इ.स. १९४१

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

मृत्यू

Rabindranath Tagore in 1909
अजित वाडेकर

अजित वाडेकर (जन्म : १ एप्रिल १९४१; मृत्यू : १५ आॅगस्ट २०१८) हे भारतीय क्रिक्रेटसंघाचे खेळाडू आणि एकेकाळचे कप्तान होते.

अरुण साधू

अरूण साधू (जन्म : १७ जून १९४१ मृत्यू : २५ सप्टेंबर २०१७) हे मराठी भाषेतील लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक होते. त्यांनी रशियातील तसेच भारतातील सामाजिक व्यवस्थांवर विवेचक लेखन केले आहे. ऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

इ.स. १९४१ मधील चित्रपट

१९४१ साली प्रदर्शित झालेले चित्रपट येथे दिलेले आहेत.

क्रिस वॉटसन

जॉन क्रिस्चियन क्रिस वॉट्सन (९ एप्रिल, १८६७ - १८ नोव्हेंबर, १९४१) हा ऑस्ट्रेलियाचा तिसरा पंतप्रधान होता.

गेल ऑमव्हेट

डॉ. गेल ऑम्वेट (Gail Omvedt, [[जन्म : २ ऑगस्ट १९४१) या अमेरिकन वंशाच्या भारतीय समाजशास्त्रज्ञ व इतिहासकार आहेत. या महात्मा फुले, आंबेडकरवाद व मार्क्सवाद या डाव्या पुरोगामी चळवळीच्या अभ्यासक आहेत. त्यांचे ब्राह्मणेतर चळवळीच्या सामाजिक सांस्कृतिक उठावाचे व्यासंगी संशोधन प्रसिद्ध आहे.

मूळच्या अमेरिकेतील असलेल्या डॉ. गेल यांनी इ.स. १९८३ मध्ये भारतीय नागरिकत्व स्वीकारले. कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी एम.ए. पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. इ.स. २०१२ सालापासून त्या नवी दिल्ली येथील जामिया मिलिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक आहेत.

दलित चळवळीच्या इतिहासकार आणि अनेक संशोधकांना प्रेरणा देणाऱ्या अभ्यासक एलिनॉर झेलियट अमेरिकेतील ज्या ‘कार्लटन कॉलेज’मध्ये अध्यापन करीत, तेथेच गेल ऑम्वेट या विद्यार्थिनी होत्या.

जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर

जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर हे शास्त्रज्ञ आहेत.

डेव्हिड ग्रॉस

डेव्हिड जॉनाथन ग्रॉस (१९ फेब्रुवारी, १९४१ - ) हे अमेरिकन सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत. यांनी स्ट्रिंग थियरीमध्ये संशोधन केले आहे. ग्रॉस यांना फ्रँक विल्चेक आणि डेव्हिड पॉलित्झर यांच्याबरोबर ॲसिम्टोटिक Freedomचा (अनंतवर्ती मुक्तीचा) शोध लावल्याबद्दल २००४चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.

थियोडोर डब्ल्यू. हान्श

थियोडोर डब्ल्यू. हान्श हे शास्त्रज्ञ आहेत.

प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण

प्रभातसिंह प्रतापसिंह चौहाण (१५ जून, इ.स. १९४१:गोधरा, गुजरात - हयात) हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणी आहेत. हे २००९ आणि इ.स. २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये गुजरात राज्यातील पंचमहाल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.

बॉब टेलर

रॉबर्ट विल्यम टेलर ऊर्फ बॉब टेलर (जुलै १७, इ.स. १९४१ - हयात) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. १९७१ ते १९८१ सालांदरम्यान इंग्लंड क्रिकेट संघाकडून खेळताना टेलर यष्टिरक्षण करत असे. टेलर १९६१ ते १९८१ सालांदरम्यान डर्बीशायर क्रिकेट संघाकडून काउंटी क्रिकेटही खेळत असे. ५७ कसोटी व ६३९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने यष्ट्यांमागे १,४७३ झेल पकडले. संपूर्ण कारकिर्दीत यष्ट्यांमागून २,०६९ बळी टिपण्याची त्याची कामगिरी क्रिकेट-इतिहासात आजवरचा सर्वोच्च विक्रम आहे.

भास्कर रामचंद्र तांबे

भास्कर रामचंद्र तांबे (ऑक्टोबर २७, १८७३ - डिसेंबर ७, १९४१), अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत. भा.रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.

त्यांच्या काही प्रसिद्ध कविता

अजुनि लागलेचि दार

कशी काळ नागिणी

कळा ज्या लागल्या जीवा

कुणि कोडे माझे उकलिल का

घट तिचा रिकामा

घन तमीं शुक्र बघ

चरणि तुझिया मज देई

जन पळभर म्हणतील हाय हाय

डोळे हे जुलमि गडे

तिनी सांजा सखे मिळाल्या

तुझ्या गळा माझ्या गळा

ते दूध तुझ्या त्या

नववधू प्रिया मी बावरतें

निजल्या तान्ह्यावरी माउली

पिवळे तांबुस ऊन कोवळे

भाग्य उजळले तुझे

मधु मागशी माझ्या

मावळत्या दिनकरा

या बाळांनो या रे या

रे हिंदबांधवा थांब

माधव गुडी

पंडित माधव गुडी (जन्म : धारवाड, कर्नाटक, इ.स. १९४१; मृत्यू : हुबळी, कर्नाटक, २२ एप्रिल इ.स. २०११) हे हिंदुस्तानी संगीत शैलीतील गायक होते.

मालिनी राजूरकर

मालिनी राजूरकर (इ.स. १९४१ - हयात) या हिदुस्तानी संगीतातील मराठी गायिका आहेत. त्या ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीने गायन करतात.

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर

लक्ष्मण रामचंद्र पांगारकर (जन्म : चिपळूण, ३१ जुलै १८७२; मृत्यू : १० नोव्हेंबर१९४१) हे मराठी लेखक, संतसाहित्य अभ्यासक होते.

श्याम मनोहर

श्याम मनोहर उर्फ श्याम मनोहर आफळे (२७ फेब्रुवारी, इ.स. १९४१:तासगाव, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - ) हे मराठी भाषेतील एक साहित्यिक आहेत. त्यांना त्यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी इ.स. २००८चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. काँपिटिशन ही त्यांची पहिली कथा.श्याम मनोहर यांचे वडील मनोहर आफळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील क्षेत्रमाहुलीचे रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक होते. माहुली गावात आफळ्यांचे राहते घर आहे.

श्याम मनोहर हे पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून २००१ साली निवृत्त झाले.

मनुष्य स्वभावातील विसंगतींवर नेमके बोट ठेवून अतिशय वेगळ्या अंगाने व धाटणीने त्यांची मांडणी करणारे लिखाण, असे त्यांच्या लेखनाचे वर्णन केले जाते.त्यांनी ‘कादंबरी’ या वाड्‌मय प्रकाराची परिभाषाच बदलली, असे म्हटले जाते. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेल्या व्यक्ती, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सर्व माणसांसंबंधीची आस्था न सोडता ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने व्यक्त करतात. माणसांना त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न ते उभे करतात आणि अस्वस्थतेची तीव्र जाणीव निर्माण करतात. उपरोधप्रचुरता हे त्यांच्या कादंबरीलेखनाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य. त्यांचा उपरोध ते अतिशय साध्या पण अपेक्षित परिणाम साधणार्‍या भाषेतून प्रकट करतात.श्याम मनोहर यांनी आठ लघुकथासंग्रह, आठ नाटके व इतर अनेक विषयांवर लेखन केले आहे. त्यांच्या अनेक कादंबर्‍या, पुस्तके महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी सुचविण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या कथा-कादंबर्‍यांचे गुजराती, उर्दू, हिंदी, सिंधी, कन्नड आणि इंग्रजी यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.

श्रीनिवास दादासाहेब पाटील

श्रीनिवास दादासाहेब पाटील (जन्म: ११ एप्रिल १९४१) हे भारत देशाच्या महाराष्ट्रामधील एक राजकारणी आहेत. ते सातारा लोकसभा मतदारसंघातील विद्यमान संसद सदस्य आहेत. ते सिक्किम राज्याचे माजी राज्यपाल आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तेराव्या आणि चौदाव्या लोकसभेमध्ये कराड मतदारसंघातातून खासदार राहिलेले आहेत. ते भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी सुद्धा होते. ऑक्टोबर २०१९च्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी सातारा जिल्ह्यातील उदयनराजे भोसले यांचा पराभव केला.

साधु सिंग

साधु सिंग हे पंजाब राज्यातील फरीदकोट लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे खासदार आहेत.

सुशीलकुमार शिंदे

सुशीलकुमार संभाजीराव शिंदे (सप्टेंबर ४, इ.स. १९४१; सोलापूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. १६ जानेवारी इ.स. २००३ ते १ नोव्हेंबर, इ.स. २००४ या काळात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. २००४ ते इ.स. २००६ या कालखंडात ते आंध्र प्रदेशाच्या राज्यपालपदीही आरूढ होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात असून मनमोहनसिंग मंत्रिमंडळात गृह खात्याचे कॅबिनेट मंत्री होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून सलग नऊ वेळा अर्थसंकल्प मांडला. सलग साडेसहा वर्षे केंद्रीय ऊर्जामंत्री पदावर राहणारे व लोकसभेच्या नेतेपदी निवड होणारे ते पहिले मराठी नेता होत..

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.