ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड तथा नॉर्मंडीची लढाई दुसऱ्या महायुद्धादरम्यानची निर्णायक मोहीम होती. ६ जून, इ.स. १९४४ रोजी दोस्त राष्ट्रांनी केलेल्या नॉर्मंडीवरील चढाईने सुरू झालेली ही मोहीम ३० जून रोजी जर्मन सैन्याने सीन नदीपल्याड माघार घेतल्यावर संपली. या मोहीमेच्या अंतर्गत दोस्त राष्ट्रांनी युरोपमध्ये आपले सैन्य कायमचे घुसवले व त्याद्वारे येथून पुढे जर्मनीचा पूर्ण पाडाव केला.

६ जूनच्या पहाटे दोस्त राष्ट्रांच्या १,२०० विमानांनी हजारो सैनिक फ्रांसमध्ये उतरवले व सकाळी ५,००० नौकां नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर चालून गेल्या. एका दिवसात १,६०,००० सैनिक नॉर्मंडीत उतरले व किनाऱ्यावरील अनेक ठिकाणची तटबंदी त्यांनी उद्ध्वस्त केली. अमेरिकन सैन्य युटा बीच, ओमाहा बीच, ब्रिटिश सैन्य स्वोर्ड बीच, गोल्ड बीच तर कॅनडाचे सैन्य जुनो बीच या पुळणींवर उतरले. सुरुवातीच्या या हल्ल्यात यानंतर दोस्तांनी ऑगस्टअखेरपर्यंत नॉर्मंडीतून २०,००,००० सैनिक युरोपमध्ये घुसवले.

ही मोहीम चालविण्याचा निर्णय दोस्त राष्ट्रांनी मे १९४३मध्ये झालेल्या ट्रायडेंट कॉन्फरन्समध्ये घेतला होता. त्याच वेळी अमेरिकेच्या ड्वाइट डी. आयझेनहोवर यांची मोहीमेचे सरसेनापती तर युनायटेड किंग्डमच्या बर्नार्ड माँटगोमरी यांची नेमणूक आक्रमक सैन्याच्या सेनापतीपदी करण्यात आली.

ही मोहीम फत्ते करण्यासाठी दोस्तांनी अनेक नवीन तंत्रज्ञाने विकसित केली. जर्मनीची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ऑपरेशन बॉडीगार्ड ही मोहीम चालवली. याने जर्मनीला युरोपवरील आक्रमणाचे ठिकाण व काळवेळ बिलकुल कळले नाही.

अटलांटिक तटबंदी

अटलांटिक तटबंदी तथा अटलांटिक भिंत ही नाझी जर्मनीने पश्चिम युरोप व स्कँडिनेव्हियाच्या किनाऱ्यावर बांधलेली तटबंदी होती. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ही भिंत १९४२ आणि १९४४ दरम्यान बांधली गेली. दहा लाखांपेक्षा फ्रेंच आणि इतर असंख्य कामगारांकडून वेठबिगारी करवून घेउन बांधण्यात आलेल्या या तटबंदीचा उल्लेख नाझी जर्मनी आपल्या जाहीरातबाजीत आवर्जून करे व ही बलाढ्य असल्याचा दावा करीत असे. वस्तुतः ऑपरेशन ओव्हरलॉर्ड व दोस्तांच्या इतर आक्रमक चढायांदरम्यान ही तटबंदी काही तास किंवा दिवसांपेक्षा अधिक तग धरू शकली नाही.

युद्ध संपल्यावर या तटबंदीची रया गेली व हिचा मोठा भाग ठिकठिकाणी समुद्रात कोसळला आहे तर उर्वरित भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.

ओमाहा बीच

ओमाहा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी एक असलेला हा प्रदेश ८ किमी लांबीची मोठी पुळण आहे.

६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर त्यांना पुढे सरकणे कठीण झाले. युटा बीच आणि गोल्ड बीच यांमधील कडी असलेल्या ओमाहा बीचवरील सैन्याने मोठी जीवितहानी पत्करत त्या दिवशी संध्याकाळपर्यंत दोन छोटी जर्मन ठाणी हस्तगत केली व नंतरच्या दिवसांत एकएक करीत अधिक बलाढ्य ठाणी उद्ध्वस्त करीत ते आत घुसले.

नोव्हेंबर ३०

नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३४ वा किंवा लीप वर्षात ३३५ वा दिवस असतो.

युटा बीच

युटा बीच हे दुसऱ्या महायुद्धातील ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेतील एक रणांगणास दिलेले सांकेतिक नाव आहे. फ्रांसच्या नॉर्मंडीच्या किनाऱ्यावरील कोटेंटिन द्वीपकल्पावरील पाच रणांगणांपैकी सगळ्यात पश्चिमेकडे असलेला हा प्रदेश दूव्ह आणि व्हिरे नद्यांच्या पश्चिमेस असलेली मोठी पुळण आहे.

६ जून, इ.स. १९४४ रोजी अमेरिकन सैन्य येथे मोठ्या संख्येने उतरले व तेथील तटबंदीवर हल्ला करीत पुळण हस्तगत केली. त्यानंतर हजारो इतर सैनिक येथून शेरबोर्ग आणि फ्रांसच्या इतर भागांतून घुसले.

शेरबोर्ग-ऑक्टेव्हिल

शेरबोर्ग-ऑक्टेव्हिल हे फ्रांसच्या मांच प्रभागातील एक शहर आहे. कोटेंटिन द्वीपकल्पाच्या उत्तर टोकास वसलेले हे शहर दुसऱ्या महायुद्धादरम्यान झालेल्या ऑपरेशन ओव्हरलॉर्ड या मोहीमेचे पहिले लक्ष्य होते.

येथील बंदर अनेक शतके व्यूहात्मक महत्वाचे होते.

हुआन पुहोल गार्सिया

हुआन पुयोल गार्सिया (Spanish: Juan Pujol García), (१४ फेब्रुवारी, इ.स. १९१२ - १० ऑक्टोबर, इ.स. १९८८) हा एक, एकाच वेळी परस्पर विरोधी पक्षांकरता हेरगिरी करणारा गुप्तहेर होता.

हुआन पुयोल गार्सियाने दुहेरी हेरगिरीचे (डबल एजंट) काम जाणीवपूर्वक पत्करले. त्याचे ब्रिटिश टोपणनाव (संकेताक्षर) गार्बो तर जर्मन संकेतनाव अराबेल होते. दोन्ही राष्ट्रांच्या गुप्तहेरसंस्थांना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी पुरस्कारही मिळाले होते. ब्रिटिशांकडून मोस्ट एक्सेलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा पुरस्कार दिला तर जर्मनांकडून त्याला आयर्न क्रॉस पुरस्कार दिला गेला.

दुसऱ्या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झालेल्या, स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट आणि फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर जुआन पुजोल गार्स्या नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली. पुयोल व त्याच्या पत्नीला ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मानता, त्या काळात हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येऊ लागलेला असताना, कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत व सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला.

जर्मन हेर झाल्यानंतर त्यास ब्रिटनला जाऊन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथे गेला. तिथून प्रत्यक्षात थापा असलेले काही बनावट रिपोर्ट त्याने पाठविले . असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहीच, उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह बनला. मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्व पूर्णतः त्याच्या कल्पनेतले होते. ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे, उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकाळात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले.

पुयोलची मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे. पुयोलने मुद्दाम दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे जर्मन पास दे कॅले इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच, पास दे कॅले मध्ये अडकवून ठेवल्या.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.