इ.स. १०१८

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १० वे शतक - ११ वे शतक - १२ वे शतक
दशके: ९९० चे - १००० चे - १०१० चे - १०२० चे - १०३० चे
वर्षे: १०१५ - १०१६ - १०१७ - १०१८ - १०१९ - १०२० - १०२१
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

जन्म

कुडलसंगम, सोलापूर

हत्तरसंग कुडलसंगम हे महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यामधील दक्षिण सोलापूर तालुक्यात असलेलेल स्थळ आहे. भीमा व सीना या दोन नद्यांचा संगम असून अत्यंत जुनी हेमाडपंती संगमेश्वर आणि हरिहरेश्वर मंदिरे आहेत. कुडल शब्द कन्नड असून त्याचा अर्थ संगम आहे. येथील मंदिरात इ.सन.१०१८ (शके ९४०) मधील पहिला मराठी शिलालेख आहे.

संगमेश्वर मंदिराच्या सभामंडपाच्या तुळईवर इ.स १०१८ (शक ९४० ) मध्ये कोरला असल्याची नोंद आहे. सोलापुरातील इतिहास संशोधक आनंद कुंभार यांनी हा शिलालेख शोधून काढला आहे. हा शिलालेख ‘माय मराठी’च्या उत्पत्ती संशोधनात महत्वाचा गाभा ठरतो आहे. ९९७ वर्षांपूर्वी कोरण्यात आलेला हा शिलालेख मराठी भाषेतील आद्यग्रंथ श्री ज्ञानेश्वरीच्याही १८२ वर्षे जुना असल्याचे पुरावे मिळाले आहेत. संशोधक कुंभार यांनी शिलालेखाच्या दिलेल्या पुराव्याला पुण्याचे इतिहास संशोधक डॉ. शं. गो. तुळपुले वि. ल. भावे यांनीही यास पुष्टी दिली आहे. तसेच, हाच शिलालेख सर्वात पुरातन असल्याचा दावा केला आहे.

श्रवणबेळगोळचीच अजूनही नोंद

आजपर्यंतमराठीतील सर्वात जुना शिलालेख कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील श्री गोमटेश्वराच्या पायाजवळ असल्याचे मानण्यात येतो. परंतु तो इ.स १०३९ (शक ९०५) शतकातील असून कुडलचा शिलालेख इ.स १०१८ मधील असल्याचा उल्लेख या शिलालेखावर आहे.

शिलालेखाचा आकारमान

शिलालेखाचीलांबी ९४ तर रुंदी १६ सेंमी आहे. तुळईची शिळा घडीव असून खोदण्यापूर्वी ती घासून गुळगळीत करून घेतल्याचे दिसते. शिलालेखावरील अक्षरांची उंची सुमारे सेंमी आहे. यावर कोरलेला हा अंक नागमोडी वळणातील त्या काळातील लिपीतील असल्याने बोध होत नाही. पण नागपूरचे डॉ. वा. वि. मिराशी यांनी अशाच प्रकारचा अंक दिवेआगार येथील ताम्रपटात आहे असे स्पष्ट केले आहे.

असा आहे उल्लेख

हत्तरसंगकुडल येथील या शिलालेखावर अडीच ओळी लिहिल्या आहेत. पहिली ओळ ‘स्वस्ति श्री शके ९४० कालयुक्त संवत्सरे माघ कधनुळिकाळ छेळा’ तर दुसरी ओळ ‘पंडित गछतो आयाता मछ मि छिमळ नि १०००’ अशी संस्कृतमधील आहे. शेवटच्या तिसऱ्या ओळीत ‘यवाछि तो विजेया हो ऐवा’ असे स्पष्ट मराठीत कोरले आहे.

आद्य शिलालेख

शिलालेखवरीलसंदेश अर्थपूर्ण आहे.तसेच शिलालेखात एका दानशूराने त्याकाळी चलनात असलेले हजार निष्क देणगी दिल्याचा उल्लेख आहे. हाच आद्य मराठी शिलालेख असल्याचे आता सिद्ध झाले आहे. आनंदकुंभार, ज्येष्ठ इतिहास संशोधक हत्तरसंग कुडल येथील शिलालेखावर मराठी भाषेत लिहिलेल्या अडीच ओळी.

पोप व्हिक्टर दुसरा

पोप व्हिक्टर दुसरा (इ.स. १०१८ - जुलै २८, इ.स. १०५७) हा एप्रिल १३, इ.स. १९५५पासून मृत्यूपर्यंत पोपपदी होता.

हा पोप होण्या आधी काल्व, टॉलेन्स्टाइन आणि हर्शबर्गचा काउंट होता.

मराठी भाषा

मराठीभाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. मराठी भाषा ९ व्या शतकापासून प्रचलित असून, मराठी भाषेची निर्मिती संस्कृतपासून झालेल्या महाराष्ट्री, प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.