इ.स. १८८९

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक
दशके: १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे
वर्षे: १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ - १८९२
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

जन्म

मृत्यू

एम. पतंजली शास्त्री

मंडकोलातुर पतंजली शास्त्री (४ जानेवारी, इ.स. १८८९:मंडकोलातुर, तिरुवन्नमलै जिल्हा, तमिळनाडू, भारत - १६ मार्च, इ.स. १९६३) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ७ नोव्हेंबर, इ.स. १९५१ ते ३ जानेवारी, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

ऑटो फ्रॅंक

ऑटो हेनरिक फ्रँक (किंवा 'पिम फ्रँक) (१२ मे, इ.स. १८८९ – १९ ऑगस्ट १९८०) हे एक ज्यूधर्मीय जर्मन व्यापारी व मार्गो फ्रँक आणि अ‍ॅन फ्रँक यांचे वडील होते. त्यांच्या परिवारातील ते एकटेच होलोकॉस्टमधून वाचले. अ‍ॅनच्या मृत्यूनंतर तिची दैनंदिनी त्यांना मिळाली व त्यांच्या प्रयत्नांमुळे इ.स. १९४७मध्ये द डायरी ऑफ अ यंग गर्ल प्रकाशित झाली. त्या दैनंदिनीच्या भाषांतरात तसेच त्यावर आधारित नाटक व चित्रपटांमध्येही त्यांचा सहभाग होता.

कसोटी सामना

कसोटी सामना हा क्रिकेटमधील खेळाचा सर्वात जुना प्रकार आहे.

केशव बळीराम हेडगेवार

केशव बळीराम हेडगेवार (एप्रिल १, १८८९ - जून २१, १९४०) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे संस्थापक होते.

केशवराव दाते

केशवराव दाते ( रत्‍नागिरी, २८ सप्टेंबर, इ.स. १८८९ - १३ सप्टेंबर, १९७१) हे मराठी नाट्यअभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. ते स्त्रीभूमिकाही करत.

खुदीराम बोस

खुदीराम बोस (बंगाली ক্ষুদিরাম বসু (लेखी) क्षुदीराम बसु (उच्चारी - खुदीराम बोशू) : भारतातील सर्वात तरुण वयाचा क्रांतिकारक म्हणून ओळखला जाणारा हा वीर वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाला. त्याचा जन्म बंगाल मधल्या मेदिनीपूर जिल्ह्यातल्या बहुवेनी या गावात दि. ३ डिसेंबर १८८९ ला झाला. त्याच्या लहानपणीच आई लक्ष्मीप्रियादेवी आणि वडील त्रैलोक्यनाथ यांचा मृत्यु झाल्याने त्याची मोठी बहीण अनुरूपादेवी आणि तिचे पती अमृतलाल यांनी त्याचे पालनपोषण केले.बंगाल प्रांताचे विभाजन करण्याचे ब्रिटिश सरकारने १९०३ साली निश्चित केले. सर्वसामान्य लोकांमध्ये नाराजीची तीव्र लाट पसरली. खुदीरामलाही बंगालच्या फाळणीचा निर्णय अन्यायकारक वाटला, देशासाठी काहीतरी करावे असे सारखे वाटू लागल्याने त्याने सशस्त्र क्रांतीचा मार्ग पत्करला. सरकारच्या विरूद्ध आंदोलने करणार्‍यांना पकडून कठोर शिक्षा देण्यात येऊ लागल्या. यात प्रमुख असणार्‍या न्यायाधीश किंग्ज फोर्ड ला मारूनच सरकारचा विरोध करण्याचे पक्के करण्यात आले. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील वंदे मातरम या गीताने लोकांमध्ये नव संजीवनी पसरविली.

ग्रोव्हर क्लीव्हलँड

स्टीफन ग्रोव्हर क्लीव्हलँड (इंग्लिश: Stephen Grover Cleveland) (१८ मार्च, इ.स. १८३७ - २४ जून, इ.स. १९०८) हा अमेरिकेचा २२वा (इ.स. १८८५ - इ.स. १८८९) व २४वा (इ.स. १८९३ - इ.स. १८९७) राष्ट्राध्यक्ष होता. दोन वेळा, परंतु विलग कार्यकाळांसाठी अध्यक्ष बनलेला तो एकमेव अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहे. त्यामुळेच राष्ट्राध्यक्षांच्या क्रमवारीत त्याची दोनदा गणना होते. अमेरिकेच्या राजकारणावर रिपब्लिकन पक्षाची पकड असलेल्या इ.स. १८६० ते इ.स. १९१२ या प्रदीर्घ कालखंडात राष्ट्राध्यक्षपदी बसलेला तो एकमेव डेमोक्रॅट राजकारणी होता. अध्यक्ष बनण्यागोदर इ.स. १८८३ ते इ.स. १८८५ या कालखंडात तो न्यू यॉर्क संस्थानाचा गव्हर्नर होता.

चार्ली चॅप्लिन

सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलर ला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले.

या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.

जमनालाल बजाज

जमनालाल बजाज (नोव्हेंबर ४, १८८९ - फेब्रुवारी ११, १९४२) हे बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक व गांधीवादी कार्यकर्ते होते.

जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

जेम्स प्रेस्कॉट जूल

जेम्स प्रेस्कॉट जूल (२४ डिसेंबर, इ.स. १८१८:सालफोर्ड, लँकेशायर, इंग्लंड - ११ ऑक्टोबर, इ.स. १८८९) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि मद्यउत्पादक होता.

नारायण हरी आपटे

नारायण हरी आपटे (जन्म :समडोळी-सांगलीजिल्हा; ११ जुलै, इ.स. १८८९- मृत्यू कोरेगांव, नोव्हेंबर १४, इ.स. १९७१) हे मराठी लेखक होते. त्यांचे शिक्षण समडोळीला आणि नंतर सातारा येथे झाले.

नारायण हरि आपटे यांनी मुख्यत: कादंबर्‍या लिहिल्या असल्या, तरी त्यांच्या लघुकथासंग्रह आणि वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे . त्यांनी जवळपास पस्तीस कादंबर्‍या लिहिल्या आहेत. त्यांतल्या थोड्याशा ऐतिहासिक सोडल्या तर बाकीच्या सामाजिक कादंबर्‍या आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंख्या सुमारे ७५ इतकी आहे.

‘किर्लोस्कर खबर’ या नियतकालिकाचे ते काही काळ सहसंपादक होते. कोरेगावहून त्यांचे स्वत:चे ‘मधुकर’ नावाचे मासिक प्रसिद्ध होत असे.

न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५) या त्यांच्या काही प्रसिद्ध सामाजिक कादंबऱ्या होत. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यापैकी अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत. आराम-विराम (१९३४) आणिबनारसी बोरे हे त्यांचे कथासंग्रह. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्गालम् (१९४९) यांसारख्या ग्रंथांतून संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन इ. विषयांसंबंधी विवेचन त्यांनी केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.

नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाटय़ावर मांडली. ट्रेलरची पद्धत कुंकु चित्रपटापासुन सुरु झाली ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.

(खालील मजकुर वरुन साभार http://www.lokprabha.com/20110923/mumbai-talkies.htm)

""""

कुंकु सिनेमा गाजला तो, शांतारामबापूंचे कल्पक निर्देशन यामुळे तसेच पाश्र्वसंगीतासाठी वाद्यांऐवजी नैसर्गिक ध्वनींचा कल्पकतापूर्वक प्रयोग, या परशुरामचे ‘मन सुद्ध तुझं..’ हे लोकप्रिय गाणे, शांता आपटेंनी केलेला मीरेचा सहजसुंदर अभिनय, केशवराव दातेंनी रंगविलेला जरठ काकासाहेब, ‘कुंकू’ आणि हिंदीतील ‘दुनिया ना माने’ हा चित्रपट सिनेउद्योगातील मलाचा दगड ठरला. १९३७ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ प्रदíशत झाला. गिरगाव रोडच्या कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ने आपले बस्तान ठोकले. ‘कुंकू’ हा कृष्ण सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणून नोंद झाला. ‘दुनिया न माने’ हा एक्सेलसियरला लागलेला पहिला हिंदी चित्रपट होता.

या आधी नारायण हरी आपटे यांच्याच ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (१९३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिन्दुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत.

नारायण हरी आपटे यांच्याच ‘रजपूत रमणी’ कादंबरीवर प्रभातने ‘रजपूत रमणी’ (१९ ३६) चित्रपट तयार केला. यात मानसिंहाची भूमिका नानासाहेब फाटकांनी तर सौदामिनीची भूमिका नलिनी तर्खडने केली होती. केशवराव धायबरने दिग्दíशत केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला.

त्यांच्या कथांवरून काही चित्रपट बनले आहेत. ‘भाग्यरेखा’ हा चित्रपट ना.ह.आपट्यांच्या ‘पाच ते पाच’ या कथेवरून केला होता. चित्रपटाची पटकथा, गीते आणि दिग्दर्शन शांताराम आठवले यांचे होते. त्या चित्रपटात १९४२ सालच्या चळवळीतील भूमिगत क्रांतिकारकांचे खडतर साहसी जीवन दाखवले होते. सामान्यांचा क्रांतिकारकांना मिळणारा सक्रिय व धाडसी पाठिंबा, भाकरी मोर्चा सारखे सामाजिक लढे, आदर्श, ध्येयनिष्ठ प्रेम, मोहाच्या क्षणातून उद्भवलेला कुमारी माता हा पेचप्रसंग, हे सर्व दाखवणारे आणि "निर्भयतेने जीवन जगा" असा संदेश देणारे हे राजकीय पार्श्वभूमी असलेले चित्रण होते. चित्रपट फारच उत्तम बनला होता, परंतु महात्मा गांधींचा खून झाला, आणि दंगे, जाळपोळ यांत चित्रपटाची वाताहत झाली. """"

कुंकू हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. 'महाराष्ट्र टाईम्स' आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली होती. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्स'ने स्वत:च केली होती. वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली त्यात ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी निवडली गेली.

१९६२ सालच्या सातारा येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. अध्यक्ष बॅरिस्टर न.वि.गाडगीळ होते.

कोरेगाव येथे ते १४ नोव्हेंबर, इ.स. १९७१ रोजी निवर्तले.

बांगुई

बांगुई ही मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या दक्षिण भागात युबांगी नदीच्या उत्तर किनाऱ्यावर वसले आहे. नदीच्या पलीकडे काँगोचे झोंगो हे शहर स्थित आहे.

बांगुईची स्थापना फ्रेंचांनी १८८९ साली केली.

बेंजामिन हॅरिसन

बेंजामिन हॅरिसन (इंग्लिश: Benjamin Harrison) (२० ऑगस्ट, इ.स. १८३३ - १३ मार्च, इ.स. १९०१) हा अमेरिकेचा २३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १८८९ ते ४ मार्च, इ.स. १८९३ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा वाहिली. अमेरिकेचा ९वा अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन याचा हा नातू होता. अमेरिकन यादवी युद्धात लढणार्‍या युनियन सैन्यात हा ब्रिगेडियर जनरल पदावर होता. यादवीनंतर इंडियाना संस्थानाचा प्रतिनिधी म्हणून हा अमेरिकेची सेनेट सभागृहावर निवडून गेला.

ब्राझीलचे साम्राज्य

ब्राझीलचे साम्राज्य हे १९व्या शतकातील एक साम्राज्य होते.सध्याचा ब्राझील व उरुग्वे हे दोन देश मिळून हा देश तयार होत असे. हे साम्राज्य डोम पेद्रो पहिला व त्याचा मुलगा पेद्रो दुसरा याच्या हाताखाली होते. हे दोघेही या साम्राज्याचे अनुक्रमे पहिले व शेवटचे सम्राट होते.

मेहर चंद महाजन

मेहर चंद महाजन (२३ डिसेंबर, इ.स. १८८९:टिका नगरोटा, कांगरा जिल्हा, भारत - इ.स. १९६७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते ४ जानेवारी, इ.स. १९५४ ते २२ डिसेंबर, इ.स. १९५४ या कालावधीत सरन्यायाधीश होते.

त्याआधी ते जम्मू आणि काश्मीरचे पंतप्रधान होते. महाजन हे भारत आणि पाकिस्तानमधील सीमा ठरविणाऱ्या रॅडक्लिफ कमिशनमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी होते. जम्मू काश्मीरच्या भारतातील विलीनीकरणात त्यांचा भाग होता. त्यांनी लाहोर प्रदेशाऐवजी गुरदासपूर प्रदेश भारतात शामील करुन घेण्याचा निर्णय घेतला होता.

विष्णू सखाराम खांडेकर

विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी ११, १८९८ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते.

सहजानंद सरस्वती

स्वामी सहजानंद सरस्वती (१८८९ - १९५०) हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील शेतकरी नेते होते. हे दशनामी आखाड्याचे संन्यासी असून संस्कृत पंडित आणि लेखक होते. त्यांनी भगवद्गीतेवर भाष्य केले. हे भाष्य मोबाइल ॲपवर उपलब्ध आहे. त्यांनी गीता आणि मार्क्सवाद यांचा तुलनात्मक अभ्यास करणारा एक ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्यावर शंकराचार्यांपासून मार्क्सपर्यंतचा प्रभाव होता. गीतेतच खरा मार्क्सवाद आणि साम्यवाद सापडतो अशी त्यांची भूमिका दिसते. ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कॉ. नंबुद्रीपाद यांचा आदर करीत. त्यांनी पूर्व-मीमांसा, वेदान्त, भागवत, शंकराचार्य, मार्क्सवाद, गांधीवाद आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, इ. क्षेत्रांत काम केले. भाष्यग्रंथांच्या आधारे नव्हे तर जीवनानुभवाच्या आधारे गीता समजते हे त्यांचे मुख्य प्रतिपादन आहे.

त्यांनी अखिल भारतीय किसान सभा या संघटनेच्या स्थापनेचे काम केले.

१८८९ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा

१८८९ विश्व बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही विल्हेल्म श्टाइनिट्स व मिखाईल चिगोरिन यांत झाली. यात विल्हेम श्टाइनिट्स विजयी झाला.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.