तालुक्याच्या माहितीसाठी येथे स्पर्श करा.

गुणक: 18.53°N 73.85°E / 18.53; 73.85

पुणे (इंग्रजी :Pune) उच्चार , हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे असे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या पुणं या नावाचे Poona हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. शहरात पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर असून महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.. समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले आहे. पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी' म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे शहरात असलेल्या नामांकित शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. पुणे शहर उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे. मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

पुण्यामध्ये ऐतिहासिकः- लाल महाल, तुळशी बाग, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे सर्वांनी भेट द्यावीत अशी आहेत. ही सर्व ठिकाणे ऐतिहासिक व पर्यटन स्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत.

पुणे शहर आणि परिसरात पाच नद्या आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.