इ.स. १९४३

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जानेवारी-जून

जुलै-डिसेंबर

जन्म

मृत्यू

इळैयराजा

इळैयराजा (इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ : இளையராஜா,उच्चार-इळैयराजा ) (जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : जून २ १९४३ तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत

प्रसिद्ध संगीतकार. फेब्रुवारी ११ १९९९ रोजी त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग

लष्करी यांत्रिकी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग (College of Military Engineering) ही भारतीय लष्कराच्या कोअर ऑफ इंजिनियर्स ह्या शाखेची एक तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्था आहे. येथे भारतीय लष्करातील निवडक जवानांना यांत्रिकीचे प्रशिक्षण दिले जाते.

मुंबई–पुणे महामार्गावर पुणे महानगरातील खडकी लष्कर तळाजवळ हे कॉलेज आहे. कॉलेजचा परिसर मुळा नदीच्या काठावर ३,६०० एकर (१५ चौ. किमी) क्षेत्रावर पसरला असून येथे केवळ लष्करी अधिकार्‍यांना व व लष्करातील नागरी कर्मचार्‍यांना प्रवेश मिळतो.

क्लाउस फोन क्लित्झिंग

क्लाउस फोन क्लित्झिंग (२८ जून, इ.स. १९४३:श्रोडा, पोलंड -) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहेत.

गजानन कीर्तीकर

गजानन कीर्तीकर (जन्म: ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर ह्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला.

जॉन मेजर

सर जॉन मेजर (२९ मार्च, इ.स. १९४३:कारशॅल्टन, सरे, इंग्लंड - ) हा एक ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा माजी पंतप्रधान आहे.

मेजर क्रिकेटचा मोठा चाहता असून त्याने क्रिकेटबद्दल लिहिलेल्या मोर दॅन अ गेम या पुस्तकाला पुरस्कार मिळाला आहे.

परवेझ मुशर्रफ

परवेझ मुशर्रफ (उर्दू: پرویز مشرف; जन्म: ११ ऑगस्ट १९४३) हा एक निवृत्त पाकिस्तानी लष्करी अधिकारी (जनरल), पाकिस्तानचा माजी लष्करप्रमुख व राष्ट्राध्यक्ष आहे.

१९९९ साली पाकिस्तानचा लष्करप्रमुख असताना मुशर्रफच्या सैन्याला कारगील युद्धामध्ये भारताकडून पराभूत व्हावे लागले. ह्यावरून मुशर्रफ व तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ ह्यांच्या दरम्यान पराकोटीचे मतभेद निर्माण झाले होते. १२ ऑक्टोबर १९९९ रोजी नवाझ शरीफने मुशर्रफला लष्करप्रमुख पदावरून काढल्याचे वृत्त कळताच मुशर्रफने नवाझ शरीफ विरुद्ध लष्करी बंड पुकारले व देशाची सत्ता हातात घेतली. १५ ऑक्टोबर १९९९ रोजी मुशर्रफने पाकिस्तानचे संविधान निलंबित केले, देशामध्ये आणीबाणी जाहीर केली व स्वत:ला पाकिस्तानच्या राष्ट्रप्रमुखपदावर नियुक्त केले. त्याने नवाझ शरीफला अटकेत टाकून नंतर देश सोडण्यास भाग पाडले.

२००१ साली घेण्यात आलेल्या एका बनावटी जनमतामध्ये विजय मिळवून मुशर्रफ अधिकृतपणे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला. २००७ सालापर्यंत पाकिस्तानमधील जनतेचे मत त्याच्याबद्दल प्रतिकूल बनले होते. डिसेंबर २००७ मध्ये बेनझीर भुट्टोची हत्या झाल्यानंतर अखेर १८ ऑगस्ट २००८ रोजी मुशर्रफने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला व लंडनकडे पळ काढला. पुढील ४ वर्षे लंडनमध्ये राहिल्यानंतर २४ मार्च २०१३ रोजी तो पाकिस्तानात परतला. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने मुशर्रला ठार मारण्याची धमकी दिली होती. पाकिस्तानात परतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याला अटक करून त्याच्यावर देशद्रोह, खून इत्यादी आरोपांवरून खटला भरला.

प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे

प्रा. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे (१९४३ - जानेवारी ६, २०१०) हे मराठी भाषेमधील लेखक होते.

फ्रान्सिस दिब्रिटो

फादर फ्रान्सिस दिब्रिटो (४ डिसेंबर, इ.स. १९४३; नंदाखाल, ठाणे जिल्हा, महाराष्ट्र - हयात) हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक आहेत. ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.

बॉबी फिशर

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रँडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलँडचा नागरीक बनला.

यशवंत मनोहर

डॉ. यशवंत मनोहर (२६ मार्च, इ.स. १९४३ - हयात) हे एक मराठी कवी, लेखक आणि साहित्य समीक्षक आहेत.

रवीश मल्होत्रा

रवीश मल्होत्रा (डिसेंबर २५, इ.स. १९४३:लाहोर, पाकिस्तान - ) हा भारतीय वायुसेनेचा निवृत्त एर कॉमोडोर आहे.

मल्होत्रा १९८२ साली सोयुझ टी-११ मोहीमेंतर्गत अंतराळात गेलेल्या राकेश शर्माचा बदली अंतराळवीर होता. मल्होत्रा अंतराळात गेला नाही.

रानडे, गांधी आणि जीना

रानडे, गांधी आणि जीना (इंग्रजी: Ranade, Gandhi and Jinnah) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. इ.स. १९४३ सालच्या १८ जानेवारी रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्यात महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांच्या १०१व्या जन्मतिथीच्या निमित्ताने, रानड्यांनीच इ.स. १८९६ मध्ये स्थापन केलेल्या ‘डेक्कन सभा’ या संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एक इंग्रजी व्याख्यान दिले. हे भाषण पुढे ‘रानडे, गांधी आणि जीना’ या नावाने पुस्तकस्वरूपात प्रकाशित झाले. या पुस्तकात बाबासाहेबांनी महादेव गोविंद रानडे, मोहनदास करमचंद गांधी आणि महमंद अली जीना या तीन व्यक्तित्वांची तुलना केली आहे व त्यात रानडे हे गांधी व जिनांपेक्षा थोर असल्याचे सांगितले आहे. व्यक्तिपूजा (हीरो वरशिप) चांगली गोष्ट नाही, कारण ती शेवटी समाजासाठी आणि देशासाठी अहितकारक असते, असे या पुस्तकात सांगितले आहे.

मराठीतले हे पुस्तक पुण्यातील जोशी ब्रदर्स या प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. मूळ पुस्तक इंग्रजीत होते.

लक्ष्मण देशपांडे

डॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना त्यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या 'वऱ्हाड निघालंय लंडनला' ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून या नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे. त्यामुळे लोक त्यांना वऱ्हाडकर म्हणायचे.

लक्षमण देशपांडे लहानप गणपती उत्सवात होणाऱ्या मेळा नावाच्या करमणुकीच्या कार्यक्रमांत भाग घेत. तेथेच त्यांच्यातील कलावंताची जडणघडण झाली. घरची परिस्थिती प्रतिकूल असूनही त्यांनी एम.ए. व त्यानंतर एमडी (मास्टर इन ड्रॅमॅटिक्‍स)चे शिक्षण घेतले. मौलाना आझाद, सरस्वती भुवन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यावर १९८० साली ते औरंगाबाद विद्यापीठात शाखाप्रमुख म्हणून कार्यरत झाले. याच दरम्यान त्यांनी 'वऱ्हाड निघालंंय लंडनला'ची निर्मिती केली. या नाटकाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. हजारोंच्या संख्येने लोक प्रयोगांना हजर रहात. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, मस्कत, ऑस्ट्रेलिया, कतार, कुवेत, सिंगापूर, थायलंड, नायजेरिया येथेही वऱ्हाडचे प्रयोग झाले. एकाच व्यक्तीने ५२ व्यक्तिरेखा साकारण्याचा विक्रम केल्याबद्दल डॉ. देशपांडे यांची २००४मध्ये गिनीज बुकातही नोंद झाली. रेशमगाठी, पैंजण या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले. याशिवाय त्यांनी द्विपात्री 'नटसम्राट' या नाटकातही काम केले. इ.स. २०००मध्ये वऱ्हाडकारांनी औरंगाबाद विद्यापीठातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. याच वर्षी त्यांची परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

वामन मल्हार जोशी

वामन मल्हार जोशी (जानेवारी २१, १८८२ - जुलै २०, १९४३) हे मराठी लेखक, पत्रकार होते. त्यांचा जन्म तत्कालीन कुलाबा जिल्ह्यातील (रायगड जिल्हा) तळा या गावी झाला होता. शालेय शिक्षण संपवून वा.म. जोशी पुण्यातील डेक्कन कॉलेजात आले आणि त्यांनी १९०४मध्ये बी.ए.ची आणि १९०६मधे एम.ए.ची पदवी मिळवली.

त्यांनंतर जोशी एका ‘राष्ट्रीय’ शाळेत शिक्षक झाले. (ब्रिटिश राज्यकर्ते असलेल्या भारतात ‘राष्ट्रीय’ शिक्षण देणार्‍या शाळांवर सरकारचा डोळा असे.) त्यानंतर जोशींनी विश्ववृत्त नावाचे ‘राष्ट्रीय’ मासिक काढले. त्या मासिकात ब्रिटिश राजकर्त्यांविरुद्ध मजकूर असलेमुळे सरकारने वा.म. जोशी यांना ३ वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली.

तुरुंगातून सुटल्यावर जोशी दैनिक केसरीचे दोन वर्षांसाठी संपादक झाले. पुढे १९१८मधे त्यांनी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात स्थापन केलेल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापकी सुरू केली. ते तेथे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, आणि इंग्रजी-मराठी साहित्य शिकवीत.

कालांतराने वा.म. जोशी हे पुण्याच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले..

इ.स. १९३०च्या मडगाव (गोवा) येथील सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद वा.म. जोशींनी भूषविले होते.

वीणा गवाणकर

वीणा गवाणकर (जन्म:६ मे, इ.स. १९४३ ) ह्या मराठी लेखिका आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा मुख्य विषय नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन आहे.

शिरीष कणेकर

शिरीष मधुकर कणेकर (६ जून, इ.स. १९४३; पुणे, महाराष्ट्र - हयात) हे मराठी लेखक, पत्रकार व कथनकार आहेत. ते विनोदी लेखन व क्रीडा पत्रकारिता यांसाठी ख्यातनाम आहेत.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव होय. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे कणेकरांचे लहानपण भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानामध्ये गेले. मुंबई विद्यापीठातून ते बी.ए.एल्‌एल्‌बी. झाले. त्यांचे कणेकरी, माझी फिल्लमबाजी हे विनोदी कथनाचे कार्यक्रम विशेष गाजले आहेत. क्रिकेट व चित्रपटसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील आवडीचे विषय असतात. सध्या (इ.स. २०११) ते मुक्त पत्रकार असून वृत्तपत्रांतून स्तंभलेखनही करतात.

श्रीकांत लेले

श्रीकांत लेले (१९४३) हे एक भारतीय धातू अभियंता आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे एक प्राध्यापक आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल मेटलर्जिमध्ये संशोधन केले आहे. त्यांच्या अभियांत्रिकी विज्ञानातील योगदाना साठी १९८७ साली त्यांना शांतीस्वरुप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.