इटली


इटली हा दक्षिण युरोपातील एक देश आहे. हा देश विकसित देशांपैकी एक असून तो जी-७चा सदस्य आहे. इटली चे क्षेत्रफळ ३,०१,२५३ चौ.किमी एवढे आहे. लिरा हे इटली चे चलन असून इटली ची साक्षरता ९७ टक्के आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून इटालियन ही प्रमुख भाषा आहे. रोम ही इटलीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हा देश गंधकाच्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांकावर आहे.इटली तील प्रमुख खेळ फुटबॉल आहे.[१][२]

इटली
रिपुब्लिका इतालियाना
इटालियन प्रजासत्ताक
इटलीचा ध्वज इटलीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: -
राष्ट्रगीत: इल कांतो देल्यी इतालियानी
(इटालियन लोकांचे गीत)
इटलीचे स्थान
इटलीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
रोम
अधिकृत भाषा इटालियन
इतर प्रमुख भाषा फ्रेंच, जर्मन
सरकार
 - राष्ट्रप्रमुख ज्योर्जिओ नापोलितानो
 - पंतप्रधान मात्तेओ रेंत्सी
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस मार्च १७, १८६१ (एकत्रीकरण) 
 - प्रजासत्ताक दिन जून २, १९४६ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,०१,३१८ किमी
 - पाणी (%) २.४
लोकसंख्या
 -एकूण ५,८७,५१,७११ (२२वा क्रमांक)
 - घनता १९२.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १.६६८ खर्व अमेरिकन डॉलर (७वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न २८,७६० अमेरिकन डॉलर (२१वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन युरो (EUR)
आंतरराष्ट्रीय कालविभाग मध्य युरोपीय प्रमाणवेळ (CET) (यूटीसी +१/+२)
आय.एस.ओ. ३१६६-१ IT
आंतरजाल प्रत्यय .it
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +३९
राष्ट्र_नकाशा

इतिहास

इटलीचा इतिहास, विशेषतः लिखित इतिहास, अनेक सहस्रके जुना आहे. रोमन व रोमन-पूर्व काळापासून इटली हे युरोपमधील सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेला देश समजला जात असे.[३]

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

इटलीच्या उत्तरेस स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, फ्रान्सस्लोव्हेनिया हे देश आहेत. पूर्वेस एड्रियाटिक समुद्र, पश्चिमेस तिर्‍हेनियन समुद्रदक्षिणेस भूमध्य समुद्र आहे.

राजकीय विभाग

Italy.geohive
इटलीचे राजकीय विभाग.

इटली देशाची २० विभागांमध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. यांपैकी पाच विभाग स्वायत्त आहेत व त्यांना आपल्या स्थानिक व्यवहाराशी निगडीत कायदे करण्याची मुभा आहे. हे २० विभाग एकूण १०९ प्रांतात विभागलेले आहेत व प्रांत ८,१०१ कोमुनी अथवा पंचायतींमध्ये विभागलेले आहेत.

प्रमुख शहरे

समाजव्यवस्था

धर्म

इटलीमध्ये रोमन कॅथोलिक धर्माचे लोक सर्वात जास्त संख्येने आहेत. रोमपासून जवळच असणारी व्हॅटिकन सिटी ही कॅथोलिक धर्मियांसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र मानली जाते. व्हॅटिकन सिटीला एका स्वतंत्र सार्वभौम राज्याचा दर्जा आहे आणि या राज्याचे महापौर पोप आहेत. एका तर्‍हेने व्हॅटीकन सिटीला कॅथोलिक धर्माची राजधानी मानले जाते. इटलीमध्ये प्रोटेस्टंट ख्रिस्ती धर्मासारख्या इतर शाखांचे लोकही कमी-अधिक प्रमाणात आहेत.

संस्कृती

अर्थव्यवस्था

इटालियन लिरा हे इटलीचे जुने चलन होते. आता युरोपिअन युनियनमधील इतर बहुतेक देशांप्रमाणे इटलीमध्येही युरो हे चलन आहे. २००६मध्ये इटलीची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर होती. इटलीमधून निर्यात होणार्‍या गोष्टींमध्ये मोटारगाड्या, शस्त्रास्त्रे यांचा समावेश आहे. याचबरोबर मिलान येथे तयार होणारे अत्याधुनिक फॅशनचे कपडे, हँडबॅग इ. यांना जागतिक स्तरावर मागणी आहे. येथील अरमानी, गुच्ची आणि व्हॅलेंतिनो यांच्यासारखे फॅशन जगतातील उद्योजक त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळ्या उत्पादनांसाठी जगप्रसिद्ध आहेत. याखेरीज इटलीच्या गावांमध्ये असलेल्या द्राक्षांच्या बागांमध्ये तयार होणार्‍या निरनिराळ्या प्रकारच्या वाइन पाश्चिमात्य जगात विशेष लोकप्रिय आहेत.

निसर्गरम्य प्रदेश आणि दोन हजारांहून अधिक वर्षांच्या संस्कृतीचे वेधक अवशेष यांच्यामुळे पर्यटन हा इटलीच्या अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे. इटली जगातील पाचवे मुख्य पर्यटन स्थळ मानले जाते.

खेळ

संदर्भ

  1. ^ "Italy profile - Overview". BBC News (en-GB मजकूर). 2015-12-17. 2018-10-13 रोजी पाहिले.
  2. ^ "The World Factbook — Central Intelligence Agency". www.cia.gov (en मजकूर). 2018-10-13 रोजी पाहिले.
  3. ^ Centre, UNESCO World Heritage. "Rock Drawings in Valcamonica". whc.unesco.org (en मजकूर). 2018-10-13 रोजी पाहिले.
इटली फुटबॉल संघ

इटली फुटबॉल संघ हा इटली देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. आजवर ४ वेळा फिफा विश्वचषक जिंकण्याचा (१९३४, १९३८, १९८२ व २००६) विक्रम करणाऱ्या इटली संघाचा ह्या बाबतीत जगात दुसरा क्रमांक लागतो (ब्राझिल खालोखाल). तसेच इटलीने १९६८ साली अजिंक्यपद यूरो स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे. १९३६ बर्लिन ऑलिंपिकमध्ये इटली फुटबॉल संघाने सुवर्ण तर १९२८ ॲमस्टरडॅम व २००४ अथेन्स स्पर्धेमध्ये कांस्य पदक मिळवले.

ऑलिंपिक खेळात इटली

इटली देश १९०० सालापासून १९०४ सेंट लुईस स्पर्धेचा अपवाद वगळता सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून इटालियन खेळाडूंनी आजवर एकूण ६६४ पदके जिंकली आहेत.

जर्मन भाषा

जर्मन भाषा (जर्मन: Deutsch; उच्चार: डॉइच) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील भाषा असून ती जर्मनीची प्रमुख भाषा आहे.

जगभरात ९.५ - १२ कोटी लोक 'प्रथम भाषा' म्हणून व २ कोटी लोक 'द्वितीय भाषा' म्हणून जर्मनचा वापर करतात. भाषिक लोकसंख्येनुसार जर्मन भाषेचा जगभरातील भाषांमध्ये १०वा क्रमांक आहे. जर्मनला अधिकृत राजभाषेचा दर्जा ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, युरोपियन युनियन, जर्मनी, इटली, लाइश्टेनस्टाइन, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड व नामिबिया या देशात/संस्थात आहे.

२००० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२००० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री फॉर्म्युला वन हंगामातील मोटर शर्यत होती.

२००२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२००२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री फॉर्म्युला वन हंगामातील मोटर शर्यत होती.

युरोपातील देश व संस्थाने
देश व भूभाग
अन्य भूभाग
अंशत: मान्य देश

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.