इबेरियन द्वीपकल्प

इबेरियन द्वीपकल्प (स्पॅनिश: Península Ibérica), किंवा इबेरिया हा नैऋत्य युरोपातला एक द्वीपकल्प आहे ज्यावर स्पेन, पोर्तुगालआंदोरा हे तीन देश स्थित आहेत. इबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस व आग्नेयेस भूमध्य समुद्र तर उत्तर, दक्षिण व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. पिरेनीज ही पर्वतरांग इबेरियाची ईशान्येकडील सीमा ठरवतात. दक्षिणेला आफ्रिकेचा उत्तर किनारा इबेरियापासून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.

Iberian map europe
युरोपच्या नकाशावर इबेरियन द्वीपकल्प
स्पेन sat
इबेरियन द्वीपकल्पाचे उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

इबेरिया हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. रोमनपूर्व काळात या भागात राहणाऱ्या लोकांच्या स्थानिक भाषेत नदीसाठी जो शब्द वापरला जात होता त्यातून ’इबर’ या शब्दाचा उगम झाला असावा असे मानले जाते. या द्वीपकल्पातल्या सर्वात मोठ्या नदीला रोमनांनी इबर नदी (Iberus Flumen; सध्याची एब्रो नदी) असे नाव दिले. तसेच सध्याच्या उएल्वा राज्यात इबेरोस नावाचे एक गाव असल्याचा आणि या गावाजवळून वाहणारी इबेरुस नावाची एक नदी असल्याचा उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये सापडतो. त्यामुळे इबेर नदीचा प्रदेश म्हणून या द्वीपकल्पास इबेरिया नाव मिळाले असावे.

इटालियन द्वीपकल्प

इटालियन द्वीपकल्प (इटालियन: Penisola italiana) हा दक्षिण युरोपामधील तीन मोठ्या द्वीपकल्पांपैकी एक आहे (इबेरियन द्वीपकल्प व बाल्कन हे इतर दोन). इटली ह्या देशाचा मोठा भाग ह्या द्वीपकल्पावरच स्थित आहे. तसेच सान मरिनो व व्हॅटिकन सिटी हे दोन सार्वभौम देश देखील इटालियन द्वीपकल्पावर वसले आहेत.

१,३१,३३७ चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या इटालियन द्वीपकल्पाच्या उत्तरेला आल्प्स पर्वतरांग, पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, दक्षिणेस आयोनियन समुद्र तर पश्चिमेस तिऱ्हेनियन समुद्र हे भूमध्य समुद्राचे उपसमुद्र आहेत. नैऋत्येस सिसिली हे मोठे इटालियन बेट मेसिनाच्या सामुद्रधुनीने प्रमुख भूमीपासून अलग केले आहे.

स्पेन

स्पेन (स्पॅनिश:(España)एस्पान्या) (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती|es'paɲa), अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र (स्पॅनिश:Reino de España रेइनो दे एस्पान्या) हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासुन सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.