इ.स.चे १६ वे शतक

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १५ वे शतक - १६ वे शतक - १७ वे शतक
दशके: १५०० चे - १५१० चे - १५२० चे - १५३० चे - १५४० चे
१५५० चे - १५६० चे - १५७० चे - १५८० चे - १५९० चे
वर्ग: जन्म - मृत्यू - शोध
स्थापत्य - निर्मिती - समाप्ती
चिनी साहित्यातील सर्वोत्तम चार अभिजात कादंबऱ्या

{四大名著 ; फीनयीन:} sì dà míng zhù, सी ता मिंग चू ; इंग्लिश: Four Great Classical Novels, फोर ग्रेट क्लासिकल नॉव्हेल्स ;)

चिनी साहित्यात प्रभावी मानल्या जाणार्‍या अशा सर्वोत्तम चार अभिजात कादंबर्‍या आहेत. ललित साहित्यातील मानदंड समजल्या जाणार्‍या या कादंबर्‍यांवरून प्रेरणा घेऊन ललितकला माध्यमांत अनेक कथा, कविता, नाटके, चित्रपट, दृक्कला इत्यादी नव्या निर्मिती झाल्या असून चीन, जपान, कोरिया, व्हिएतनाम इत्यादी पूर्व आशियातील कलाक्षेत्रावर त्यांचा मोठा प्रभाव पडल्याचे आढळते.

कालक्रमानुसार त्या चार कादंबर्‍या खालीलप्रमाणे आहेत

सान कुओ यान यी, अर्थात तीन राज्यांमधील प्रणयकथा, (चिनी: 三國演義; फीनयीन: sān guó yǎn yì ;) (इ.स.चे १४ वे शतक)

ष्वी हू च्वान, अर्थात दलदलीत राहणारी माणसे, (चिनी: 水滸傳; फीनयीन: shuǐ hǔ zhuàn ;) (इ.स.चे १४ वे शतक)

शी यौ ची, अर्थात पश्चिमेकडील यात्रा, (चिनी: 西遊記; फीनयीन: xī yóu jì ;) (इ.स.चे १६ वे शतक)

होंगलौ मंग, अर्थात लाल महालातील स्वप्न (चिनी: 紅樓夢; फीनयीन: hóng lóu mèng ;) (इ.स.चे १८ वे शतक)

पहिला फिलिप, फ्रान्स

पहिला फिलिप (फ्रेंच: Philippe Ier;) (मे २३, इ.स. १०५२ - जुलै २९, इ.स. ११०८) हा इ.स. १०६० सालापासून मृत्यू पावेपर्यंत फ्रान्साचा राजा होता. त्याने स्वतःचा बाप पहिला हेन्री याच्या कारकिर्दीत क्षीण झालेल्या राज्याची पुनरुत्थानाची प्रक्रिया आरंभली.

रायगड (किल्ला)

रायगड किल्ला हा भारताचा महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. इथे अलीकडे पर्यटकांचा संख्येत वाढ झ़ाली आहे.

सांख्य दर्शन

सांख्य दर्शन हे भारतीय षट्‌ दर्शनांमधील एक दर्शन आहे. अथर्ववेदाच्या काळातच सांख्य दर्शन आकारास आले. कठ,श्वेताश्वतर, प्रश्न व मैत्रायणी या प्राचीन उपनिषदांवर सांख्य दर्शनाचा मोठा प्रभाव आहे. उपनिषद काळानंतर भारतीयांच्या विचारसरणीत सांख्य दर्शनाला महत्त्व मिळाले. कपिल हा सांख्य दर्शनाचा प्रवर्तक आहे. या दर्शनाने पहिल्या प्रथम तत्त्वांची गणना केली. गणनेला संख्या म्हणतात. संख्येला प्राधान्य दिल्यामुळे या दर्शनाला सांख्य असे नाव मिळाले. सांख्य शब्दाच्या इतर व्याख्येनुसार संख्या म्हणजे विवेकज्ञान होय. प्रकृती व पुरुष यांच्या बाबतीत अज्ञान असल्यामुळे माणूस जन्म-मरणाच्या फेऱ्यात सापडतो. पण जेव्हा माणसाला पुरुष हा प्रकृतीपासून भिन्न व स्वतंत्र आहे, असे ज्ञान होते तेव्हा त्याला मोक्षाची प्राप्ती होते. या विवेक ज्ञानाला प्राध्यान्य असल्यामुळे या दर्शनाला सांख्य हे नाव पडले. प्रकृती व पुरुष ही दोन मूलभूत तत्त्वे या दर्शनात मानल्यामुळे हे द्वैतवादी दर्शन आहे. प्राचीन काळातील विचारविश्वावर या दर्शनाचा खूपच प्रभाव पडला होता. म्हणून याचा प्रवर्तक महर्षी कपिल याला प्रथम दार्शनिक असे गौरवाने संबोधले गेले आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.