इ.स. १९४५

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जानेवारी-मार्च

एप्रिल-जून

जुलै-सप्टेंबर

ऑक्टोबर-डिसेंबर

जन्म

मृत्यू

के.जी. बालकृष्णन

के. जी. बालकृष्णन हे भारताचे सदतीसावे सरन्यायाधीश होते. १४ जानेवारी २००७ पासुन १२ मे २०१० या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.

गणेश दामोदर सावरकर

गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबाराव सावरकर (जून १३, १८७९, मार्च १६, १९४५) हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.

सावरकर घराणे मूळचे महाराष्ट्र राज्याच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेल्या गुहागर पेट्यामधील पालशेत येथील होते. त्या परिसरातील सांवरीच्या झाडांवरून काही जणांना सांवरवाडीकर म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने सांवरवाडीकर चे सावरकर झाले. पुढे कामानिमित्त काही मंडळी कोकण सोडून घाटावर स्थाईक झाली. बाळाजी बाजीराव पेशवे यांच्या काळात केलेल्या पराक्रमामुळे पेशव्यांनी नारायण दीक्षित (सावरकर) आणि त्यांचे स्नेही धोपावकर यांना नाशिक जिल्ह्यातील भगूर गावाच्या जवळ असलेल्या राहुरी गावाची जहागीर दिली. घाटावर स्थाईक झालेल्या सावरकर घराण्यातील नारायण दीक्षित (सावरकर) यांच्यापासून दामोदरपंत सावरकर हे सातव्या पिढीतील वंशज होते. दामोदरपंतांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते. भगूर परिसरात त्यांच्या इतके शिकलेले अन्य कोणीही नसल्याने त्यांना विशेष मान होता. पिढीजात जहागीर सांभाळणे आणि सावकारी हे त्यांचे व्यवसाय होते.

दामोदरपंत सावरकर यांचा विवाह मनोहर घराण्यातील राधाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांना दोन मुले झाली पण ती वाचली नाहीत. त्यानंतर या जोडप्याला तीन मुले व एक मुलगी अशी चार अपत्ये झाली. दि. १३-जून-१८७९ रोजी गणेश दामोदर सावरकर उर्फ बाबा यांचा जन्म झाला, दि. २८-मे-१८८३ रोजी विनायक उर्फ तात्या आणि नंतर साधारण तीन तीन वर्षांनी माई (नंतरच्या माई काळे) आणि नारायण उर्फ बाळ सावरकर यांचा जन्म झाला.

जावेद अख्तर

जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.

त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

जॉन अँब्रोझ फ्लेमिंग

सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग (२९ नोव्हेंबर, १८४९ - १८ एप्रिल, १९४५) हा ब्रिटिश विद्युत अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होता.

फ्लेमिंगने थर्मियॉनिक वाल्व तथा व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावला. याने विद्युत मोटरींसाठीचा डाव्या हाताचा नियमही बसविला.

जॉर्ज एफ. स्मूट

जॉर्ज एफ. स्मूट हे शास्त्रज्ञ आहेत.

डग्लस डी. ओशेरॉफ

डग्लस डी. ओशेरॉफ हे शास्त्रज्ञ आहेत.

डेव्हिड लॉइड जॉर्ज

डेव्हिड लॉइड जॉर्ज, ड्वायफोरचा पहिला अर्ल लॉइड-जॉर्ज (इंग्लिश: David Lloyd George, 1st Earl Lloyd-George of Dwyfor; १७ जानेवारी, इ.स. १८६३ - २६ मार्च, इ.स. १९४५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०८ ते १९१६ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनमधील लष्करी व राजकीय आणीबाणीची परिस्थिती हाताळण्यात एच.एच. आस्क्विथला मोठ्या प्रमाणावर अपयश आले. त्यामुळे त्याला हटवून लॉइड जॉर्जला पंतप्रधानपदी आणण्यात आले.

वेल्सचा रहिवासी असलेला तसेच पेशाने वकील असणारा लॉइड जॉर्ज हा आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. वेल्श ही त्याची मातृभाषा तर इंग्लिश ही दुय्यम भाषा होती. आपल्या उत्साही वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच ब्रिटनमध्ये अनेक सामाजिक बदल घडवून आणलेल्या लॉइड जॉर्जचे नाव ब्रिटिश इतिहासात मानाने घेतले जाते.

पीपल्स एज्युकेशन सोसायटी

पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही महाराष्ट्रातील एक शैक्षणिक संस्था आहे.

अस्पृश्यांसह निम्न मध्यमवर्गास उच्च शिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटीची’ स्थापना केली. या संस्थेच्यावतीने १९४६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय, १९५० मध्ये औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय, १९५३ मध्ये मुंबईत सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय तर १९५६ मध्ये मुंबईत सिद्धार्थ विधी महाविद्यालय सर्व समाज बांधवासाठी सुरू केले.

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट

फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट (इंग्लिश: Franklin Delano Roosevelt) ) (जन्म:-जानेवारी ३०, इ.स. १८८२; हाईड पार्क, न्यूयॉर्क, अमेरिका मृत्यू:- एप्रिल १२, इ.स. १९४५ वार्म स्प्रिंग्स जॉर्जिया), हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. हे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत ज्याची या पदी ४ वेळा निवड झाली. १९३२ ते १९४५ या काळात सलग तेरा वर्षे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पद सांभाळले.

बेनितो मुसोलिनी

बेनितो मुसोलिनी हा इटलीचा भूतपूर्व पंतप्रधान व हुकुमशहा होता. इटलीमध्ये फॅसिझम स्थापन करण्यात बेनितो मुसोलिनीने महत्त्वपूर्व भुमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धामध्ये मुसोलिनीने नाझी जर्मनीसोबत मैत्री केली व अक्ष राष्ट्रांमध्ये सहभाग घेतला.

एप्रिल १९४५ मध्ये अक्ष राष्ट्रांचा पराभव निश्चित झाल्यानंतर मुसोलिनीने स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याचा प्रयत्न केला, पण त्या दरम्यान त्याला पकडून ठार मारण्यात आले.

भास्कर चंदनशिव

भास्कर तात्याबा चंदनशिव (जन्म :१२ जानेवारी १९४५, हासेगांव-कळंब) हे प्रसिद्ध ग्रामीण साहित्यिक आहेत. मुळचे भास्कर देवराव यादव हे दत्तकविधानानंतर भास्कर तात्याबा चंदनशिव झाले. निजाम राजवटीतील मराठवाड्यात असलेल्या उस्मानाबाद जिल्हयातील कळंब गावापासून बार्शीकडे कडे जाणाऱ्या महामार्गावरील हासेगाव हे त्यांचे मूळ जन्म गाव होय.

योजेफ ग्यॉबेल्स

डॉ. पाउल योजेफ ग्यॉबेल्स (जर्मन: Joseph Goebbels; २९ ऑक्टोबर, इ.स. १८९७:म्योन्शनग्लाडबाख, प्रशिया - १ मे, इ.स. १९४५:बर्लिन, जर्मनी) हा एक जर्मन राजकारणी होता. इ.स. १९३३ ते १९४५ दरम्यान तो नाझी जर्मनीमधील एक महत्त्वाचा मंत्री होता. ॲडॉल्फ हिटलरच्या सर्वात विश्वासू व आंतरिक गोटामधील एक असलेल्या ग्योबेल्सने नाझी पक्षाची धोरणे व विचार सामान्य जर्मन नागरिकांपर्यंत पोचवण्याची भूमिका पार पाडली. त्याच्या कट्टर ज्यूविरोध व प्रभावी भाषणशैलीसाठी तो ओळखला जात असे.

इ.स. १९२१ साली हायडेलबर्ग विद्यापीठातून पीएचडी पदवी मिळवल्यानंतर ग्योबेल्सने अनेक व्यवसाय आजमावले व इ.स. १९२८ सालापर्यंत तो राजकारणात शिरून बर्लिनमधील एक प्रभावशाली पुढारी बनला. इ.स. १९३३ साली नाझी पक्ष सत्तेवर आल्यानंतर ग्योबेल्सने जर्मनीमधील प्रसारमाध्यमांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले व हिटलरच्या राजकीय व सामाजिक धोरणांची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली. १९३५ साली न्युर्नबर्ग कायदे मंजूर झाल्यानंतर ज्यू लोक चालवत असलेले व्यवसाय व उद्योग बंद पाडण्याची व ज्यूंचे पूर्ण खच्चीकरण करण्याची योजना त्याने आखली. ग्योबेल्सने अनेक ज्यूविरोधी चित्रपट बनवले. त्याच्या योजनेनुसार इ.स. १९३८ साली जर्मनीमध्ये अनेक सिनेगॉग जाळण्यात आले व शेकडो ज्यूंची कत्तल करण्यात आली.

दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ग्योबेल्सने नाझी राजवटीमधील आपले राजकीय सामर्थ्य बळकट केले. ज्यू व जर्मनेतर लोकांसाठी नाझी छळछावण्या उभारण्यात व त्यानंतरच्या होलोकॉस्टमध्ये ग्योबेल्सचे मोठा वाटा होता. दुसऱ्या महायुद्धाच्या उत्तरार्धात अक्ष राष्ट्रांचा पराजय निश्चित झाल्यानंतरही त्याने नाझी मतप्रचार चालूच ठेवला. ३० एप्रिल, इ.स. १९४५ रोजी हिटलरच्या आत्महत्येनंतर ग्योबेल्स जर्मनीचा चान्सेलर बनला. परंतु केवळ १ दिवस ह्या पदावर राहिल्यानंतर ग्योबेल्सने १ मे, इ.स. १९४५ रोजी पत्नी व सहा मुलांसह आत्महत्या केली.

रामकृष्णबुवा वझे

रामकृष्णबुवा वझे तथा वझेबुवा (२८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ - ५ मे, इ.स. १९४५) हे ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक आणि मराठी संगीत नाटकांचे संगीतकार होते. वझेबुवांची धृपद, खयाल, ठुमरी आदि गायनप्रकारांवर हुकमत होती.

रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते

लक्ष्मण लोंढे

लक्ष्मण लोंढे (जन्म : १९४५; मृत्यू : मुंबई, ६ ऑगस्ट, २०१५) हे मराठीतले विज्ञानकथा लेखक होते. बँकेत नोकरी करणार्‍या लक्षण लोंढे यांनी वयाच्या ५०व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी त्यानंत आपला पूर्ण वेळ विज्ञान कथा लेखनात घालविला. दुसरा आइन्स्टाइन ही त्यांची कथा इंग्रजीत 'सायन्स टुडे' या नियतकालिकात प्रसिद्ध झाली. पुढे या कथेला कन्सास विद्यापीठाचा जागतिक सर्वोत्कृष्ट कथा म्हणून पुरस्कार मिळाला. तसेच कथेची निवड जगातील विज्ञान लेखकांसाठी सर्वोच्च मानल्या जाणार्‍या जेम्स गुन यांच्या 'द रोड टू सायन्स फिक्शन'च्या १९८९च्या आवृत्तीसाठी निवडली गेली. आंतरराष्ट्रीय बहुमान मिळवणारे ते पहिले मराठी विज्ञान कथालेखक होत. ते सोबत साप्ताहिकामध्येच लक्ष्मणझुला नावाचे सदर लिहीत.

कोणतीही वैज्ञानिक पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी विज्ञान लेखक म्हणून खूप चांगली कामगिरी केली. विज्ञान लेखक होण्यासाठी वैज्ञानिक पार्श्वभूमीपेक्षा जिज्ञासेची आवश्यकता असते हे त्यांनी दाखवून दिले. कथा लिहिण्यासाठी आवश्यक ते पुरेसे ज्ञान जवळ नसल्यामुळे कोणताही विषय त्यांनी निवडला की ते त्या विषयाचा एखाद्या वैज्ञानिकासारखाच अभ्यास करायचे. त्या विषयाशी संबधित प्रकाशित झालेले साहित्याचे वाचन करून तो विषय पक्का करून सामान्यांना समजेल अशा भाषेत त्या विषयाची मांडणी ते करायचे. मराठी विज्ञान परिषदेत नवोदित विज्ञान लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा व्हायच्या. या कार्यशाळेत नवोदित लेखकांच्या लेखनावर ते अत्यंत मार्मिक टिप्पणी करत असत. या टिप्पणीमुळे त्या लेखकाचा उत्साह वाढे.

वैज्ञानिक कथांव्यतिरिक्त त्यांनी चरित्रे आणि ललित कथा-कादंबर्‍याही लिहिल्या.

विठ्ठल भिकाजी वाघ

प्राचार्य डॉ. विठ्ठल भिकाजी वाघ (जन्म: १ जानेवारी इ.स. १९४५, हिंगणी, अकोला जिल्हा - हयात) हे मराठीतील एक कवी आणि लेखक आहेत. ते मराठी हा विषय घेऊन एम.ए. पी‍एच. डी. झाले आहेत. ते अकोल्यातील ’शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया’ तून प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.

विठ्ठल वाघ यांनी अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव व औरंगाबाद या पाच जिल्ह्यांतून पायी हिंडून, काव्ययात्रेतून समाज प्रबोधन केले आहे. त्यांचे अमेरिका, कॅनडा या देशांत काव्यगायनाचे २२ कार्यक्रम झाले आहेत. विठ्ठल वाघ हे महाराष्ट्रातील शालेय मराठीचे पाठ्यपुस्तक, ’बालभारती’ इयत्ता १ ते ७ चे संपादन प्रमुख होते. त्यांनी लिहिलेल्या पाठांचा आणि कवितांचा समावेश, अनेक विद्यापीठांतील व उच्च माध्यमिक विद्यालयांतील पाठ्यक्रमांत झाला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दसंग्रह वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर, प्रत्येक विद्यापीठाच्या आसपासच्या जिल्ह्यांतील बोलीभाषेतील शब्दांचा संग्रह करण्याचे काम सुरू केले. त्यासाठी अमरावती विद्यापीठाने डॉ. विठ्ठल वाघ यांची नेमणूक केली होती. वाघ यांनी ३३ तालुक्यांचा दौरा करून, काही म्हणी व शब्द गोळा केले.सुपसिदध कवी व लेखक. 'काळ्या मातीत मातीत ', 'पंगतीच्या वाटेवर', 'कपाशिची चंद्रफुले', हे कवितासंग्रह

विलासराव देशमुख

विलासराव दगडोजीराव देशमुख (मे २६, इ.स. १९४५ - १४ ऑगस्ट इ.स. २०१२) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. इ.स. १९७४ साली बाभळगाव ग्रामपंचायत च्या सरपंच पदापासून आपली राजकीय कारकीर्द सुरू करणारे विलासराव १८ ऑक्टोबर, इ.स. १९९९ ते १६ जानेवारी, इ.स. २००३ व १ नोव्हेंबर, इ.स. २००४ ते ४ डिसेंबर, इ.स. २००८ या कालखंडांदरम्यान ते दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हिंदी चित्रपटांतील अभिनेता रितेश देशमुख हा त्यांचा पुत्र आहे.

श्रीनिवासराघवन वेंकटराघवन

श्रीनिवासराघवन वेंकटराघवन तथा वेंकट.

हरीश कापडिया

हरीश कपाडिया (जन्म ११ जुलै १९४५) हे एक प्रतिष्ठित हिमालय पर्वतारोही, लेखक आणि भारतातील हिमालय जर्नलचे दीर्घ-काळ संपादक आहेत. यांचा जन्म मुंबई, भारत येथे झाला होता. त्यांनी इंग्लिशमध्ये गिर्यारोहणाबद्दल अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांना रॉयल जियोग्राफिक सोसायटीचे पॅट्रन्स पदक देण्यात आले आहे. तसेच भारतीय राष्ट्रपतींनी अ‍ॅडव्हेंचरसाठीचा लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड आणि किंग अल्बर्ट आय मेमोरियल फाउंडेशनतर्फे किंग अल्बर्ट माउंटन पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. भारतीय हिमालयावर त्यांनी असंख्य पुस्तके आणि लेख लिहिले आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.