इ.स. १९०३

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक
दशके: १८८० चे - १८९० चे - १९०० चे - १९१० चे - १९२० चे
वर्षे: १९०० - १९०१ - १९०२ - १९०३ - १९०४ - १९०५ - १९०६
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

मृत्यू

अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन

अर्नेस्ट थॉमस सिंटन वाल्टन (६ ऑक्टोबर, इ.स. १९०३ - २५ जून, इ.स. १९९५) हा नोबेल पारितोषिक विजेता आयरिश भौतिकशास्त्रज्ञ होता.

अ‍ॅलेक डग्लस-होम

ॲलेक्झांडर फ्रेडरिक डग्लस-होम, हर्सेलचा बॅरन होम (इंग्लिश: Alexander Frederick Douglas-Home, Baron Home of the Hirsel; २ जुलै १९०३ - ९ ऑक्टोबर १९९५) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९६३ ते १९६४ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

के. कामराज

कुमारसामी कामराज (तमिळ: காமராசர்; १५ जुलै १९०३ - २ ऑक्टोबर १९७५) हे भारताच्या तमिळनाडू राज्यामधील एक राजकारणी व राज्याचे मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यसेनानी राहिलेले कामराज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते होते. १९५४ ते १९६३ दरम्यान तमिळनाडूचे मुख्यमत्रीपद व जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा सांभाळणार्‍या कामराजांनी १९६७ साली इंदिरा गांधींनी काँग्रेस (आय) हा नवा पक्ष स्थापन केल्यानंतर उर्वरित काँग्रेस पक्षाचे नेतेपद सांभाळले. त्यांच्या मृत्यूनंतर १९७६ साली भारत सरकारने त्यांना भारतरत्‍न पुरस्कार दिला.

तमिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता कमावलेल्या कामराज ह्यांच्या आदराप्रित्यर्थ चेन्नईच्‍या अंतर्देशीय टर्मिनलला त्यांचे नाव देण्यात आले आहे.

कैलास नाथ वांचू

कैलास नाथ वांचू (२५ फेब्रुवारी, इ.स. १९०३:अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत - इ.स. १९८८) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १२ एप्रिल, इ.स. १९६७ ते २४ फेब्रुवारी, इ.स. १९६८ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते अलाहाबाद आणि राजस्थान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

गंगाधर देवराव खानोलकर

गंगाधर देवराव खानोलकर (ऑगस्ट १९, इ.स. १९०३ - सप्टेंबर ३०, इ.स. १९९२) हे मराठी लेखक, चरित्रकार होते.

जॉन फोन न्यूमन

जॉन फोन न्यूमन (२८ डिसेंबर, इ.स. १९०३ - ८ फेब्रुवारी, इ.स. १९५७) हा हंगेरियन-अमेरिकन गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, संगणकशास्त्रज्ञ आणि संशोधक होता.

याचे मूळ नाव यानोस लायोस न्यूमन असे होते.

जॉर्ज ऑर्वेल

एरिक आर्थर ब्लेअर (इंग्लिश: Eric Arthur Blair), ऊर्फ जॉर्ज ऑर्वेल (इंग्लिश: George Orwell), (जून २५, इ.स. १९०३; मोतिहारी, बिहार, ब्रिटिश भारत - जानेवारी २१, इ.स. १९५०; लंडन, युनायटेड किंग्डम) हा इंग्लिश लेखक व पत्रकार होता. तीव्र बुद्धिमत्ता, चतुराई, सामाजिक विषमतेची सखोल जाण, एकाधिकारशाहीला कडवा विरोध, भाषेची सुस्पष्टता आणि लोकशाहीशी संलग्न असलेल्या समाजावादावरचा विश्वास इत्यादी वैशिष्ट्ये त्याच्या लेखनात आढळून येतात.

ऑर्वेलने लेखनात कल्पनाधारित, तत्त्वनिष्ठ पत्रकारिता, साहित्यिक समीक्षा आणि काव्य असे नाना लेखनप्रकार हाताळले. त्याची नाइंटीन एटी-फोर (इ.स. १९४९ साली प्रकाशित) ही कादंबरी आणि उपहासात्मक लघुकादंबरी अ‍ॅनिमल फार्म (इ.स. १९४५ साली प्रकाशित) ह्या विख्यात साहित्यकृती आहेत. विसाव्या शतकात ह्या दोन पुस्तकांनी खपाचा उच्चांक गाठला होता. स्पॅनिश यादवी युद्धकाळात रिपब्लिकनांच्या बाजूने स्वयंसेवक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवांवर त्याने होमेज टू कातालुन्या (इ.स. १९३८ साली प्रकाशित) हे पुस्तक लिहिले. त्याचे राजकारण, साहित्य, भाषा आणि संस्कृती या विषयांवरील अनेक निबंधही नावाजले गेले आहेत.

आधुनिक संस्कृती, राजकारणावरचा ऑर्वेलचा पगडा अद्यापही अबाधित आहे. त्याने भाषेला बहाल केलेल्या अनेक नवीन संज्ञांबरोबरच ऑर्वेलियन ही संज्ञा शब्दकोशांत समाविष्ट झालेली आहे.

थियोडोर मोम्सेन

क्रिस्चियन मॅथियास थियोडोर मोम्सेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८१७ - नोव्हेंबर १, इ.स. १९०३) हा जर्मन विद्वान, इतिहासकार, न्यायाधीश, पत्रकार, राजकारणी, पुरातत्त्वशास्त्रज्ञ व लेखक होता.

पोप लिओ तेरावा

पोप लिओ तेरावा (मार्च २, इ.स. १८१०:कार्पिनेतो रोमानो, इटली - जुलै २०, इ.स. १९०३:रोम) हा २५६वा कॅथोलिक पोप होता.

काउंट लोदोव्हिको पेचीच्या सात पैकी सहाव्या क्रमांकाच्या या मुलाचे नाव व्हिंसेंझो जियोचिनो रफाएल लुइगी पेची असे होते. व्हिंसेंझोने दिवाणी कायदा, दैवी कायदा व धर्मशास्त्रांमध्ये अशा तीन डॉक्टरेटच्या पदव्या मिळवल्या होत्या.

लिओ तेराव्याला कष्टकरी जनतेचा पोप असे म्हणतात.

भालचंद्र दिगंबर गरवारे

भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ?) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.

रामचंद्र श्रीपाद जोग

रामचंद्र श्रीपाद जोग (१५ मे, १९०३ - २१ फेब्रुवारी, १९७७) हे मराठी लेखक होते. हे १९६०मध्ये ठाणे येथे भरलेल्या ४२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. यांचे टोपणनाव निशिगंध आहे.

रॉबर्ट गॅस्कोन-सेसिल

रॉबर्ट आर्थर टॅलबोट गॅस्कोन-सेसिल, सॅलिस्बरीची तिसरा मार्के (इंग्लिश: Robert Gascoyne-Cecil, 3rd Marquess of Salisbury; २९ डिसेंबर १८०९ - १९ मे १८९८) हा एक ब्रिटिश राजकारणी व तीन वेळा युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता.

रोआल्ड आमुंडसन

रोआल्ड आमुंडसन (नॉर्वेजियन: Roald Amundsen ;) (१६ जुलै, इ.स. १८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक नॉर्वेजियन संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याच्याच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.

लेन हॉपवूड

जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

वॉरेन हार्डिंग

वॉरेन जी. हार्डिंग (मराठी लेखनभेद: वॉरन जी. हार्डिंग; इंग्लिश: Warren Gamaliel Harding) (२ नोव्हेंबर, इ.स. १८६५ - २ ऑगस्ट, इ.स. १९२३) हा अमेरिकेचा २९वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२१ ते २ ऑगस्ट, इ.स. १९२३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९०३ ते इ.स. १९०५ या कालखंडात ओहायोचा २८वा लेफ्टनंट गव्हर्नर होता, तर इ.स. १९१५ ते इ.स. १९२१ या कालखंडात याने अमेरिकेची सेनेट सभागृहात ओहायोचो प्रतिनिधित्व केले. इ.स. १८९९ ते इ.स. १९०३ या काळात हा ओहायो विधिमंडळाच्या संस्थानी सेनेटेचा निर्वाचित सदस्य होता.

पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला हार्डिंग रिपब्लिकन पक्षाचा सदस्य होता. पेशाने वृत्तपत्र-प्रकाशक असलेला व अमेरिकन सेनेटेचे सदस्यत्व चालू असताना अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडला गेलेला तो पहिला व्यक्ती ठरला.

पहिल्या महायुद्धाच्या अखेरीस जर्मनी व ऑस्ट्रियासोबत अमेरिकेने केलेल्या दोन निरनिराळ्या तहांवर त्याने सही केली. महायुद्धोत्तर काळात आंतरराष्ट्रीय तंट्यांची परिस्थिति हाताळण्यासाठी लीग ऑफ नेशन्स स्थापण्यात हार्डिंग प्रशासनाने पुढाकार घेतला.

ऑगस्ट, इ.स. १९२३मध्ये अलास्क्याहून परतत असताना कॅलिफोर्नियात सान फ्रान्सिस्को येथे हार्डिंग याचा अनपेक्षित मृत्यू झाला.

वॉल्टर हॅमंड

वॉल्टर रेजिनाल्ड वॉली हॅमंड (जून १९, इ.स. १९०३:डोव्हर, केंट, इंग्लंड - जुलै १, इ.स. १९६५:क्लूफ, क्वाझुलु-नटाल, दक्षिण आफ्रिका) हा इंग्लंड व ग्लूस्टरशायरकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतर क्रिकेट खेळलेला हॅमंड उजव्या हाताने फलंदाजी करणारा मधल्या फळीतील फलंदाज तसेच मध्यम-जलद गती गोलंदाज होता. हॅमंड स्लिपमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक होता.

शंतनुराव किर्लोस्कर

शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर (२८ मे, इ. स. १९०३ - २४ एप्रिल, इ. स. १९९४; पुणे, महाराष्ट्र ;) हे मराठी, भारतीय उद्योजक होते. किर्लोस्कर समूहाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर हे त्यांचे वडील होते.

सेसिल फ्रँक पॉवेल

सेसिल फ्रँक पॉवेल हे शास्त्रज्ञ आहेत.

पॉवेल, सेसिल फ्रँक : (५ डिसेंबर १९०३-९ ऑगस्ट १९६९). ब्रिटीश भौतिकीविज्ञ. १९५० सालाच्या भौतीकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. अणुकेंद्रीय प्रक्रियांच्या अभ्यासासाठी उपयुक्त असलेल्या छायाचित्रण तंत्राच्या विकासाकरिता व मेसॉन मूलकणांसंबंधीच्या [⟶ मूलकण] शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म टनब्रिज (केंट) येथे झाला. केंब्रिज येथील सिडनी सक्सेस कॉलेजातून १९२५ मध्ये पदवीधर झाल्यावर त्यांनी कॅव्हेडिश लॅबोरेटरीमध्ये सी. टी. आर्. विल्सन आणि ई. रदरफर्ड या विख्यात शास्त्रज्ञांच्या मार्गदर्नाखाली संशोधन करून १९२७ मध्ये पीएच्. डी. पदवी मिळविली. त्याच वर्षी ते ब्रिस्टल विद्यापिठात ए. एम्. टिंड्ल यांचे संशोधन साहाय्यक म्हणून रूजू झाले. त्याच विद्यापिठात अध्यापक, प्रपाठक व त्यनंतर १९४८ पासून भौतिकीचे एच्. ओ. विल्स प्रध्यापक व एच्. एच्. विल्स फिजिक्स लॅबोरेटरीचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या पदावरून मृत्यूपूर्वी काही काळ अगोदर ते निवृत्त झाले.

सुरूवातीला त्यांनी टिंड्ल यांच्याबरोबर धन आयनांच्या (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांच्या) गतिशिलतेचे अचूक मापन करण्याच्या तंत्राचा विकास करून बहुतेक सामान्य वायूंतील आयनांचे स्वरूप प्रस्थापित केले. १९३९-४५ या काळात त्यांनी व त्यांच्या सहकार्‍यांनी मूलकणांची वस्तुमाने, विद्युत भार व ऊर्जा मोजण्यासाठी त्यांचे मार्ग नोंदम्याकरिता छायाचित्रण पायसाचा [⟶ कण अभिज्ञातक] उपयोग करण्यासंबंधी अनेक प्रयोग केले. या पध्दतीचा उपयोग ⇨विश्वकिरणांच्या (बाह्य अवकाशातून येणार्‍या भेदक किरणांच्या) अभ्यासासाठी यशस्वीपणे करण्यात आला. यासाठी त्यांनी उंच पर्वतांवरील ठिकाणी तसेच उंच वातावरणात खास पातळ प्लॅस्टिकच्या फुग्यांतून विशिष्ट सुक्ष्मग्राही छायाचित्रण पायसयुक्त पट्ट्या पाठवून त्यांवर प्रथमिक विश्वकिरणांचे अचूक मार्ग नोंदविले. प्रयोगांतूनच १९४७ मध्ये जी. पी. एस्. ओखिअलिनी व इतर सहकार्‍यांच्या मदतीने पॉवेल यांनी‌ π-मेसॉन (पायॉन,π+) या मूलकणाचा शोध लावला. इलेक्ट्रॉनाच्या २७० पट स्थिर स्थितीतील वस्तुमान असलेल्या या कणाचे १९३५ मध्ये हीडेकी यूकावा यानी सैधदांतीक रीत्या भाकीत होते. पॉवेल यांच्या प्रयोगांमुळे या कणाचे अस्तित्व तर सिद्ध झलेच शिवाय त्याच्या क्षय होण्याच्या प्रक्रियेने μ - मेसॉन व न्यूट्रिनो हे दोन कण तयार होतात हेही समजून आले. पॉवेल यांनी प्रतिपायॉन (π-) हा मूलकण तसेच K – मेसॉनांच्या क्षयाच्या रीती शोधून काढल्या. वातावरणातील विश्वकिरणांच्या प्रपातांच्या निर्मितीचे विस्तृत स्पष्टीकरणही त्यानी मांडले. अणुकेंद्रीय संशोधनात (विशेषत: मूलकणांच्या संशोधनात) व विश्वकिरणांच्या अभ्यासात पॉवेल यांच्या छायाचित्रण तंत्रामुळे नवीन कार्यक्षेत्र निर्माण झाले.

ते ते रॉयल सोसायटीचे व रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्याना रॉयल सोसायटीचे ह्युज पदक (१९४९) व रॉयल पदक (१९६१), रशियाच्या अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे लमनॉसॉव्ह सुवरेणपदक ९१९६७) इ. बहुमान मिळाले. पॉवेल यांनी जी. पी. एस्. ओखिअलिनी यंच्याबरोबर न्यक्लिअर फिजिक्स इन फोटोग्राफ्स (१९४७) आणि जी. एच्. फउलर व डी. एच्. पर्किन्स यांच्याबरोबर स्टडी ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स बाय द फोटोग्राफिक मेथड (१९५९) हे ग्रंथ लिहीले.

अणुकेंद्रीय संशोधनासाठी यूरोपात जिनीव्हा येथे स्थापन झालेल्या संघटनेच्या (CERN) प्रयोगशाळेच्या वैज्ञानिक समितीचे ते तीन वर्ष अध्यक्ष होते. शास्त्रज्ञांच्या सामाजिक जबाबदारीची जाणिव झाल्यामुळे त्यांनी ⇨पगवॉश चळवळ सुरू करण्यात महत्त्वाचा भाग घेतला. तसेच ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ सायंटिफिक वर्कर्स या संघटनेचे अध्यक्ष होते.

इटलितील कोमो सरोवरावरील बेलानॉ या गावाजवळ ते मृत्यू पावले.

स्वामी रामानंद तीर्थ

स्वामी रामानंद तीर्थ (ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर) (ऑक्टोबर ३, १९०३ हे संन्यासी व हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे नेतृत्व करणारे चळवळकर्ते होते. रामानंद तीर्थ यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील सिंदगी या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षण सोलापूर येथील सरकारी शाळेत झाले. उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा या गावी गुरुकुलात ते कार्यरत होते. इ.स. १९३० मध्ये स्वामी नारायण तीर्थ यांनी रामानंदांना दीक्षा दिली व ते स्वामी रामानंद तीर्थ झाले. अंबेजोगाई या ठिकाणी त्यांनी योगेश्वरी नूतन विद्यालयाचे नूतनीकरण केले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.