एप्रिल १८

एप्रिल १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०८ वा किंवा लीप वर्षात १०९ वा दिवस असतो.

<< एप्रिल २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी

अकरावे शतक

चौदावे शतक

 • १३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.

सोळावे शतक

अठरावे शतक

 • १७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.
 • १७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.

एकोणिसावे शतक

 • १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली.
 • १८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
 • १८८० - मार्शफील्ड, मिसूरी येथे एफ.४ टोर्नेडो. ९९ ठार, २०० जखमी.
 • १८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.

विसावे शतक

एकविसावे शतक

 • २००१: भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक GSLV- D1 वाहकाचे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण झाले.
 • २००७ - क्विंघे स्पेशल स्टील कॉर्पोरेशन दुर्घटनेत ३२ चिनी कामगार होरपळून मृत्युमुखी.

जन्म

मृत्यू

 • १८५९: स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे
 • १८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा.
 • १९४३ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.
 • १९४५: व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग
 • १९५५ - अल्बर्ट आइनस्टाइन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
 • १९६६: जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी ’योगमीमांसा’ नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे ७ खंड प्रकाशित झाले आहेत.
 • १९७२: विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न डॉ. पांडुरंग वामन काणे
 • १९९५: पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते
 • १९९९: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघुवीर सिंह
 • २००२ - थॉर हायरडाल, नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
 • २००२: महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष शरद दिघे
 • २००४ - रतु सर कामिसेसे मारा, फिजीचा प्रथम पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष.

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

एप्रिल १६ - एप्रिल १७ - एप्रिल १८ - एप्रिल १९ - एप्रिल २० - (एप्रिल महिना)

अॅल्बर्ट आइन्स्टाइन

अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन (इंग्रजी: Albert Einstein ;) (मार्च 14, इ.स. १८७९ - एप्रिल १८, इ.स. १९५५) हे एक सैद्धान्तिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सार्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षतावादाचा सिद्धान्त, (विशेष सिद्धान्त, सामान्य सिद्धान्त), प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि "त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी" इ.स. १९२१ साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन "सन्मानित" केले गेले. आइन्स्टाइन यांना त्यांच्या सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर जगभर प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून ओळखले जाऊ लागले. आइन्स्टाइन यांनी "अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन" ची व्यापारचिन्ह म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्याची इतकी प्रसिद्धी असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाइन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. त्यांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी आइन्स्टाइन यांनी विचार केला की, ही विद्युत चुंबकीय नियमांसोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमांशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धान्ताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की, सापेक्षतेचे तत्त्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी १९१६ साली त्यांच्या अनुबर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धान्तावरून सामान्य सापेक्षता सिद्धान्तावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकीय यांत्रिकी आणि पुंजयांत्रिकी सिद्धान्त यांच्या समस्यांची उकल करण्यायास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या आण्विक सिद्धांत आणि रेण्विक गती या संबंधित सिद्धान्त स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशकणांचा सिद्धान्त मांडता आला. १९१७ साली, आईन्स्टाइन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धान्ताच्या स्पष्टीकरणासाठी एका भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली.आईन्स्टाईन यांनी १९३३ साली अमेरिकेला भेट दिली होती तेव्हा जर्मनीत ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला आणि त्यामुळे आइन्स्टाइन यांनी ते पूर्वी जिथे प्राध्यापक होते त्या प्रशियन विज्ञान महाविद्यालय।बर्लिन विज्ञान अकादमी येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. १९४० मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले.

दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला, आइन्स्टाइन यांनी अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले होते की, रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब यांची निर्मिती थांबवावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने मॅनहॅटन प्रकल्प उभारला. आइन्स्टाइन यांचा सैन्याच्या संरक्षण-धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या अणुकेंद्राचे विभाजन या तत्त्वावर चालणार्‍या शस्त्रांचा निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाइन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्याशी संपर्क साधून रसेल-आइन्स्टाइन जाहीरनामा यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रांचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाइन हे अमेरिकेतील प्रिन्स्टन,न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या शिक्षण संस्थेशी शेवटपर्यंत संलग्न राहिले. इ.स.१९५५ साली आइन्स्टाइन यांचे निधन झाले.

आइन्स्टाइन यांनी सबंध आयुष्यात एकूण ३०० वैज्ञानिक शोधनिबंध आणि १५० गैरवैज्ञानिक निबंध प्रकाशित केले आहेत. त्यांच्या अनेक महान बौद्धिक कामगिऱ्या आणि त्यांची विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाइन हा शब्द वापरला जाऊ लागला.

एप्रिल १६

एप्रिल १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०६ वा किंवा लीप वर्षात १०७ वा दिवस असतो.

एप्रिल १७

एप्रिल १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०७ वा किंवा लीप वर्षात १०८ वा दिवस असतो.

एप्रिल १९

एप्रिल १९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११० वा किंवा लीप वर्षात १११ वा दिवस असतो.

झिंबाब्वे

झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतील एक देश आहे. झिंबाब्वेच्या उत्तरेला झाम्बिया, पूर्वेला मोझांबिक, दक्षिणेला दक्षिण आफ्रिका व पश्चिमेला बोत्स्वाना हे देश आहेत.

तात्या टोपे

रामचंद्र पांडुरंग टोपे ऊर्फ तात्या टोपे (१८१४ - एप्रिल १८, १८५९) हे १८५७ च्या उठावामधील सेनानी होते.

धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे (एप्रिल १८, इ.स. १८५८ - नोव्हेंबर ९, इ.स. १९६२) महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्‍नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.