ईस्टर

ईस्टर म्हणजेच पुनरुत्थानाचा रविवार हा ख्रिश्चन लोकांचा सण आहे. ख्रिस्ती धर्म मान्यतेनुसार या दिवशी येशू ख्रिस्त मृतातून पुनः उठला, त्याचे पुनरुत्थान झाले. नव्या करारानुसार येशू गुड फ्रायडेच्या दिवशी क्रुसावर मरण पावले व तीन दिवसानी रविवारी पुन्हा जिवंत झाले. या दिवशी ४० दिवसांच्या उपवासाचा (लेन्ट) हा काळ संपतो.

ईस्टरचा आठवडा पवित्र आठवडा म्हणून ओळखला जातो. यातील शेवटचे तीन दिवस म्हणजते मौन्द्य गुरुवार, उत्तम शुक्रवार (इंग्लिश: Good Friday) व होली सॅटर्डे होत. त्यानंतरचा रविवार हा ईस्टर असतो.

ईस्टर ची तारीख दरवर्षी बदलते कारण वसंत संपात पौर्णिमेच्या नंतरचा पहिला रविवार म्हणजे ईस्टर असे इसवी सन ३२५ मध्ये भरलेल्या ख्रिस्ती बिशप लोकांच्या संमेलनात ठरवले गेले. यहुदी लोकांच्या पासोव्हर या सणाच्या ऐवजी ईस्टर साजरा केला जातो असे काहींचे म्हणणे आहे. कारण बर्याच युरीपियान भाषांमध्ये ईस्टर हा शब्द पासोव्हरचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो.

ईस्टर साजरा करण्याच्या पद्धती मात्र देशागणिक वेगळ्या आहेत. प्रोटेस्टंट पंथीय लोकात "प्रभू उठला आहे" असे म्हणून येणाऱ्यांचे स्वागत केले जाते तर दुसरा माणूस " हो खरच प्रभू उठला आहे" असे म्हणून त्या स्वागतास प्रत्युत्तर देतो. काही देशात ईस्टर अंडी सजवण्याची प्रथा आहे. येशू नसलेल्या रिकाम्या कबरीचे प्रतिक म्हणजे अंडे. आणि प्रभू मृतातून उठला याचा आनंद झाला म्हणून अंडे सजवायचे अशी कल्पना आहे. काही पंथात सूर्योदयाच्या वेळी प्रार्थना केली जाते.

Rafael - ressureicaocristo01
Rafael - ressureicaocristo01

ईस्टर दिवशी सुवार्ता वाचन

योहान २०:१-९[१]

  • १ मग रविवारी सकाळी अगदी पहाटे मरीया मग्दलिया थडग्याकडे आली आणि थडग्यावरून धोंड काढलेली आहे असे तिला आढळले.
  • २ म्हणून तिने शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूची प्रीति होती तो दुसरा शिष्य यांच्याकडे धावत येऊन म्हटले, “त्यांनी प्रभुला थडग्यातून काढून नेऊन कोठे ठेवले हे आम्हांला माहीत नाही.”
  • ३ मग पेत्र व दुसरा शिष्य हे निघाले व थडग्याकडे गेले.
  • ४ तेव्हा ते दोघे बरोबर पळत गेले. आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर पुढे जाऊन त्याच्या आधी थडग्याजवळ पोहोचला.
  • ५ आणि त्याने वाकून आत डोकावले. तेव्हा त्याने तागाची वस्त्रे पडलेली पाहिली, पण तो आत गेला नाही.
  • ६ मग शिमोन पेत्रही त्याच्यामागून आला व थडग्यात आत गेला.
  • ७ तेव्हा तागाची वस्त्रे पडलेली आणि जो रुमाल त्याच्या डोक्याला होता, तो तागाच्या वस्त्राबरोबर नाही, तर निराळा एकीकडे गुंडाळलेला पडलेला त्याने पाहिला.
  • ८ शेवटी तो दुसरा शिष्य जो थडग्याकडे पहिल्यांदा पोहोचला होता, तोसुद्वा आत गेला, त्याने पाहिले आणि विश्वास ठेवला.
  • ९ येशूने मरणातून पुन्हा उठणे आवश्यक आहे, हे त्यांना अजूनसुद्धा समजले नव्हते.

हे पण पहा

संदर्भ

  1. ^ "मराठी बायबल (योहान)" (मराठी मजकूर).
अॅश वेनसडे

ॲश वेनसडे म्हणजे राखेचा बुधवार होय. या दिवसाने ख्रिस्ती उपवासकाळाची (४० दिवसांचा उपवास ) सुरवात होते. (या उपवासाला इंग्रजीत लेन्ट असे म्हणतात) . हा ख्रिस्ती लोकांच्या उपवासाचा पहिला दिवस असतो. हा ईस्टर सणाच्या ४६ दिवस पुढे असतो (४० दिवस उपवासामध्ये येणारे सर्व रविवार वजा केले जातात.) ईस्टर सणाचा दिवस बदलत असल्याने उपवास काळाची सुरवातही बदलत असते. याचे कारण असे कि ईस्टरचा दिवस यहुदी लोकांच्या पासोव्हर (पास्क्का) सणावर ठरवला जातो. पासोव्हर सणानंतर येणाऱ्या पौर्णिमेनंतरच्या पहिल्या रविवारी ईस्टरचा दिवस ठरऊन त्याआधीचे चाळीस दिवस (येणारे सर्व रविवार वजा करून) उपवासाचे दिवस ठरतात. त्यामुळे राखेचा बुधवार हाही बदलता असतो. हा दिवस साधारण ४ फेब्रुवारी ते १० मार्च या दरम्यान येत असतो. या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आयोजित केली जाते. व भाविकांच्या कपाळावर राख लावली जाते. राख ही पश्चाताप व प्रायश्चित याचे प्रतिक आहे. राख लावताना धर्मगुरु म्हणतात, " हे मानवा तू माती आहेस व शेवटी मातीला मिळशील हे लक्षात ठेव. म्हणून पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा "

नवा करारा नुसार येशू ख्रिस्ताने ४० दिवस उपवास केला. या उपवासा दरम्यान सैतानाने येशूला मोहात पडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण ख्रिस्ताने या मोहावर विजय मिळविला. या घटनेची स्मृती म्हणून हा उपवास तसेच ख्रिस्ताचे क्रूसावरील बलिदान व त्याचे पुनरुत्थान याची स्मृती म्हणून गुड फ्रायडे व ईस्टर साजरा केला जातो.

ईस्टर द्वीप

ईस्टर द्वीप (रापा नुई) हे ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील चिली देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ईस्टर द्वीप दक्षिण प्रशांत महासागरात चिलीच्या ३,५१० किमी पश्चिमेला व पिटकेर्न द्वीपसमूहाच्या २,०७५ किमी पूर्वेला वसले आहे.

येथे असलेल्या माउई ह्या अतिविशाल पुतळ्यांमुळे ईस्टर द्वीप हे एक जागतिक वारसा स्थान आहे.

ओशनिया

ओशनिया हा पृथ्वीवरील एक खंड आहे. ओशनिया खंडामध्ये प्रशांत महासागरात पसरलेली अनेक बेटे आहेत. ओशनिया खंडाचे साधारण ४ भाग गणले जातात: ऑस्ट्रेलेशिया, मेलनेशिया, मायक्रोनेशिया व पॉलिनेशिया.

ओशनिया खंडातील महत्त्वाचे देश ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, पापुआ न्यू गिनी, फिजी हे आहेत. अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाचे हवाई राज्य देखील ओशनिया खंडात गणले जाते.

गुड फ्रायडे

गूड फ्रायडे (पवित्र शुक्रवार/चांगला शुक्रवार/काळा शुक्रवार/महा शुक्रवार) हा ख्रिस्ती धर्मातील एक सुटीचा दिवस आहे. ईस्टरच्या आधील शुक्रवारी हा सण पाळला जातो. भारतामध्ये गूड फ्रायडे निमित्त बहुतांशी सरकारी व खाजगी कार्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी असते. ख्र्सिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात हा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. काही भाविक लोक चर्च मध्ये जाउन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.

चर्च

चर्च हे ख्रिश्चन धर्मामधील प्रार्थनाघर आहे. चर्च इमारतीचा आकार साधारणपणे आयताकृती व क्रॉसच्य आकाराचा असतो. कॅथेड्रल हा चर्चचाच एक प्रकार आहे. कॅथलिक व प्रोटेस्टंट पंथीय तसेच जेहूव्हाचे साक्षीदार, मॉर्मन इत्यादी ख्रिश्चन शाखांची चर्च वेगळी असतात.

चिली

चिलीचे प्रजासत्ताक (स्पॅनिश: República de Chile उच्चार ) हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक अत्यंत चिंचोळा देश आहे. चिलीच्या पश्चिमेला व दक्षिणेला प्रशांत महासागर, उत्तरेला पेरू, ईशान्येला बोलिव्हिया तर पूर्वेला आर्जेन्टिना हे देश आहेत. चिलीला ६,४३५ किमी लांबीची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. प्रशांत महासागरातील ईस्टर द्वीप चिलीच्या अधिपत्याखाली येते तर अंटार्क्टिका खंडाच्या १२,५०,००० वर्ग किमी भागावर चिलीने आपला हक्क सांगितला आहे.

१६व्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येण्यापुर्वी येथे इन्का साम्राज्याची सत्ता होती. १२ फेब्रुवारी १८१८ रोजी चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. आजच्या घडिला चिली हा दक्षिण अमेरिकेमधील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे.चिली देशाची एकुण लांबी (दक्षिणोत्तर) ४,३०० किमी तर सरासरी रुंदी (पूर्व-पश्चिम) केवळ १७५ किमी आहे. ह्यामुळे चिली मध्ये विविध प्रकारचे हवामान आढळते.

चिलीचे एकूण क्षेत्रफळ ७,५६,९४५ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या १७.१ दशलक्ष आहे. या देशाचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश ही राष्ट्रभाषा आहे. पेसो हे चलन असलेल्या या देशाचे प्रतिव्यक्ती उत्पन्न १०,०८४ अमेरिकन डॅालर एवढे आहे. चिलीला १८ सप्टेंबर १८१० रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले.

चिलीत संपूर्ण जगातून सर्वाधिक तांब्याचे उत्पादन होते. त्यामुळे हा जगातील सर्वात मोठा तांब्याची निर्यात करणारा देश आहे. चिलीत नायट्रेट, सोने, चांदी, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.

जगातील देशांची यादी

जगातील देशांची यादी: ह्या यादीमध्ये जगातील सर्व सार्वभौम व स्वतंत्र देश दिले आहेत. ज्यांच्या स्वतंत्रतेबद्दल एकमत नाही असेही काही असे देश ह्य यादीमध्ये असू शकतील.

त्रैक्य

ख्रिश्चन धर्मातील ट्रिनिटीच्या सिद्धांतानुसार ईश्वराची तीन रूपे आहेत. पिता (God the Father), पुत्र (God the Son) व पवित्र चेतना (Holy Spirit). ही तीन रूपे (ट्रिनिटी) विभिन्न आहेत तरीही ईश्वर एकच आहे. ह्या सिद्धांतानुसार फादर, सन व होली स्पिरिट हे सर्वात पवित्र, सर्वव्यापी, सर्वज्ञ व अमर आहेत.

नाताळ

नाताळ किंवा क्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे २५ डिसेंबर या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी ह्या सणाऐवजी एपिफनी सण ६, ७ किंवा १९ जानेवारीला साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या 'ख्रिसमस्टाईड' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो. जवळपास इ.स. ३४५ वर्षांत त्या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने ‘२५ डिसेंबर’ हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस त्या तारखेला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात हा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर काही ख्रिश्चन अनुयायी व काही ख्रिस्ती पंथ मात्र सायंकाळी हा सण साजरा करतात. भगवान येशूंच्या जन्माची सुवार्ता विशद करणाऱ्या मॅथ्यू आणि ल्यूक यांच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये तसेच प्राचीन ख्रिस्ती लेखकांनी सुचविलेल्या तारखांमध्ये काही तफावत दिसून येते. सर्वात प्रथम इ.स.पू. ३३६ मध्ये रोम येथे ख्रिसमस हा सण साजरा झाला असे मानले जाते.

या दिवशी ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. तसेच आपापल्या घरांना रोषणाई करून घर सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळसाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते. यामध्ये चॉकलेट, केक, इ. वेगवेगळे पदार्थ बनविले जातात.

पाम संडे

पाम संडे (झावळ्यांचा रविवार) हा ख्रिश्चन सण आहे. हा सण ईस्टर संडेच्या एक आठवड्या पूर्वी साजरा केला जातो. जेरुसलेम नगरीत येशुचा प्रवेश आणि त्या नंतरची मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात झावळ्यांच्या रविवार ने होते. याची उल्लेख नव्या करारातील चारही शुभवर्तमानांमध्ये केला गेलेला आहे.

पेंटेकोस्ट

पेंटेकोस्ट एक ख्रिश्चन सण आहे. ईस्टर नंतर सातव्या रविवारी (४९ दिवस) हा सण साजरा केला जातो. बायबलतील प्रेषितांची कृत्ये या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे हे जेव्हा जेरुसलेम मध्ये आठवडे सण साजरे करताना येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना व इतर अनुयायांवर पवित्र आत्माच्या वंशाचा स्मारक होते. काही ख्रिस्ती विश्वास करतात की हा कार्यक्रम कॅथोलिक चर्चचा जन्म दर्शवतो.

भारतातील सण व उत्सव

सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेल्या भारतात अनेक सण व उत्सव साजरे केले जातात पेम.

मोझेस

मोझेस (हिब्रू: מֹשֶׁה , मोशे ; अरबी: موسىٰ , मूसा ;) हा बायबलमध्ये व कुराणात वर्णिलेला धार्मिक नेता, ईश्वराचा प्रेषित व विधिनिर्माता होता. तोराह ग्रंथाचा तो कर्ता मानला जातो. ज्यू धर्मातील प्रेषितांमध्ये हा प्रमुख आहे. इस्लाम व ख्रिश्चन धर्मांतही मोझेसला प्रेषित मानले जाते. यालाच देवाकडून १० आज्ञा मिळाल्या होत्या. याला एरन नावाचा भाऊ होता.

येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त (इ.स.पू ४ ते इसवी सन ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभु येशू खिस्‍त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते, ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा एकमेव पवित्र ग्रंथ आहे.

सेंट जोसेफ

जोसेफ हे येशूचे पालक वडील व मरीयाचे पती होते. त्यांची कॅथोलिक चर्च, ऑर्थोडॉक्स चर्च, ओरिएंटल ऑर्थोडॉक्स चर्च, अँग्लिकन लिबरेशन चर्च, लुथेरनझिझमध्ये 'सेंट जोसेफ' या नावाने पूजा केली जाते.

कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही ख्रिश्चन संप्रदायामध्ये, योसेफ कामगारांच्या आश्रयदाता संत म्हणून ओळखले जाते आणि विविध मेजवानी दिवस संबंधित आहे. पोप पायस नववाने त्याला कॅथोलिक चर्च ऑफ संरक्षक आणि रक्षक दोन्ही घोषित केले आहे. तो येशू आणि मेरी उपस्थितीत मृत्यू झाला की विश्वास झाल्यामुळे आजारी आणि एक आनंदी मृत्यू त्याच्या संरक्षण व्यतिरिक्त असे घोषित लोकप्रिय धार्मिकता मध्ये केले आहे. योसेफ पूर्वजांसाठी एक मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि विविध धर्मप्रांत आणि ठिकाणे संरक्षक बनले आहे.

सेंट पीटर

सिमॉन पीटर हा एक प्राचीन ख्रिश्चन पुढारी व येशू ख्रिस्ताच्या १२ प्रचारकांपैकी एक प्रचारक (Apostle) होता. बायबलच्या नव्या करारामध्ये पीटरला संताचे स्थान दिले गेले आहे. पीटरचा जन्म अंदाजे इ.स.पू. १ मध्ये गॅलिलीच्या (आजचा इस्रायल) बेथसैडा ह्या गावात झाला. पीटरचा भाऊ सेंट अँड्र्यू हा देखील येशूच्या १२ प्रचारकांमध्ये होता.

अनेक ख्रिश्चन पुढाऱ्यांच्या मते पीटर जगातील पहिला पोप मानला जातो. पीटरने ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना अनेक पुस्तके लिहिली, अंदाजे इ.स. ६७ मध्ये रोमन सम्राट नीरो ह्याच्या हुकुमावरून रोममध्ये पीटरला ठार मारण्यात आले. त्याचे अवशेष व्हॅटिकन सिटीमधील बासिलिका ऑफ सेंट पीटरमधील एका थडग्यात आहेत.

सेंट पॉल

सेंट पॉल (इतर नावे: पॉल द अपोस्टल, पॉल ऑफ तार्सुस) हा एक प्राचीन ख्रिश्चन संत, प्रचारक व लेखक होता. सॉल हे जन्मनाव असलेला पॉल जन्माने ज्यू धर्मीय होता परंतु दमास्कसकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या एका प्रसंगानंतर पॉलने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पॉल हा ख्रिश्चन धर्माच्या अत्यंत सुरुवातीच्या काळामधील एक प्रमुख धर्मगुरू मानला जातो.

सेंट मार्क

सेंट जॉन मार्क हा येशू ख्रिस्ताचा भक्त होता. या मार्कने बायबलमधल्या नव्या करारातले दुसरे प्रकरण, मार्ककृत शुभवर्तमान (गोस्पेल ऑफ मार्क) लिहिले.

येशू ख्रिस्ताचा सर्वात जवळचा शिष्य पीटर हा येशूच्या निधनानंतर ज्युडिआचा राजा हेरॉड(Herod)च्या तडाख्यातून कसाबसा निसटून रोमला पोहोचला, त्या वेळी त्याने जॉन मार्कला आपल्याबरोबर रोमला नेले. इ.स. ४९ मध्ये मार्क अलेक्झांड्रिया येथे पोहोचला. तिथे त्याने चर्च ऑफ अलेक्झांड्रिया स्थापन केले व तो त्या चर्चचा पहिला बिशप झाला. हाच मार्क आफ्रिकेतील ख्रिश्चन धर्माचा संस्थापकही समजला जातो. अलेक्झांड्रिया आणि उत्तर आफ्रिकेत ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊ लागल्यावर, तिथल्या पूर्वीच्या मूर्तिपूजक धर्ममार्तंडांना ही आपल्यासाठी धोक्याची सूचना असल्याचे जाणवू लागले. या धर्ममार्तंडांच्या हस्तकांनी इ.स. ६८ मध्ये मार्कच्या गळ्याभोवती दोर आवळून त्याला अलेक्झांड्रियाच्या रस्त्यांमधून फरफटत नेले. मार्कला फरफटत नेत असतानाच तो मृत झाल्याने त्यांनी त्याचे शरीर अलेक्झांड्रियाजवळच्या समुद्रात फेकून दिले.

मार्कच्या मृत्यूनंतर त्याला संतपद देण्यात आले. सेंट मार्कचे समुद्रात असलेले अवशेष दोन व्हेनिशियन व्यापार्‍यांनी व दोन ग्रीक साधूंनी इ.स. ८२८ साली पळवले व व्हेनिसच्या डोजच्या ताब्यात दिले. पुढे व्यापारामुळे व्हेनिस शहर अर्थसंपन्न झाल्यावर सर्व व्हेनिसवासीयांनी मार्क याला व्हेनिसचे ग्रामदैवतपद देण्याचे ठरविले. व्हेनिसमधील एका चौकाला सेंट मार्क चौक ऊर्फ पिआझ्झा सान मार्को असे नाव देऊन तेथे ग्रॅनाईटच्या दोन स्तंभांवर व्हेनिसच्या दोन द्वारपालांचे प्रतीकात्मक पुतळे उभे केले. त्यंपैकी एका स्तंभावर सोनेरी पंखधारी सिंहाचा पुतळा आहे. सोनेरी पंखधारी सिंह हे व्हेनिसचे ग्रामदैवत सेंट मार्क याचे प्रतीक समजले जाते.

सेंट मार्क चौकातच सेंट मार्क बॅसिलिकाची भव्य आणि बायझंटाइन स्थापत्य शैलीची, काहीशी वेगळी वाटणारी इमारत आहे. हा सेंट मार्क चौक म्हणजे व्हेनिसमधील सतत गजबजलेले आणि सर्वाधिक ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण आहे.

राष्ट्रीय सण
हिंदू सण आणि उत्सव
बौद्ध सण आणि उत्सव
जैन सण आणि उत्सव
सिंधी सण आणि उत्सव
शिख सण आणि उत्सव
मुस्लिम सण आणि उत्सव
ख्रिस्ती सण आणि उत्सव
पारशी सण आणि उत्सव

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.