उत्तर दिशा

उत्तर ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. ही दिशा दक्षिणेच्या विरुद्ध आणि पूर्व पश्चिमेला लंबरूप असते. ध्रुव तारा उत्तर दिशेला दिसतो.

Brosen windrose MR
उत्तर दिशा

हे सुद्धा पहा

अष्टदिशा

पूर्व दिशा

पश्चिम दिशा

उत्तर दिशा

दक्षिण दिशा

आग्नेय दिशा

नैऋत्य दिशा

ईशान्य दिशा

वायव्य दिशा

काळा समुद्र

काळा समुद्र (तुर्कस्तान: Karadeniz, कारादेनिझ ; ग्रीक: Μαύρη Θάλασσα ; रशियन: Чёрное море ; इंग्लिश: Black Sea, ब्लॅक सी ;) आग्नेय दिशा युरोपातील हा भूवेष्टित समुद्र आहे. या समुद्रास युरोप, अनातोलिया व कॉकेशसाने वेढले असून, भूमध्य समुद्र एजियन समुद्र व अनेक सामुद्रधुन्यांद्वारे अटलांटिक महासागराशी जोडला गेला आहे. तसेच, तो बोस्फोरस सामुद्रधुनीमार्फत मार्माराच्या समुद्राशी जोडला गेला आहे, तर डार्डेनेल्झची सामुद्रधुनी त्याला भूमध्य समुद्राच्या 'एजियन समुद्र' या उपसमुद्राशी जोडते. ही जलराशी पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांना दुभागते. काळा समुद्र हा कर्चच्या सामुद्रधुनीद्वारे अझोवच्या समुद्राशीही जोडला गेला आहे. काळ्या समुद्राचे क्षेत्रफळ ४,३६,००० वर्ग कि.मी. (१६८,५०० वर्ग मैल) (अझोवाचा समुद्र वगळता), सर्वाधिक खोली २,२०६ मी. (७,२३८ फूट), आणि आकारमान ५४७,००० घन कि.मी. (१३१,२०० घन मैल) इतके आहे. बल्गेरिया, जॉर्जिया, रशिया, रोमेनिया, तुर्कस्तान आणि युक्रेन यांमध्ये तयार होणाऱ्या पूर्व पश्चिमोत्तर लंबवर्तुळाकार भूभागात काळा समुद्र तयार झालेला आहे.

याच्या दक्षिणेस पोंटिक पर्वतरांगा, तर पूर्वेस कॉकेसस पर्वतरांगा आहेत.या समुद्राची जलपृष्ठावरील पूर्व पश्चिम दिशेतील सर्वाधिक लांबी (पूर्व-पश्चिम) १,१७५ कि.मी. आहे.

इस्तंबुल हे तुर्कस्तानातील सर्वांत मोठे शहर याच समुद्राच्या काठावर वसलेले आहे. बातुमी, बुर्गास, कोन्स्टान्ट्सा, गिरेसुन, होपा, इस्तंबूल, कर्च, खेर्सन, मंगालिया, नावोदारी, नोवोरोस्सिक, ओदेसा, ओर्दू, पोटी, रिझे, सामसुन, सेव्हास्तोपोल, सोत्शी, सुखुमी, त्राब्झोन, व्हर्ना, याल्ता आणि झोगुल्डाक ही या समुद्राच्या काठाने वसलेली काही महत्त्वाची शहरे आहेत.

काळा समुद्र ही एक बाह्यप्रवाही जलराशी आहे; म्हणजेच, प्रत्येक वर्षी येऊन मिळणाऱ्या एकूण पाण्यापेक्षा साधारण ३०० घन कि.मी. इतके जास्त पाणी काळ्या समुद्रातून, बोस्फोरस आणि दार्दनेलस सामुद्रधुनींमार्गे, एजियन समुद्रात जाते.

भूमध्य समुद्रातून काळ्या समुद्रात येणारे पाणी हे "द्विस्तरीय जलप्रवाह प्रणाली" तयार करते. काळ्या समुद्रातून बाहेर पडणारे जास्त थंड आणि कमी खारट पाणी हे भूमध्य

समुद्रातून काळ्या समुद्रात येणाऱ्या पाण्याच्या वर तरंगत राहते, ज्यामुळे पाण्यात खोलवर ऑक्सिजन अभावित पाण्याचा स्तर तयार होतो. काळ्या समुद्राच्या उत्तरेकडील युरेशियाई जलप्रणालीतील नद्यांतूनही यात पाणी येते, ज्यातील डॉन, नीपर आणि डॅन्यूब या तीन महत्त्वाच्या नद्या आहेत.

भूतकाळात पृथ्वीवरील जलपातळी अनेक वेळा कमी जास्त झालेली आहे, की ज्यामुळे, तुलनेने कमी खोल असलेला काळ्या समुद्राचा तळ कधी काळी भूभागही होता. सध्याच्या काळात ही जलपातळी जास्त असल्यामुळे, सध्यातरी काळा समुद्र हा मुख्य सागरप्रणालीशी तुर्की सामुद्रधुनी तसेच भूमध्य समुद्रामार्गे जोडलेला आहे. जलपातळी कमी/जास्त होत असता, तुर्की सामुद्रधुन्या हा काळ्या समुद्राचा मुख्य जलनिचऱ्याचा मार्ग आहे. ज्या ज्या काळात काळ्या समुद्राला मुख्य सागर प्रणालीशी जोडणारे जलप्रवाह अस्तित्त्वात नसतात, त्या त्या वेळी, काळा समुद्र हा एक मोठे सरोवर असल्याप्रमाणे असतो. तुर्की सामुद्रधुनीत बोस्फोरस, मार्माराचा समुद्र आणि दार्दनेलस या जलराशींचा समवेश होतो.

केओन्झार जिल्हा

हा लेख केओन्झार जिल्ह्याविषयी आहे. केओन्झार शहराविषयीचा लेख येथे आहे.

केओन्झार जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र केओन्झार येथे आहे.

खोर्दा जिल्हा

खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे.

दशदिशा

दहा दिशा -

पूर्व दिशा

पश्चिम दिशा

उत्तर दिशा

दक्षिण दिशा

आग्नेय दिशा

नैऋत्य दिशा

ईशान्य दिशा

वायव्य दिशा

ऊर्ध्व दिशा

अधर दिशा

धनु (तारकासमूह)

धनू ही दक्षिण खगोलार्धातल्या राशिचक्रातील एक रास आणि ८८ तारकासमूहांतील एक तारकासमूह आहे. त्याचे इंग्रजीतील नाव Sagittarius (सॅजिटॅरियस) हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग (धड) घोड्याचा अशा अश्वमानव प्राण्याच्या (सेंटॉरच्या) आकृतीने ही रास दर्शवली जाते.

आकाशगंगेचे केंद्र धनूच्या पश्चिम भागामध्ये आहे.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. ( अक्षांश १९° २६' ते २०° ४२' उत्तर, व रेखांश ७७° १८' ते ७९° ९८' पूर्व)

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.