इळैयराजा

इळैयराजा (इंग्रजी: Ilaiyaraaja तमिळ : இளையராஜா,उच्चार-इळैयराजा ) (जन्म नाव : डॅनिअल राजैय्या. जन्म दिनांक : जून २ १९४३ तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय संगीतकार, गीतकार व गायक आहेत.१९७० सालापासुन दक्षिण भारतीय संगीतात अत्यंत मोलाचे योगदान ,विशेषतः तमिळ चित्रपट संगीत. हे "ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्यूझीक", लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत तसेच गेल्या ३० वर्षांच्या काळात त्यांनी विविध भाषातील ९०० (त्यातील ४५० हुन अधिक चित्रपट तमिळ भाषेतील आहेत.) हुन् अधिक चित्रपटातुन ४५०० हुन अधिक गाणी संगीतबद्ध केली आहेत प्रसिद्ध संगीतकार. फेब्रुवारी ११ १९९९ रोजी त्यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला.

एंगा तंबी (चित्रपट)

एंगा तंबी हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक तमिळ चित्रपट आहे.

कार्तिक राजा

कार्तिक राजा (तमिळ : கார்த்திக் ராஜா) ( जन्म : चेन्नई, तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक आहेत ,तसेच ते प्रसिद्ध संगीतकार इळैयराजा यांचे चिरंजीव आहेत.

की ॲन्ड का

की ॲन्ड का हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. आर. बाल्कीचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटात अर्जुन कपूर व करीना कपूर ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. की ॲन्ड काच्या कथानकामध्ये पती-पत्नीच्या संसारिक जबाबदाऱ्या उलट्या दाखवल्या असून पत्नी करीना कपूर नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना तर पती अर्जून कपूर गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या भूमिकेत चमकला आहे.

की ॲन्ड कामध्ये अमिताभ बच्चन व जया बच्चन हे पाहुणे कलाकार म्हणून झळकले आहेत.

तिकिट खिडकीवर की ॲन्ड काला प्रेक्षकांचा माफक प्रतिसाद मिळाला.

गंगै अमरन

गंगै अमरन (तामिळ: கங்கை அமரன்) हा एक भारतीय संगीत दिग्दर्शक, पार्श्वगायक, गीतकार व चित्रपट दिग्दर्शक आहे. तो प्रसिद्ध तामिळ संगीतकार इळैयराजा ह्याचा धाकटा भाऊ असून प्रामुख्याने तमिळ सिनेमामध्ये कार्यरत आहे.

तमिळ पार्श्वसंगीतकारांची यादी

ही तमिळ पार्श्वसंगीतकारांची यादी आहे:

गंगै अमरन

भारद्वाज (संगीतकार)

कलोनिअल कझिन्स

डी.इम्मन

देवा (संगीतकार)

श्रीकांत देवा

दरन (संगीतकार)

श्रृती हासन

इळैयराजा

हॅरिस जयराज

लालगुडि जयरामन

करुणास

जि.व्ही.प्रकाशकुमार

के.व्ही.महादेवन

शंकर महादेवन

निरु

आर.पी. पटनाईक

सुरेश पिटर्स

देवी श्री प्रसाद

ए.आर.रहमान

कार्तिक राजा

युवन शंकर राजा

टि.के.राममूर्ती

एस.राजेश्वर राव

ए.आर.रिहाना

साबेश-मुरली

शंकर गणेश

व्ही.सेल्वागणेश

शंकर-एहसान-लॉय

आर.के. शेखर

दमन

एल.वैद्यनाथन

जेम्स वसंतन

विद्यासागर (संगीतकार)

विजय ऍंटनी

विजया टि.राजेंदर

एम.एस.विश्वनाथन

युगेन्दरन

युवन शंकर राजा

युवन शंकर राजा (तमिळ: யுவன் சங்கர் ராஜா ; जन्म ऑगस्ट ३१, १९७९ चेन्नई, तमिळनाडू) एक प्रसिद्ध दक्षिण भारतीय तमिळ संगीतकार,पार्श्वसंगीतकार,गीतकार व गायक आहेत ,तसेच ते प्रसिद्ध संगीतकार इळैयराजा यांचे चिरंजीव आहेत.लहानपणापासुनच संगीताची पार्श्वभूमी लाभल्यामुळे त्यांनी वयाच्या १६व्या वर्षी संगीताच्या कारकिर्दीस प्रारंभ केला.दक्षिण भारतातील अनेक संगीत क्षेत्रातील पुरस्कार त्यांनी संपादित केले आहेत.त्यांची स्वतःची अशी एक संगीतशैली आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.