कॅथलिक धर्म

कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे. याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरु असतात.

कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिललॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.

कॅथलिक चर्च

कॅथलिक चर्च किंवा रोमन कॅथलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन चर्च (प्रार्थनाघर) आहे. जगातील सुमारे १ अब्ज लोक कॅथलिक चर्चचे अनुयायी आहेत. पोप हा कॅथलिक चर्चचा सर्वोच्च नेता आहे.

फिलिपाईन्समधील धर्म

फिलिपाईन्स हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. या देशात किमान ९२% लोक ख्रिश्चन धर्मीय आहेत. पैकी ८१% रोमन कॅथोलिक व ११% प्रोटेस्टंट, ऑर्थोडॉक्स व रेस्टोरिस्टिस्ट आणि बाकीचे लोक इग्लेसिया फिलिपिना इंडिपीएन्टें, इग्लेसिया नि क्रिस्टो, सेव्हेंथ-डे ॲडवेंटिस्ट चर्च, फिलीपीन्स आणि इव्हेंजेनिकल मधील युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट इत्यादी स्वतंत्र कॅथोलिक संप्रदायाचे आहेत. अधिकृतपणे, फिलीपाईन्स हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यांच्या राज्यघटनेने चर्च आणि राज्यकारभार विभक्त करण्याची हमी दिली आहे, त्यामुळे सरकारला सर्व धर्मांचा समान आदर करावा लागतो.

राष्ट्रीय धार्मिक सर्वेक्षणानुसार, फिलिपाईन्समध्ये एकूण लोकसंख्येच्या ५.६% लोक मुसलमान असून, इस्लामला देशाचा दुसरा सर्वात मोठ्या धर्माचा दर्जा मिळाला आहे. २०१२ च्या राष्ट्रीय मुस्लिम फिलिपीनो आयोगाच्या (एनसीएमएफ) अंदाजानुसार, देशात १ कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के लोक मुसलमान होते. बहुतेक मुसलमान मिंदानाओ, पालवान आणि सुलू द्वीपसमूहांच्या काही भागात राहतात - बंगास्मारो किंवा मोरो क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे हे क्षेत्र आहे. काही मुसलमान देशातील शहरी आणि ग्रामीण भागात स्थलांतरित झाले आहेत. बहुतेक मुस्लिम फिलिपिनो सुन्नी इस्लामचे पालन करतात. देशात काही अहमदिया मुसलमानसुद्धा आहेत.ख्रिश्चन आणि मुसलमानांव्यतिरिक्त देशात २% लोक बौद्ध, शीख, हिंदू, यहूदी, बहाई, आदिवासी गट किंवा कॅथोलिक/ख्रिश्चन किंवा इस्लामिक धर्मांपासून पारंपरिक धर्मांत परतलेले लोक आहेत. शिवाय १०% पेक्षा जास्त लोक निधर्मी आहेत.

मारियाचे स्वर्गारोहण

ख्रिश्चन मान्यतेनुसार मारियाचे स्वर्गारोहण हे येशू ख्रिस्तांची आई मारिया हिचे पृथ्वीवरील जीवन संपवून सदेह स्वर्गात जाण्याची घटना होय.

ही घटना दर वर्षी १५ ऑगस्टला साजरी केली जाते. अनेक देशांत यादिवशी सुट्टी असते.

माल्टा

माल्टाचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Malta; माल्टी: Repubblika ta' Malta) हा दक्षिण युरोपातील एक छोटा द्वीप-देश आहे. माल्टा भूमध्य समुद्रामधील एका द्वीपसमूहावर वसला असून तो इटलीच्या सिसिलीच्या ८० किमी (५० मैल) दक्षिणेस, ट्युनिसियाच्या २८४ किमी (१७६ मैल) पूर्वेस, व लिबियाच्या ३३३ किमी (२०७ मैल) उत्तरेस स्थित आहे. माल्टाचे क्षेत्रफळ केवळ ३१६ चौ. किमी (१२२ चौ. मैल), तर लोकसंख्या सुमारे ४.५ लाख असून माल्टा जगातील सर्वात लहान व सर्वात घनदाट लोकवस्तीच्या देशांपैकी एक आहे.व्हॅलेटा ही माल्टाची राजधानी असून ती युरोपियन संघामधील सर्वात लहान राष्ट्रीय राजधानी आहे. माल्टी व इंग्लिश ह्या दोन माल्टामधील राजकीय भाषा आहेत.

माल्टा युरोपियन संघाच सदस्य असून यूरो हे येथील अधिकृत चलन आहे. माल्टाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने येथील पर्यटनावर अवलंबून आहे

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.