इ.स.पू.चे ५ वे शतक

सहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक
शतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक
दशके: पू. ४९० चे - पू. ४८० चे - पू. ४७० चे - पू. ४६० चे - पू. ४५० चे
पू. ४४० चे - पू. ४३० चे - पू. ४२० चे - पू. ४१० चे - पू. ४०० चे
वर्ग: जन्म - मृत्यू - शोध
स्थापत्य - निर्मिती - समाप्ती
अंगुलिमाल

अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितच्या राज्यातील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव 'अंगुलिमाल' पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व ते अंगुलिमालास भेटले तेव्हा अंगुलिमालाने हत्या करण सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.

गौतम बुद्धांचे कुटुंब

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, नेपाळमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.

त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराशी विवाह केला आणि नंतर दोघांना एक मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते. यशोधरा आणि राहुल हे दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले.

त्यांचा चुलत भाऊ आनंद हे भिक्खू संघात सामील होऊन बुद्ध सेवक बनले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.