इ.स. १९४६

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

मृत्यू

इलाही जमादार

इलाही जमादार (जन्म : दुधगाव-सांगली, १ मार्च १९४६) हे एक मराठी गझलकार आहेत. उत्तुंग गझलकार सुरेश भटांच्या नंतर त्यांचेच नाव घेतले जाते. हा महान कवी पुण्यात एका आऊटहाऊसच्या छोटया खोलीत राहतो. पुस्तकांचा आणि मांजरांचा पसारा एवढा की, खोलीत पाय ठेवायला जागा नसते. तरीही इलाहींचा प्रत्येक मित्राला घरी बोलावण्याचा आग्रह असतो. खोली लहान असली तरी या कवीचे मन मोठे आहे. प्रत्येक मित्राला त्यांनी मनाच्या दालनात ऐसपैस जागा दिली आहे.

इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी आहेत. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत. ते गझल क्लिनिक ही नवोदित मराठी कवींसाठी गझल कार्यशाळा घेतात.

ई.एस.एल. नरसिंहन

एक्कडू श्रीनिवासन लक्ष्मीनरसिंहन (जन्म: १९४६) हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांचे विद्यमान राज्यपाल आहेत. ह्या पूर्वी ते छत्तीसगढ राज्याचे राज्यपाल होते. राजकारणामध्ये शिरण्यापूर्वी ते एक आय.पी.एस. अधिकारी होते.

उर्मिला सिंह

ऊर्मिला सिंह (ऑगस्ट ६, इ.स. १९४६ - ) ह्या भारत देशातील हिमाचल प्रदेश राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्या १९८५ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेश विधानसभा सदस्य होत्या.

कुमार केतकर

कुमार केतकर (जन्म : ७ जानेवारी १९४६) : हे काँग्रेस पक्षाचे राज्यसभेतील खासदार, पत्रकार, लेखक आणि व्याख्याते आहेत. अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे त्यांनी भूषविली आहेत.

दैनिक लोकसत्ता चे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. 'डेली आॅब्झर्वर'चे निवासी संपादक तसेच इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस 'दिव्य मराठी' या वृत्तपत्राचे संपादक होते.

जेरार्ड एट हॉफ्ट

जेरार्ड एट हॉफ्ट हे शास्त्रज्ञ आहेत.

जॉन सी. माथर

जॉन सी. माथर हे शास्त्रज्ञ आहेत.

जॉर्ज डब्ल्यू. बुश

जॉर्ज वॉकर बुश, अर्थात जॉर्ज डब्ल्यू. बुश, (इंग्लिश: George Walker Bush ;) (६ जुलै, इ.स. १९४६; न्यू हॅवन, कनेक्टिकट, अमेरिका - हयात) हा अमेरिकेचा ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात टेक्सासाचा ४६वा गव्हर्नर होता. बुश रिपब्लिकन पक्षाचा सदस्य आहे.

अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, कनेक्टिकट येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. फ्लोरिडा संस्थानाचा ४३वा गव्हर्नर जेब बुश हा त्याचा भाऊ आहे.

जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली येल विद्यापीठातून, तर इ.स. १९७५ साली हार्वर्ड बिझनेस स्कुलातून पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल गोर यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.

बुश याच्या अध्यक्षीय कारकिर्दीचे अवघे आठ महिने झाले असताना सप्टेंबर ११, इ.स. २००१चे दहशतवादी हल्ले झाल्यामुळे बुश प्रशासनाने दहशतवादाचा सामना करण्यास प्राधान्य दिले. बुश प्रशासनाने दहशतवादाविरुद्ध जागतिक युद्ध घोषित करून इ.स. २००१ साली इस्लामी मूलतत्त्ववाद्यांना आश्रय देत असल्याचा आरोप करत अफगाणिस्तानावर, तर इ.स. २००३ साली इराकावर आक्रमण केले. बुश याच्या दुसर्‍या अध्यक्षीय मुदतीत इ.स. २००८ सालातल्या मंदीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली. आर्थिक प्रश्न आणि इराक व अफगाणिस्तानातील लांबत गेलेल्या युद्धांची व्यवहार्यता, यांमुळे त्याची लोकप्रियता दुसर्‍या मुदतीत ओसरू लागली.

डॉनल्ड ट्रम्प

डोनल्ड जॉन ट्रम्प, सीनियर (इंग्लिश: Donald John Trump, Sr.; १४ जून, इ.स. १९४६) हे अमेरिका देशाचा राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने उद्योगपती व दूरचित्रवाणी अभिनेता राहिलेल्या ट्रम्प यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी झालेल्या २०१६ सालच्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाच्या]] हिलरी क्लिंटन यांचा पराभव करून राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Donald Donald Donald they think in TurkeyReceTeyEr.... the YKP is a terror organization wrong informations after took the people from SYRIA to Turkey to help them first was to eliminate the Terror ORganization but is not a terror organization no informations YPG is a Civil Protection Commando and not a Terror ORganization ! They went to Syria to help and to protect Syria from the YPG but that yPG is not a Terror Organization no informations about it > terror organizations are ISIS and ISIL founded to make war regular parties in the Countries not forbidden > but in real everything about Terror is forbidden > after they win the elections or the WAR in the Countries their target to get a WAR international out of the kurdish countries > i did let them know SYRIA IRAK IRAN to shut down the forbidden terror organizations with the courts and to freeze the Kontos and warrant of arrest could you care about it to shut down with the courts there in kurdish countries and to block to get a WAR international their target is and they do invite other countries to get WARS the ISIS and ISIL they are founded to get WAR and to make WAR after their WAR in kurdish Countries they want to start international until to the USA ! WARS are forbidden and against the LAW ! I did write Bashar they are their to protect SYRIA from the YPG they think is a terror organization and do threat Syria ! Without the agreement of Syria TurkeyCANNOT enter the SYRIA or other Countries ! I did let know Bashar about that they are their in SYRIA stepped into SYRIA to protect SYRIA because of YPG they think is a terror organization ! That is wrong no informations the YPG PARTY is a forbidden terror organization !

नवीन पटनायक

नवीन पटनायक (उडिया: ନବୀନ ପଟ୍ଟନାୟକ; जन्म: १० ऑक्टोबर १९४६) हे भारत देशाच्या ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री व माजी केंद्रीय खाणमंत्री आहेत. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत.

निरंजन घाटे

निरंजन घाटे (जन्म : १० जानेवारी, इ.स. १९४६) हे विज्ञानकथा, कादंबऱ्या लिहिणारे एक मराठी लेखक आहेत. ते पुण्यात राहतात.

भूशास्त्रामध्ये एम.एस्‌सी.पर्यंत शिक्षण घेतलेल्या घाट्यांनी सुरुवातीला काही काळ प्राध्यापकी केली.

नंतर ते आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून दाखल झाले. त्यावेळी त्यांनी आकाशवाणीवर विज्ञानाशी संबंधित असे ६०० कार्यक्रम सादर केले.

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण (मार्च १७, इ.स. १९४६ - हयात) हे भारताच्या काँग्रेस पक्षामधील एक राजकारणी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. १० नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केली. महाराष्ट्राचे २२ वे मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवणारे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी मोठा राजकीय वारसा आहे. त्यांनी ११ नोव्हेंबर, इ.स. २०१० रोजी पदाची शपथ घेतली. २०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी चव्हाण ह्यांनी मुख्यमंत्रिरीपदाचा राजीनामा दिला. ह्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

बिल क्लिंटन

विल्यम जेफरसन क्लिंटन (इंग्लिश: William Jefferson Clinton), ऊर्फ बिल क्लिंटन (इंग्लिश: Bill Clinton) (ऑगस्ट १९, इ.स. १९४६; होप, आर्कान्सा, अमेरिका - हयात) हा अमेरिकन राजकारणी असून अमेरिकेचा ४२वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. १९९३ ते २० जानेवारी, इ.स. २००१ या कालखंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळले. शीतयुद्धाच्या अखेरच्या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा स्वीकारली. तत्पूर्वी हा इ.स. १९७९-८१ व इ.स. १९८३-९२, अश्या दोन मुदतींसाठी आर्कान्सा राज्याचा गव्हर्नर होता.

अमेरिकी इतिहासामध्ये दीर्घकाळ शांतता नांदलेल्या व भरभराटीचा कालखंडात क्लिंटनाची अध्यक्षीय कारकिर्द झाली. त्याच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्याने उत्तर अमेरिकी मुक्त व्यापार करारावर सही केली, सर्वसाधारण आरोग्यसेवा व बालकांसाठीच्या शासकीय आरोग्य विमा कार्यक्रमात सुधारणा घडवल्या. मॉनिका लेविन्स्की प्रकरणात न्यायालयात खोटा कबुलीजबाब दिल्याबद्दल त्याच्यावर महाभियोग चालवला गेला, मात्र अमेरिकी सेनेटेने त्याला मुभा दिल्यामुळे त्याला अध्यक्षपदाची मुदत पुरी करता आली.

क्लिंटन अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचा सदस्य आहे. त्याची पत्नी हिलरी क्लिंटन हीदेखील डेमोक्रॅट राजकारणी असून ती २१ जानेवारी, इ.स. २००९पासून इ.स. २०१२ पर्यंत अमेरिकेची परराष्ट्रसचिव होती.

भीमसेन देठे

भीमसेन देठे (जन्म : इ.स. १९४६, मृत्यू : ६ मे २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, कवी व नाटककार होते. देठे यांच्या लेखनाद्वारे मूलभूत हक्कांच्या जाणिवेने गतिशील झालेला समाज डोळ्यासमोर राहतो. या विषयासंबंधी लेखन करणारे ते एक मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात.

मदनमोहन मालवीय

पंडित मदनमोहन मालवीय (डिसेंबर २५, इ.स. १८६१ - नोव्हेंबर १२, इ.स. १९४६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते.

विल्हेल्म मार्क्स

विल्हेल्म मार्क्स (जर्मन: Wilhelm Marx; १५ जानेवारी, १८६३ (1863-01-15), क्योल्न -

५ ऑगस्ट, १९४६, बॉन) हा जर्मनीचा १७वा व १९वा चान्सेलर होता. तो नोव्हेंबर २३ ते जानेवारी १९२५ दरम्यान व मे १९२६ ते जून १९२८ दरम्यान चान्सेलरपदावर होता.

सुनीता पुरुषोत्तम देशपांडे

सुनीता देशपांडे (जुलै ३, इ.स. १९२५/इ.स. १९२६; रत्नागिरी, महाराष्ट्र - नोव्हेंबर ७, इ.स. २००९; पुणे, महाराष्ट्र), पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर, या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे त्यांचे पती होते.

पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स. १९४६ रोजी झाले. पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले. तसेच 'वंदेमातरम्' या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती. 'नवरा बायको' या चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. 'राजमाता जिजाबाई' हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता. पुलंच्या 'सुदर मी होणार' मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.