इ.स. १९४४

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जानेवारी-जून

जुलै-डिसेंबर

जन्म

मृत्यू

अनिल अवचट

डॉ. अनिल अवचट हे डॉक्टर असलेले मराठीतील प्रसिद्ध लेखक, समाजसेवक, चित्रकार आणि पत्रकार आहेत.रिपोर्ताज पद्धतीचे लेखन

अरुण टिकेकर

अरुण चिंतामण टिकेकर (जन्म : १ फेब्रुवारी १९४४; मृत्यू : १९ जानेवारी २०१६) हे लोकसत्ता या दैनिक वृत्तपत्राचे ११ वर्षे संपादक होते. माधव गडकरी यांच्यानंतर टिकेकर या पदावर होते. त्यापूर्वी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते. त्याच सुमारास ते महाराष्ट्र टाइम्समध्ये उपसंपादक होते. नंतर ते लोकमत या वृत्तपत्रात गेले.

टिकेकरांचे आजोबा रामचंद्र विनायक टिकेकर हे लोकमान्य टिळकांच्या केसरीत धनुर्धारी या टोपणनावाने सदर लिहित. ते केसरीचे पहिले स्तंभलेखक असल्याचा उल्लेख डॉ. य.दि. फडके यांनी केला होता. टिकेकर यांचे काका श्रीपाद रामचंद्र टिकेकर हे मुसाफिर टोपणनावाने लिहीत तर वडील चिंतामण रामचंद्र टिकेकर हे दूत या टोपणनावाने लिहीत. कदाचित, त्यामुळेच सदरलेखन आण‌ि टोपणनावे यात टिकेकरांना विशेष रस होता. स्वतः अरुण टिकेकर हे दस्तुरखुद्द, टिचकीबहाद्दर अशा अनेक नावांनी सदरलेखन करीत.

टिकेकर पुढे सकाळ ग्रुप या वृत्तपत्र संघाचे संपादकीय संचालक झाले

टिकेकरांनी अनेक सदरलेखकही घडवले. त्यांना इंग्लिश साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणून ओळखले जाते.

अरुण टिकेकर हे पीएच.डी होते. त्यांनी The Kincaids, Two Generation of a British Family in the Indian Civil Service या नावाचा शोधप्रबंध लिहिला होता.

त्यांच्या लोकसत्तेतील तारतम्य ह्या प्रसिद्ध स्तंभलेखनामुळे ते तारतम्यकार म्हणून परिचित झाले. मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे ते सहा वर्षे अध्यक्ष होते.

पत्रकारितेबरोबरच काही व्यक्तिचित्रे व मुंबई विद्यापीठाचा इतिहास त्यानी लेखणीबद्ध केला आहे.

आइसलँड

आइसलंड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप-देश आहे. याचे क्षेत्रफळ साधारणपणे १ लक्ष चौरस मैल क्षेत्रफळ आहे.

रेयक्यविक ही आइसलंडची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. यापेक्षा लहान दुसरे गाव अकुरेरी (Akureiri) आहे. हे उत्तरेकडे आहे. येथे प्रमुख आकर्षण असे गरम पाण्याचे झरे हे रेकयाविकपासून २० मैलावर आहेत.

गुस्ताफ बाउअर

गुस्ताफ बाउअर (जर्मन: Hermann Müller; ६ जानेवारी, १८७० (1870-01-06), डार्केहेमन, प्रशिया -

१६ सप्टेंबर, १९४४, बर्लिन) हा जर्मनीचा ११वा चान्सेलर होता. तो १९१९ ते १९२० दरम्यान २३१ दिवसांकरिता चान्सेलरपदावर होता.

गेर्हार्ड श्र्योडर

गेर्हार्ड श्र्योडर (जर्मन: Gerhard Schröder; जन्म: एप्रिल ७, इ.स. १९४४) हा जर्मनीमधील एक राजकारणी व जर्मनीचा भूतपूर्व चान्सेलर आहे.

चार्ल्स ग्लोव्हर बार्कला

चार्ल्स ग्लोव्हर बार्कला हे शास्त्रज्ञ आहेत.

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट

द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २९ जुलै १९४४ रोजी स्थापन केलेली एक सामाजिक संस्था होती.

दिलीप प्रभावळकर

दिलीप प्रभावळकर हे एक भारतीय मराठी आणि हिंदी चित्रपट अभिनेते आहेत. झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि 'चौकट राजा' आणि 'एक डाव भुताचा' या चित्रपटात मुख्य भूमिका बजावली.

मराठी दूरचित्रवाणीमध्ये ते नेहमी 'आबा गंगाधर टिपरे ' म्हणून ओळखले जातील आणि चिमणराव -गुंड्याभाऊ यांच्या 'चिमणीव'

मराठी रंगभूमीवरील, 'हसवा फसवी' आणि 'वासूची सासू' मधील त्यांच्या भूमिका फार लोकप्रिय झाल्या.

प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळालेला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.

पिनाराई विजयन

पिनाराई विजयन (मल्याळम: പിണറായി വിജയൻ; जन्म: २१ मार्च १९४४) हे एक भारतीय राजकारणी व केरळ राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. २०१६ सालच्या केरळ विधानसभा निवडणुकीत डाव्या लोकशाही आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. आघाडीच्या विधीमंडळाचे नेते असलेल्या विजयन ह्यांनी २० मे २०१६ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

केरळच्या राजकारणात प्रदीर्घ काळ कार्यरत असलेले विजयन १९९८ ते २०१५ दरम्यान कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे सरचिटणीस होते. त्यांनी १९९६ ते १९९८ दरम्यान राज्य सरकरमध्ये मंत्रीपद देखील भुषवले आहे.

राजीव गांधी

राजीव गांधी (२० ऑगस्ट इ.स. १९४४ - २१ मे इ.स. १९९१

) हे भारताचे सातवे पंतप्रधान होते. इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते. इंदिरा गांधीच्या निधनानंतर ३१ ऑक्टो. इ.स. १९८४ ते २ डिसे· इ.स. १९८९ पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. जेव्हा राजीव गांधीनी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेतली तेव्हा ते भारताचे सर्वांत तरुण पंतप्रधान बनले. (वय ४० वर्षे)

राजीव गांधी राजकारणात येण्यापूर्वी इंडियन एअरलाइन्समध्ये वैमानिक होते. आई इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान असल्या तरी त्यांनी मात्र राजकारणातून दूर राहणे पसंत केले होते. दरम्यान इंग्लंडमधील केंब्रिज येथे असतांना त्यांची ओळख इटालियन वंशाच्या सोनियाशी झाली व पुढे त्यांचा विवाह झाला. अखेर इ.स. १९८० मध्ये भाऊ संजय गांधी याच्या निधनानंतर राजीवने राजकारणात प्रवेश केला. पुढे आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर ते इ.स. १९८४ मध्ये पंतप्रधान बनले.

राजीव गांधीच्या नेतृत्वात काँग्रेसने त्यानंतर झालेल्या १९८४ च्या लोकसभा निवडणुकांत ५४२ पैकी ४११ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. राजीव गांधीच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामांतून पहायला मिळाला. संगणकयुगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली. तसेच टेलिकॉमच्या क्रांतीची सुरवात ही त्यांच्या धोरणांतून झाली.

इ.स. १९८८ मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय घेतला. त्याची परिणती लिट्टेसोबतच्या संघर्षात झाली. याच सुमारास बोफोर्स घोटाळ्यात त्यांच्यावर झालेल्या आरोपांनी त्यांची स्वच्छ राजकारण्याची प्रतिमा मलिन झाली. अखेर इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

राजीव गांधी त्यानंतरही काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम होते. इ.स. १९९१ च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी त्यांची लिट्टेकडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी सोनिया गांधी, मुलगा राहुल गांधी व मुलगी प्रियंका गांधी या राजकारणात आहेत.

राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रावसाहेब कसबे

डॉ. रावसाहेब राणोजी कसबे (जन्म: १२ नोव्हेंबर, १९४४) हे मराठी लेखक आहेत. त्यांच्या झोत या पुस्तकात त्यांनी माधव सदाशिव गोळवलकर यांच्या द बंच ऑफ थॉट्स या पुस्तकातील विचारांची व त्या अनुषंगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीची समीक्षा केली आहे.

रुस्तुम अचलखांब

प्रा. डॉ. रुस्तुम अचलखांब (१९४४ - २५ ऑक्टोबर, २०१७) हे एक मराठी लेखक व नाटककार होते. जालना जिल्ह्यातील मानेगाव हे त्यांचे मूळ गाव आहे.

अचलखांब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाचे विभागप्रमुख होते.

विजयसिंह मोहिते-पाटील

विजयसिंह मोहिते-पाटील (जन्म: १२ जून १९४४) हे महाराष्ट्र राज्याच्या सोलापूर जिल्ह्यामधील एक वरिष्ठ राजकारणी व राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले मोहिते-पाटील १९८० ते २००९ दरम्यान माळशिरस विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते.

२०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये मोहिते-पाटील ह्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून स्वाभिमानी पक्षाचे सदाभाऊ खोत ह्यांचा सुमारे २५,००० मतांनी पराभव केला.

दादासाहेब..

विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे ऊर्फ महर्षी शिंदे ( जमखिंडी, २३ एप्रिल, इ.स. १८७३ - २ जानेवारी, इ.स. १९४४) हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक व लेखक होते.

विलेम जेकब व्हान स्टॉकम

विलेम जेकब व्हान स्टॉकम (नोव्हेंबर २०, इ.स. १९१० - जून १०, इ.स. १९४४) हा डच भौतिकशास्त्रज्ञ होता. याने साधारण सापेक्षतावादामध्ये मोलाची भर घातली.

१९४४ उन्हाळी ऑलिंपिक

१९४४ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची तेरावी आवृत्ती युनायटेड किंग्डम देशाच्या लंडन शहरात खेळवली जाणार होती. परंतु दुसरे महायुद्ध चालू असल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली व लंडनला पुढील ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले.

१९४४ हिवाळी ऑलिंपिक

१९४४ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पाचवी आवृत्ती इटली देशाच्या व्हेनेतो प्रदेशामधील कोर्तिना द'अम्पिझ्झो ह्या गावात खेळवली जाणार होती. परंतु दुसर्‍या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.