इ.स. १७७१

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक
दशके: १७५० चे - १७६० चे - १७७० चे - १७८० चे - १७९० चे
वर्षे: १७६८ - १७६९ - १७७० - १७७१ - १७७२ - १७७३ - १७७४
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

जन्म

अलॉइस सेनेफेल्डर

अलॉइज सेनेफेल्डर (१७७१-१८३४) या बव्हेरियन मुद्रक आणि संशोधकाचा जन्म प्रेग(झेकोस्लाव्हाकिया) येथे झाला. हा एक यशस्वी नट आणि नाटककार होता. इ‌.स. १७९६ मध्ये तेलकट खडूने ओल्या दगडावर लिहिताना त्याला अचानक शिळामुद्रणाची युक्ती सुचली. अनेक प्रयत्नांनंतर छपाई जमायला लागल्यावर त्याने म्युनिच येथे स्वतःचा शिळाप्रेस काढला. तो पुढे तेथील रॉयल प्रिंटिग प्रेसचा संचालक झाला. त्याने ऑफेनबाख(Offenbach) येथे मुद्रणकला शिकवण्यासाठी एक संस्था काढली.

ओटो फॉन बिस्मार्क

ओटो फॉन बिस्मार्क (जर्मन: Otto von Bismarck; ऑटो एडुआर्ड लिओपोल्ड, बिस्मार्कचा युवराज व लॉरेनबर्गचा ड्युक; १ एप्रिल १८१५ - ३० जुलै १८९८) हा जर्मन साम्राज्याचा पहिला चान्सेलर व तत्कालीन युरोपातील एक प्रभावी नेता होता. प्रशियाचा राष्ट्रप्रमुख असणाऱ्या बिस्मार्कने इ.स. १७७१ साली संपलेल्या युद्धात फ्रान्सचा पराभव केल्यानंतर अनेक जर्मन भाषिक राज्यांचे एकत्रीकरण करून शक्तिशाली जर्मन साम्राज्याची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.

आपल्या त्याच्या धोरणी व प्रभावी नेतृत्व तसेच शांतताप्रिय परराष्ट्रधोरणांमुळे युरोपात शांततेचे वातावरण टिकून राहिले. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मला बिस्मार्कचे शांतीवादी विचार पटले नाहीत व त्याने १८९० साली त्याने बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतरच्या काळात वसाहतवादी विचारांच्या विल्हेल्मने झपाट्याने लष्करबळ वाढवून जर्मनीला पहिल्या महायुद्धाकडे ढकलले.

करवंद

करवंद (इंग्रजीत Karanda; हिंदीत करौंदा, करुम्चा: शास्त्रीय नाव: कॅरिसा कंजेस्टा) हे एक काळ्या रंगाचे छोटे फळ आहे. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहण्यात येतात. एप्रिल आणि मे हा हे फळ लागण्याचा काळ आहे. कच्ची करवंदे तोडल्यानंतर पांढऱ्या रंगाचा चीक येतो आणि तो हाताला चिकटतो. ही फळे जूनच्या सुमारास पाऊस सुरू झाल्यावर गळून जातात. करवंदांची चटणी करतात आणि शिवाय त्यांच्यापासून सरबत, लोणचे, मोरंबा वगैरे करता येतो.

करवंदांची Carissa spinarum नावाची जी जात आहे ती जम्मू-काश्मीर व पंजाबमध्ये कुंपणासाठी आणि सुगंधी फुलांसाठी लावतात. हिच्या पानांमध्ये भरपूर टॅनिन असते. Carissaa carandas ही जात भारतात सर्वत्र उगवते.

हे मध्यम आकाराचे काटेरी झाड असते. पण चांगलाच फल्लर(झुडूपासारखे)वाढते. करवंदा झाड लवकर मोठे होत नाही. खूप हळूहळू वाढते. शेळ्या-बकऱ्या या झाडाचा पाला खात नाहीत. तसेच काटेरी झाड असल्याने कुप (कुंपण) करण्याच्या कामी येते.

कोकाकु

सम्राट कोकाकु (जपानी:光格天皇, कोकाकु-तेन्नो) (२३ सप्टेंबर, इ.स. १७७१ - ११ डिसेंबर, इ.स. १८४०) हा जपानचा ११९वा सम्राट होता. हा १७८० ते १८१७ पर्यंत सत्तेवर होता.

मंगोपार्क

मंगोपार्क (जन्म - १८ सप्टेंबर १७७१; मृत्यु - इ.स. १८०६) हा एक स्कॅाटीश प्रवासी होता. त्याने एकोणिसाव्या शतकात सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या नायजर नदीचा संपूर्ण प्रवाह शोधून काढला. तसेच टिंबकटू या आफ्रिकन शहरास भेट देणारा तो पहिलाच युरोपियन होता.

मद्रासचा तह

मद्रासचा तह (इंग्रजीत: Treaty of Madras, ट्रीटी ऑफ मद्रास) हा पहिल्या इंग्रज-म्हैसूर युद्धाची परिणती म्हणून म्हैसूरचा राज्यकर्ता हैदरअली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात ३ एप्रिल, इ.स. १७६९ रोजी मद्रास (वर्तमान चेन्नई) येथे झालेला एक तह होता.

वॉल्टर स्कॉट

सर वॉल्टर स्कॉट (ऑगस्ट १५, इ.स. १७७१ - सप्टेंबर २१, इ.स. १८३२) हा स्कॉटलँडचा इंग्लिश साहित्यिक होता.

सामुएल हानेमान

ख्रिच्शन फेड्रिक सामुएल हानेमान (इ.स. १७५५-इ.स. १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला. १७८४ मद्धे तरुण वयातच त्यांना ड्रेसडेन

येथे सर्जन जनरल चि जागा मिळाली, त्यांनी त्यावेळी जुनाट व्रणरोगावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला व हाडांच्या व्रणावर एक नवीन औषधी प्रक्रिया बसवली. सन १७९२ च्या अगोदर त्यांनी फ्रेंच, इंग्लिश व इटालीअन भाषांतून निरनिराळ्या १८ वैद्यक ग्रंथाचे भाषांतर केले, १७८४ मद्धे त्यांनी जुन्या आजारावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला, या ग्रंथात त्यांनी असाध्य समजल्या जाणारया जुन्या रोगांवर जलोपचार व मसाजने मालिश करून रोगाचे हरण करण्याची पद्धतीबाबत माहिती दिली आहे. होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्येमलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला.

सामुएल हानेमान यांना रसायनशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी या विषयावर पुष्कळ लेख लिहिले आहेत. त्यांनी १७९३ व १७९९ च्या दरम्यान औषधी शास्त्रविषयकबरेच नवे ग्रंथ लिहिले. तेव्हापासून त्यास वैद्यकशास्त्रात प्रमाणभूत मानू लागले. १८१० साली ते लैप्झीक शहरी आले आणि होमिओपथिक औषधांचाच व्यवसाय करु लागले. १८१२ साली त्यांना लैप्झीक युनिव्हर्सिटीच्या वैद्यक शास्त्रावरील प्रोफेसरची जागा मिळाली आणि त्यांचा व्यवसाय फार जोमाने वाढू लागला. हे पाहून त्यांचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे तेथील सर्व ॲलोपॅथिक लोक व केमिस्ट लोक एकवटले आणि त्यांनी

सामुएल हानेमान यांच्यावर १८२० मध्ये एक खटला केला. जर्मनीत त्या वेळी असा कायदा होता की, डॉक्टर लोकांनी डिस्पेन्स (औषध तयार करावे. हानेमान साहेब एम.डी. पास झालेले डॉक्टर असल्यामुळे त्यांनी औषध तयार करणे हे त्यावेळच्या कायद्याच्या विरुद्ध होते म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला व त्यांना औषध तयार करणे व देणे यावर बांधी घालण्यात आली. यानंतर सामुएल हानेमान यांनी लैप्झीक सोडले आणि ऑस्ट्रिया येथील अनाल्ट कोएथन येथे गेले.तेठीक ड्युक फर्डिनंड यांनी त्यांना त्यांच्या राज्यात होमिओपथिक औषधे तयार करण्याचा अधिकार दिला व पुढे त्यांच्या औषधांनी रोग्यास उत्तम गुण आल्याचे पाहुन १८२२ मद्धे त्यास राज्यमंत्री हि पदवी दिली.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.