इ.स. २०१९

इ.स. २०१९ हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील १९वे तर २०१०च्या दशकामधील दहावे वर्ष असेल.

सहस्रके: इ.स.चे ३ रे सहस्रक
शतके: २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक
दशके: १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे
वर्षे: २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

मृत्यू

आयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध भारतामध्ये, २०१८-१९

आयर्लंड क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध १ कसोटी सामना, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. आयर्लंडचा हा पहिलाच भारतीय उपखंडातील कसोटी दौरा असणार आहे.

ऑगस्ट २२

ऑगस्ट २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २३४ वा किंवा लीप वर्षात २३५ वा दिवस असतो.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. एकदिवसीय सामने दोन्ही संघाचा क्रिकेट विश्वचषक, २०१९साठी सराव व्हावा यासाठी खेळविण्यात आले. ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली, भारतातला पहिलाच ट्वेंटी२० मालिका विजय.

किरण नगरकर

किरण नगरकर (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - मृत्यू : 5 सप्टेंबर 2019 ) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत.

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी

चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (नोव्हेंबर २०, १९२७ - ३ जानेवारी २०१९) हे मराठी वकील, न्यायाधीश, लेखक, भारतीय स्वातंत्र्यसैनिक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील होत.

जून महिना

जून हा ग्रेगरीय दिनदर्शिकेनुसार वर्षातील सहावा महिना आहे.

झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१८-१९

झिम्बाब्वे क्रिकेट संघ मार्च २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ कसोटी सामना खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१९-२०

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ १५ सप्टेंबर २०१९ ते १८ मार्च २०२० दरम्यान भारताच्या प्रदीर्घ दौर्‍यावर येणार आहे. या दौर्‍यामध्ये ३ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांचा समावेश आहे. त्यातील एकदिवसीय सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका मार्च २०२० मध्ये पुन्हा भारतात परतणार आहे. कसोटी मालिका नव्याने सुरु झालेल्या २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येणार आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने फाफ डू प्लेसीला कसोटी तर क्विंटन डी कॉकला ट्वेंटी२० कर्णधार नेमले. त्याच महिन्यात झारखंड क्रिकेट बोर्डच्या विनंतीनुसार दुसरी कसोटी जी पुर्वी रांचीत खेळविली जाणार होती ती दुर्गा पुजामुळे पुण्याला हलविण्यात आली. नवीन वेळापत्रकानुसार दुसरी कसोटी पुणे तर तिसरी कसोटी रांचीला खेळविण्यात येणार आहे.

ट्वेंटी२० मालिका पहिला सामना पावसामुळे वाया गेल्यामुळे १-१ अशी बरोबरीत सुटली.

नोव्हेंबर १२

नोव्हेंबर १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१६ वा किंवा लीप वर्षात ३१७ वा दिवस असतो.

नोव्हेंबर २७

नोव्हेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३१ वा किंवा लीप वर्षात ३३२ वा दिवस असतो.

नोव्हेंबर ४

नोव्हेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३०८ वा किंवा लीप वर्षात ३०९ वा दिवस असतो.

बांगलादेश क्रिकेट संघाचा न्यूझीलंड दौरा, २०१८-१९

बांगलादेश क्रिकेट संघ फेब्रुवारी-मार्च २०१९ दरम्यान ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळण्यासाठी न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.१५ मार्च, २०१९ रोजी क्राइस्टचर्च शहरातील दहशतवादी हल्ल्यामध्ये थोडक्यात बचावलेल्या बांगलादेश संघाने हा दौरा अर्धवट सोडला.

मनोहर पर्रीकर

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर (१३ डिसेंबर १९५५ — १७ मार्च २०१९) हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते. पर्रीकर इ.स. २००० ते इ.स. २००५ व इ.स. २०१२ ते इ.स. २०१४, तसेच १४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर होते.

त्यांचा जन्म म्हापसा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत. पर्रीकर आणि नंदन निलेकणी हे आयआयटीतील वर्गमित्र आहेत.

पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.

मे २३

मे २३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १४३ वा किंवा लीप वर्षात १४४ वा दिवस असतो.

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९

श्रीलंका क्रिकेट संघ जानेवारी - फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. दौऱ्यातील ब्रिस्बेनमधील कसोटी ही दिवस-रात्र होती तर कॅनबेरातील मानुका ओव्हलवर पहिलीवहिली कसोटी खेळविण्यात आली.

ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली.

सप्टेंबर ३

सप्टेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४६ वा किंवा लीप वर्षात २४७ वा दिवस असतो.

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पूर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक पुर्व आशिया-प्रशांत प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मार्च २०१९मध्ये पापुआ न्यू गिनीमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील विजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी पात्र होईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने दर्जा असणार आहे. म्हणेजच व्हानुआतू व फिलीपाईन्स हे देश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील.

२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका

२०१८-१९ ओमान ट्वेंटी२० चौरंगी मालिका ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी फेब्रुवारी २०१९मध्ये ओमानमध्ये होणार आहे. यात यजमान ओमानसह आयर्लंड, स्कॉटलंड व नेदरलँड्स हे देश देखील भाग घेतील. ओमानमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० स्पर्धा आयोजित केली आहे तर आयर्लंडच्या रुपाने एक संपुर्ण सदस्य देश पहिल्यांदाच ओमानच्या भूमीवर खेळणार आहे.

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन

२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल २०१९ मध्ये नामिबियामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१७-१९ फेरीतील स्पर्धा आहे जी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही देश क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८च्या खालच्या दोन स्थानांवर राहिल्याने त्यांची विभाग दोनमध्ये घसरण झाली व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा गमवावा लागला.या स्पर्धेच्या निकालानंतर विश्वचषक लीग व विश्वचषक चॅलेंज लीग ह्या स्पर्धा चालु होतील. या स्पर्धेतील अव्वल ४ देश विश्वचषक लीगमध्ये स्कॉटलंड, नेपाळ व संयुक्त अरब अमिराती यांना जाऊन मिळतील व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त होईल तर खालील २ देश ईतर देशांसमवेत विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये पात्र होतील.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.