इ.स. १९१६

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे
वर्षे: १९१३ - १९१४ - १९१५ - १९१६ - १९१७ - १९१८ - १९१९
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

मृत्यू

अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह

अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह हे शास्त्रज्ञ आहेत.

एडवर्ड हीथ

सर एडवर्ड हीथ (इंग्लिश: Edward Richard George Heath) (जुलै ९, १९१६ - जुलै १७, २००५) हा १९७० ते १९७४ सालांदरम्यान युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान राहिलेला हुजूर पक्षीय राजकारणी होता. हीथ १९६५ ते १९७५ सालांदरम्यान हुजूर पक्षाचा पक्षनेता होता. हीथ पंतप्रधानपदी निवडले जाण्याची घटना हुजूर पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक मानली जाते, कारण हॅरोल्ड मॅकमिलन, ऍलेक डग्ल्स-होम इत्यादी उमराव मंडळींच्या नेतृत्वाची परंपरा लोपून हीथ व मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या केवळ गुणवत्तेच्या बळावर राजकारणात पुढे आलेल्या नेत्यांची सद्दी सुरू झाली.

एम.एस. सुब्बुलक्ष्मी

मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी ऊर्फ एम.एस. सुब्बुलक्ष्मी (तमिळ: மதுரை சண்முகவடிவு சுப்புலட்சுமி ; रोमन लिपी: M. S. Subbulakshmi) (१६ सप्टेंबर, इ.स. १९१६ - ११

डिसेंबर, इ.स. २००४) या मॅगसेसे पुरस्कार व भारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका होत्या.

कुंजम्मा हे त्याचे बालपणीचे लाडाचे नाव, त्यांच्या आई अक्कमलाई यासुद्धा नावाजलेल्या व्हायोलिन वादक होत्या , सुब्बलक्ष्मी त्यांच्या वीणावादक आईकडून प्राथमिक संगीत शिकल्या. सहाव्या इयत्तेत असतानाच शिक्षकांनी मार दिल्यामुळे सुब्बलक्ष्मी यांनी शिक्षण अर्धवट सोडून दिले. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या पहिल्या कॅसेटचे उदघाटन केले.

त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार असलेल्या त्यागराजन यांच्याशी त्या १९४० साली विवाहबद्ध झाल्या. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपले संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केले.

त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, सावित्री, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.

सुब्बलक्ष्मी यांच्यावर व्ही राजगोपाल यांनी दिग्दर्शित केलेला एक लघुपट आहे.

कोपा आमेरिका

कोपा आमेरिका (स्पॅनिश: Copa América) ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होतात. कॉन्मेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील २ संघांना आमंत्रित केले जाते. अमेरिका, कोस्टा रिका व मेक्सिको हे कॉन्मेबॉल बाहेरील संघ ही स्पर्धा अनेक वेळा खेळले आहेत.

कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

गॉफ व्हिटलॅम

एडवर्ड गॉफ व्हिटलॅम (Edward Gough Whitlam; ११ जुलै १९१६ - २१ ऑक्टोबर २०१४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा पंतप्रधान व मजूर पक्षाचा पक्षनेता होता. व्हिटलॅम १९७२ ते १९७५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

गो.नी. दांडेकर

गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (ज्यांना गोनीदा असेही म्हणतात)(जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

गोविंद बल्लाळ देवल

गोविंद बल्लाळ देवल (नोव्हेंबर १३, १८५५ -जून १४, १९१६) हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.

गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. देवल १९१३ साली गंधर्व नाटक मंडळीत गेले.

झैल सिंग

झैल सिंग हे भारताचे दहावे राष्ट्रपती होते.

फ्रांस्वा मित्तराँ

फ्रांस्वा मॉरिस एड्रियें मरी मित्तराँ (फ्रेंच: François Maurice Adrien Marie Mitterrand; ऑक्टोबर २५, इ.स. १९१६ - जानेवारी ८, इ.स. १९९६) हा इ.स. १९८१ ते १९९५ दरम्यान फ्रान्स देशाचा राष्ट्राध्यक्ष होता. पाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकामधील समाजवादी पक्षातर्फे निवडुन आलेला तो प्रथम राष्ट्राध्यक्ष होता.

बनारस हिंदू विद्यापीठ

बनारस हिंदू विद्यापीठ उत्तर प्रदेशमधील वाराणसी शहरातील विद्यापीठ आहे. याला काशी विश्वविद्यालय किंवा बीएचयू नावांनेही ओळखले जाते. येथे अंदाजे ३५,००० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बव्हंश विद्यार्थी येथील ७५ वसतीगृहांतून राहतात. या विद्यापीठांतर्गत ६ संस्था आणि १४ शाखा आणि सुमारे १४० विभाग आहेत. यातील माहिती तंत्रज्ञान शाखा आयटी-बीएचयू नावाने ओळखली जायची. २०१२मध्ये आयआयटीचा दर्जा दिला गेल्यावर या शाखेला आयआयटी-बीएचयू असे नाव दिले गेले. 1960 च्या सुमारास हैदराबाद निज़ाम- मीर उस्मान अली खानने 10 लाख रुपये दान केले. याची स्थापना १९१६ साली पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली होती.

बिस्मिल्ला खान

उस्ताद बिस्मिल्ला खाँ (जन्म : डुमराँव - बिहार, मार्च २१, १९१६ : मृत्यू : वाराणसी, ऑगस्ट २१, २००६) हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.

रामचंद्र धोंडीबा भंडारे

रामचंद्र धोंडीबा भंडारे (११ एप्रिल, इ.स. १९१६:विटा, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - ५ सप्टेंबर, इ.स. १९८८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून चौथ्या लोकसभेत आणि पाचव्या लोकसभेत मुंबई मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निष्ठावंत सहकारी होते.

तसेच यांनी ४ फेब्रुवारी इ.स. १९७३ ते

१५ जून, १९७६ या कालावधीत बिहारचे तसेच १९७६-१९७७ या कालावधीत आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहिले.

व्हिताली जिन्झबर्ग

व्हिताली जिन्झबर्ग हे शास्त्रज्ञ आहेत.

संशयकल्लोळ

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर, इ.स. १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.

या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग इ.स. १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.

सर परशुरामभाऊ महाविद्यालय

सर परशुरामभाऊ महाविद्यालय तथा एस.पी. कॉलेज पुण्यातील एक प्रतिष्ठित स्वायत (2019-20 पासून)

महाविद्यालय आहे. स.प महाविद्यालय ह्या नावाने ओळखले जाणारे हे महाविद्यालय इ.स. १९१६ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेने स्थापन केले आहे.

सुमती क्षेत्रमाडे

डॉ. सुमती बाळकृष्ण क्षेत्रमाडे' (२७ फेब्रुवारी, १९१६: झापडे, लांजा तालुका, रत्नागिरी, महाराष्ट्र - ८ ऑगस्ट, १९९८ , कोल्हापूर, महाराष्ट्र) या मराठीत कादंबरीलेखन करणाऱ्या एक लेखिका होत्या. त्यांच्या युगंधरा या कादंबरीवरून त्या प्रामुख्याने ओळखल्या जातात. त्यांच्या कादंबऱ्यातून त्यां स्त्रियांच्या पिळवणुकीबद्दल लिहीत असत. त्यांनी मराठी व गुजराती भाषेत विपुल लेखन केले. या व्यवसायाने डॉक्टर होत्या.

सुमती मुटाटकर

सुमती मुटाटकर(सप्टेंबर १०, इ.स. १९१६ - फेब्रुवारी २८, इ.स. २००७) या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ; तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.

हॅरल्ड विल्सन

जेम्स हॅरल्ड विल्सन, रीव्हॉलचा बॅरन विल्सन (इंग्लिश: James Harold Wilson, Baron Wilson of Rievaulx; ११ मार्च १९१६ - २४ मे १९९५) हा एक ब्रिटिश राजकारणी व दोन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

१९१६ उन्हाळी ऑलिंपिक

१९१६ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा जर्मनीच्या बर्लिनमध्ये आयोजीत करण्याचे ठरले होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे रद्द केली गेली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.