इ.स. १९४२

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जानेवारी-जून

जुलै-डिसेंबर

जन्म

मृत्यू

अमरिंदर सिंह

कॅप्टन अमरिंदर सिंह (जन्म: मार्च ११, इ.स. १९४२) हे भारत देशातील राजकारणी व पंजाब राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरिंदर सिंह इ.स. २००२ ते इ.स. २००७ या काळात देखील पंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातीलच अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांचा पराभव केला.त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत.

२०१७ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अमरिंदर सिंहांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन (मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन, जन्म : ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत.१९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भूमिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात

आपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चौदा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे. अभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे. १९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.

अरुणा असफ अली

अरुणा असफ अली (जुलै १६, १९०८ - जुलै २९, १९९६) या स्वातंत्र्यसेनानी होत्या. त्यांचे मूळ नाव अरुणा गांगुली होय. इ.स. १९४२ सालच्या चले जाव आंदोलनात गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या राजकारणात सक्रीय होत्या. त्या १९५८ मध्ये दिल्लीच्या पहिल्या महापौर झाल्या. त्यांनी लिंक या नावाने प्रकाशन संस्था काढून वृत्तपत्रे, मासिके व पुस्तके प्रकाशित केली.

इ.स. १९४२ मधील चित्रपट

१९४२ साली प्रदर्शित झालेले चित्रपट येथे दिलेले आहेत.

किरण नगरकर

किरण नगरकर (इ.स. १९४२; मुंबई, महाराष्ट्र - मृत्यू : 5 सप्टेंबर 2019 ) हे मराठी आणि इंग्रजी भाषेत लिहिणारे आधुनिक लेखक, नाटककार, समीक्षक आहेत.

गोविंद राघो खैरनार

गोविंद राघो खैरनार ऊर्फ गो.रा. खैरनार (एप्रिल १४, इ.स. १९४२ - ) हे महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. असे करताना त्यांनी ह्या बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देणाऱ्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते राज्यकर्त्यांच्या काळ्या यादीत आले.

ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन

ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन हे शास्त्रज्ञ आहेत.

नामदेव धोंडो महानोर

नामदेव धोंडो महानोर (जन्म : पळसखेड-कन्नड तालुका-औरंगाबाद जिल्हा, १६ सप्टेंबर १९४२) हे मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार आहेत. मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. इतकेच नाही तर २४ मार्च २०१४ रोजी सुरू झालेल्या दशदिवसीय ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

पु ललथनहवला

पु ललथनहवला (जन्म: ६ मे १९४२) हे भारत देशाच्या मिझोरम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते मिझोरमच्या राजकारणामध्ये प्रदीर्घ कार्यरत असून त्यांनी ह्यापूर्वी दोन वेळा मुख्यमंत्रीपद भुषवले आहे.

भारत छोडो आंदोलन

चले जाव चळवळ १९४२, भारत छोडो आंदोलन किंवा ऑगस्ट क्रांती हे ऑगस्ट,इ.स. १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली.

तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्वे अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर

भिकोबा आप्पाजी साळुंखे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक स्वातंत्र्यसैनिक होते. ऑगस्ट २२, इ.स. १९४२ रोजी किवळ येथे भरलेल्या एका सभेत साळुंखे व काशिनाथ तांबवेकर यांनी रेल्वेगाड्या व दूरध्वनियंत्रणा साबोटाज करण्याचे आवाहन केले .

महादेव देसाई

महादेवभाई देसाई (जानेवारी १, इ.स. १८९२ - ऑगस्ट १५, इ.स. १९४२:पुणे) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते.

देसाई महात्मा गांधींचे अंगत सचिव होते.

मृदुला सिन्हा

मृदुला सिन्हा (जन्म: २७ नोव्हेंबर १९४२) ह्या भारत देशातील गोवा राज्याच्या विद्यमान राज्यपाल आहेत. त्या हिंदी भाषेमधील नावाजलेल्या लेखिका देखील आहेत.

वसंत आबाजी डहाके

वसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.

फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन (एससीएफ /

शेकाफे) ही इ.स. १९४२ मध्ये दलित समाजाच्या हक्कांसाठी व त्याच्या प्रचाराठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात स्थापन केलेली संस्था होती. त्यांनी इ.स. १९३० मध्ये डिप्रेस्ड क्लासेस फेडरेशन आणि इ.स. १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्ष ची स्थापना केली. शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनने यापैकी कोणत्या दोन संस्था यशस्वी केल्या आहेत याबद्दल भिन्‍न मते आहेत.

शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनचेच रूपांतर पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये झाले.

फाळणी नंतर पाकिस्तानमध्ये सुद्धा एससीएफ नावाचा पक्ष होती. रामनारायण रावत यांनी म्हटले आहे की, "एससीएफने इ.स. १९४७ च्या उत्तर प्रदेशातील 'राष्ट्रवादी' राजकारणात काँग्रेसला पर्याय उपलब्ध केला आहे".

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९३६ पासून ते १९४२ पर्यंत स्वतंत्र मजूर पक्षाच्या वतीने अस्पृश्य समाजाचे व मजूर वर्गाचे नेतृत्व केले. १९४२ मध्ये ब्रिटिश कॅबिनेटमंत्री सर स्टेफोर्ट क्रिप्स् भारतात आले. त्यांच्यापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची राजकीय कैफियत मांडली. त्यावेळी क्रिप्स् साहेब म्हणाले, “मजूर पक्ष जातीय राजकारणाचा पाठपुरावा करू शकत नाही. त्यांची कैफियत अस्पृश्यवर्गातर्फे तुम्ही मांडणे तुम्हांला तर्कनिष्ठ दिसते काय ? तुम्ही दुस-या जातीय संस्थेतर्फे कैफियत मांडा.त्यांच्या या वाक्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हक्काच्या संरक्षणासाठी स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याविषयी विचार केला.

सी. विद्यासागर राव

चेन्नामनेनी विद्यासागर राव (तेलुगू: చెన్నమనేని విద్యాసాగర్ రావు; जन्म: ४ फेब्रुवारी १९४२) हे भारतीय जनता पक्षाचे नेते व महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत. १९८५ ते १९९८ दरम्यान आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये राहिलेले राव १९९८ साली करीमनगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते.

ऑगस्ट २०१४ पासून विद्यासागर राव महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.