इसोरोकु यामामोतो

हे जपानी नाव असून, आडनाव यामामोतो असे आहे.
Isoroku Yamamoto
इसोरोकु यामामोतो (इ.स. १९४३ सालापूर्वी)

इसोरोकु यामामोतो (जपानी भाषा: 山本 五十六, यामामोतो इसोरोकु) (एप्रिल ४, इ.स. १८८४ - एप्रिल १८, इ.स. १९४३) हा जपानचा दर्यासारंग होता. हा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानी आरमाराचा सरसेनापती तसेच नेव्हल मार्शल जनरल या पदांवर होता.

यामामोतो जपानच्या शाही आरमारी अकादमी तसेच हार्वर्ड विद्यापीठाचा (इ.स. १९१९-१९२१) विद्यार्थी होता.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस यामामोतो सरसेनापतीपदावर होता. याने पर्ल हार्बर आणि मिडवेच्या लढायांचे नियोजन केले होते. युद्धाच्या ऐनभरात अमेरिकेच्या गुप्तहेरांनी याच्या विमानाचा मार्ग अचूक हेरला व अमेरिकन वायुसेनेने हे विमान तोडून पाडले. यातच यामामोतोचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

एप्रिल ४

एप्रिल ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ९४ वा किंवा लीप वर्षात ९५ वा दिवस असतो.

मिडवेची लढाई

मिडवेची लढाई (जपानी:ミッドウェー海戦) ही दुसऱ्या महायुद्धांतर्गत प्रशांत महासागराच्या रणांगणावरील सगळ्यात महत्त्वाची लढाई होती. जून ४ ते जून ७ १९४२ दरम्यान लढल्या गेलेल्या या लढाईत अमेरिकेच्या आरमाराने जपानी आरमाराचा निर्णायक पराभव केला. मिडवे अटॉलवरील जपानी हल्ला परतवून लावताना अमेरिकेच्या आरमाराने जपानच्या समुद्री शक्तीवर प्राणांतिक घाव घातला. याला समुद्री युद्धांतील सगळ्यात धक्कादायक आणि निर्णायक हल्ला समजले जाते.ही लढाई कॉरल समुद्राच्या लढाईनंतर साधारणपणे एका महिन्यात झाली. या सुमारास अमेरिकन आरमाराने प्रशांत महासागरात आपली पकड बसविणे सुरू केलेले होते. यातून सुटका करण्यासाठी व अमेरिकेला पर्ल हार्बरवरील हल्ल्याप्रमाणे अचानक गाठून त्याचे बल कमी करण्यासाठी जपानने सर्वशक्तिसह अमेरिकेच्या मिडवे अटॉलवरील आरमारावर हल्ला करण्याचे ठरवले. हा हल्ला सफल झाल्यास जपानला प्रशांत महासागरातून हालचाली करण्यास मुक्तहस्त मिळाला असता आणि कदाचित अमेरिकेने प्रशांत महासागरातून हार मानून काढता पायही घेतला असता.मिडवेला नांगरलेल्या अमेरिकेच्या विमानवाहू नौकांना बाहेर खेचून नेस्तनाबूद करण्याचा व एकदा या विमानांचा धोका नष्ट झाला की मिडवेवर चढाई करून तेथे तळ उभारुन प्रशांत महासागरात आपले हातपाय पसरण्याचा जपानचा कावा होता. मिडवे नंतर सामोआ व फिजीवरील जपानी हल्ल्यांची तयारीही सुरू होती. परंतु अमेरिकेला याचा आधीच सुगावा लागला व त्यांनी जपानी आरमारालाच आपल्या जाळ्यात खेचण्याचा बेत रचला. हल्ला झाल्यावर अमेरिकेचे प्रत्युत्तर काय असेल याचा जपानी सेनापतींनी बांधलेला अंदाजही चुकला.

या लढाईत अमेरिकेते एक विमानवाहू नौका व एक विनाशिका गमावली तर जपानी आरमाराच्या चार विमानवाहू नौका व एक जड क्रुझर नष्ट झाल्या. या लढाईमुळे तसेच सोलोमन द्वीपांतील लांबलेल्या लढाईमुळे जपानी जहाजबांधणीचा वेग व जपानी आरमाराचा जहाजे गमावण्याचा वेग यांत बरेच अंतर पडले व जपानी आरमार दुबळे होऊ लागले. दुसरीकडे अमेरिकेने आपल्या आरमाराचे बल वाढवण्यास सुरुवात केली व प्रशांत महासागरात वर्चस्व स्थापले.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.