इ.स. १९४०

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे
वर्षे: १९३७ - १९३८ - १९३९ - १९४० - १९४१ - १९४२ - १९४३
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जानेवारी-जून

जुलै-डिसेंबर

जन्म

मृत्यू

आल्ये

आल्ये (फ्रेंच: Allier; ऑक्सितान: Alèir) हा फ्रान्स देशाच्या ऑव्हेर्न्य प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या मध्य भागात वसला असून येथून वाहणाऱ्या आल्ये नदीवरून ह्याचे नाव देण्यात आले आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान इ.स. १९४० साली नाझी जर्मनीने फ्रान्सचा पराभव केला व येथे विशी फ्रान्स सरकार स्थापन केले. आल्ये विभागातील विशी ह्या गावात १९४० ते १९४४ दरम्यान विशी फ्रान्सची राजधानी होती.

इ.स. १९४० मधील चित्रपट

१९४० च्या दशकात प्रदर्शित झालेले चित्रपट येथे दिलेले आहेत.

कृष्णस्वामी कस्तुरीरंगन

कृष्णस्वामी कस्तुरीरंगन (ऑक्टोबर २०, १९४० - हयात) हे भारतीय अवकाश-शास्त्रज्ञ आहेत. ते १९९४ - २००३ सालांदरम्यान 'इस्रो' या भारतीय अवकाश-संशोधन संस्थेचे संचालक होते. तसेच ते २००३ - २००९ सालांदरम्यान राज्यसभेचे नियुक्त सदस्य होते.

कस्तुरीरंगन यांना सप्टेंबर २५, १९९९ रोजी त्यांना एच.के. फिरोदिया पुरस्कार जाहीर झाला.

के.जे. येशुदास

हिंदी भाषा चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक.

जे.जे. थॉमसन

जे.जे. थॉमसन हे ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञहोते

डेव्हिड शेफर्ड

डेव्हिड रॉबर्ट शेफर्ड (२७ डिसेंबर, इ.स. १९४० - २७ ऑक्टोबर, इ.स. २००९) हा ग्लाउस्टरशायरकडून काउंटी क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर शेफर्ड जगातील प्रसिद्ध क्रिकेट पंचांपैकी एक झाला. याने सर्वाधिक ९२ कसोटी सामन्यात आणि १७२ एकदिवसीय सामन्यांत पंचगिरी केली. शेफर्ड १९९६, १९९९ आणि २००३च्या क्रिकेट विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांत पंच होता.

तारो असो

तारो असो (सप्टेंबर २०, इ.स. १९४० - ) हा जपान देशाचा माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचा प्रमुख नेता आहे.

नेव्हिल चेम्बरलेन

आर्थर नेव्हिल चेम्बरलेन (इंग्लिश: James Ramsay MacDonald; मार्च १८, इ.स. १८६९ - नोव्हेंबर ९, इ.स. १९४०) हा एक ब्रिटीश राजकारणी व १९३७-४० दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. चेम्बरलेनला त्याच्या ॲडॉल्फ हिटलरचे लांगुलचालन करण्याच्या धोरणाबद्दल आणि म्युनिक करार करण्याबद्दल कुप्रसिद्धी मिळाली. या तहानुसार चेकोस्लोव्हेकियाचा सुडेटेनलांड प्रदेश नाझी जर्मनीच्या हवाली करण्यात आला. जर्मनीने केलेल्या पोलंडवरील आगळीकीनंतर चेम्बरलेनने सप्टेंबर ३, इ.स. १९३९ रोजी युद्ध पुकारले व पुढील आठ महिने युनायटेड किंग्डमचे नेतृत्त्व केले.

ब्रायन डेव्हिड जोसेफसन

ब्रायन डेव्हिड जोसेफसन हे शास्त्रज्ञ आहेत.

रमेश चंद्र लाहोटी

रमेश चंद्र लाहोटी हे भारताचे पस्तिसावे सरन्यायाधीश होते. १ जून २००४ पासुन १ नोव्हेंबर २००५ या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.

रावसाहेब रंगराव बोराडे

रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म : २५ डिसेंबर, इ.स. १९४०) हे मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार आहेत. इयत्ता १०वीत असतानाच त्यांनी लेखनास सुरुवात केली. साधी-सोपी आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी शैली हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य समजले जाते. त्यांच्या कथांचा शेवट धक्कादायक असतो. शेवटच्या धक्क्याने वाचक स्तंभित होतात. त्यांच्या कथांमधून ग्रामीण भागातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती भेटतात. त्यांनी लिहिलेल्या ’पाचोळा’ या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले आहे या साहित्यातून मराठवाडी बोलीचे अनेक विशेष प्रगट झाले आहे

शरद घनश्याम गोखले

शरद घनश्याम गोखले (मे २६, इ.स. १९४० - सप्टेंबर २०, इ.स. २०११) हे मराठी संगीत रंगभूमीवरील गायक-अभिनेते होते.

शरद पवार

शरद गोविंदराव पवार (डिसेंबर १२, इ.स. १९४० - हयात) हे मराठी, भारतीय राजकारणी आहेत. इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

शिवाजी गोविंदराव सावंत

शिवाजी गोविंदराव सावंत (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.

श्रीकांत सिनकर

श्रीकांत सिनकर (जन्म : ४ जानेवारी १९४०) हे मराठी लेखक होते. रहस्यकथांसाठी ते सुपरिचित आहेत.

ह.मो. मराठे

हनुमंत मोरेश्वर मराठे (जन्म : २ मार्च १९४० (अंदाजे; नकी तारीख हमोंनाही माहीत नव्हती. निधन : २ ऑक्टोबर २०१७ ) हे साधारणपणे ’हमो’ या नावाने ओळखले जाणारे मराठी पत्रकार, कादंबरीकार व कथा लेखक होते. वैचारिक नसलेल्या त्यांच्या काही कथा कादंबऱ्यांमधून उपरोधिक आणि विडंबनात्मक लेखनशैलीचा अनुभव येई.

हमोंना त्यांच्या बाबल नावाच्या भावाने वयाच्या १०-१२व्या वर्षी शाळेत घातले शिकून ते एम.ए. झाले आणि कोल्हापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापकी करू लागले. पण पुढे लेखन, वाचन, संपादन आणि साहित्य निर्मितीच्या क्षेत्रात ते स्थिरावले. त्यांचे पहिले साहित्य म्हणजे १९५६साली साप्ताहिक जनयुगाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली एक नाटिका. त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती साधना साप्ताहिकाच्या १९६९साली प्रसिद्ध झालेल्या ’निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ या कादंबरीने. ही कादंबरी पुढे १९७२साली पुस्तकरूपात आली. ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे.

ह.मो. मराठेंच्या ’काळेशार पाणी’ ही कादंबरीही आधी साधनात आणि नंतर पुस्तकरूपात प्रकाशित झाली. ’काळेशार पाणी’मधले काही प्रसंग वासना चाळवणारे, अश्लील आहेत असा आरोप व्हायला लागला. ना.सी. फडके यांनी या कादंबरीला ओंगळ, अलिच्छ आणि अश्लील ठरवून आगपाखड करायला सुरुवात केली. या कादंबरीमुळे वाचकांत दोन तट पडले. तरुणांचा गट हमोंच्या बाजूने आणि म्हाताऱ्यांचा विरुद्ध बाजूने. पुढे हे प्रकरण कोर्टात गेले. साधनाचे विश्वस्त एस.एम. जोशी यांनी १९७३च्या सुमारास, कादंबरीच्या बाजूने सुप्रीम कोर्टापर्यंत खटला लढवू असे जाहीर केले. पुढे महाराष्ट्रात ’पुलोद’ सरकार आल्यावर त्यांनी ’काळेशार पाणी’वरचा खटला मागे घेतला.

ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. .

१९४० उन्हाळी ऑलिंपिक

१९४० उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची बारावी आवृत्ती जपान देशाच्या टोक्यो शहरात खेळवली जाणार होती. ऐनवेळी जपानने ऑलिंपिक स्पर्धांमधून अंग काढून घेतल्यामुळे ही स्पर्धा फिनलंडच्या हेलसिंकीमध्ये हलवण्यात आली. परंतु दुसरे महायुद्ध सुरू झाल्यानंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

१९४० हिवाळी ऑलिंपिक

१९४० हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पाचवी आवृत्ती जपान देशाच्या सप्पोरो शहरात खेळवली जाणार होती. परंतु दुसर्‍या महायुद्धामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.