इंग्लिश भाषा

इंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलियान्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषाशासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

Anglospeak
निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही प्रमुख व शासकीय भाषा आहे व फिकट निळ्या रंगाने दर्शविलेल्या भागात इंग्लिश ही केवळ शासकीय भाषा आहे

३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.

इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

EN English Language Symbol ISO 639-1 IETF Language Tag Icon
EN (ISO 639-1)

स्वर

IPA Description मराठी उच्चार (सर्वसाधारण) इंग्लिश शब्द इंग्लिश स्पेलिंगसाठी अक्षर/अक्षरे
en:monophthongs
i/i: en:Close front unrounded vowel machine ae (æ), e, ee, ea, ei, ie, i, ey, oe (œ).
ɪ en:Near-close near-front unrounded vowel bit i, ie, y, ey, ui.
ɛ en:Open-mid front unrounded vowel र्‍हस्व ए red e, ea, a, ai, ay.
æ en:Near-open front unrounded vowel cat a
ɒ en:Open back rounded vowel र्‍हस्व ऑ hot o, ua, au, ou, ow
ɔ: en:Open-mid back rounded vowel दीर्घ ऑ c'aught a, or, ore, ough, oor, aw, al, oar, ough, o, ar
ɑ/a: en:Open back unrounded vowel father a, au, ah, al.
ʊ en:Near-close near-back rounded vowel put u, o, ou, oo, ui
u/u: en:Close back rounded vowel rule u, oo, o, ou, ui, ew, eau, oe, wo
ʌ/ɐ en:Open-mid back unrounded vowel, en:Near-open central vowel र्‍हस्व अ cut u, o, ou, oo, oe
ɝ/ɜ: en:Open-mid central unrounded vowel दीर्घ अ bird er, ir, ur, or, ear, our
ə en:Schwa above a, ar, e, er, o (unstressed)
ɨ en:Close central unrounded vowel अतिर्‍हस्व इ rosez es, i
en:diphthongs
en:Close-mid front unrounded vowel
en:Close front unrounded vowel
एऽ/*एइ gate a, ay, ai, ey, ea
oʊ/əʊ en:Close-mid back rounded vowel
en:Near-close near-back rounded vowel
home o, ow, oa, ou
en:Open front unrounded vowel
en:Near-close near-front rounded vowel
ऐ/आइ time i, y, igh, ei, uy
en:Open front unrounded vowel
en:Near-close near-back rounded vowel
औ/आउ house ou, ow
ɔɪ en:Open-mid back rounded vowel
en:Close front unrounded vowel
*ऑइ spoil oi, oy

व्यंजने

bilabial ओष्ठ्य Labiodental दन्त्योष्ठ्य dental दन्त्य alveolar वर्त्स्य post-
alveolar परा-वर्त्स
palatal तालव्य velar कण्ठ्य glottal काकल्य
plosive स्पर्श p प b ब t *त--ट d द--ड k क g ग
nasal अनुनासिक m म n न ŋ ङ
flap उत्क्षिप्‍त ɾ र
fricative संघर्षी f फ़ v व्ह θ थ ð द s स z ज़ ʃ श ʒ झ h ह
affricate स्पर्श-संघर्षी tʃ च dʒ ज
en:approximant अर्धस्वर w *व ɹ र j य
lateral approximant पार्श्विक l ल, ɫ ल

इथे * चा अर्थ हा उच्चार साधारणपणे इंग्रजी भाषेत वापरला जात नाही.

ध्वनि-अक्षर संबंध

IPA इंग्लिश अक्षर |इतर भाषात
p p
b b
t t, th (rarely) thyme, Thames th thing ( African-American, New York)
d d th that ( African-American, New York)
k c (+ a, o, u, consonants), k, ck, ch, qu (rarely) conquer, kh (in foreign words)
g g, gh, gu (+ a, e, i), gue (final position)
m m
n n
ŋ n (before g or k), ng
f f, ph, gh (final, infrequent) laugh, rough th thing (many forms of English used in England)
v v th with ( en:Cockney, en:Estuary English)
θ th : there is no obvious way to identify which is which from the spelling.
ð
s s, c (+ e, i, y), sc (+ e, i, y)
z z, s (finally or occasionally medially),
अगरू

अगरूला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -

संस्कृत-अगरु; अगुरु

हिंदी भाषा-अगर

बंगाली-अगर

गुजराती-अगर

मल्याळम-अकिल

तमिळ-

तेलगु-अगर

इंग्लिश भाषा-Eaglewood

लॅटिन- Aquilaria agallocha(malaccensis)

आमिर खान

आमिर खान (जन्म: १४ मार्च १९६५) हा एक भारतीय अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे. गेली सुमारे २५ वर्षे बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेला आमिर हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान व लोकप्रिय कलाकारांपैकी एक मानला जातो.

१९७३ साली आलेल्या यादों की बारात ह्या चित्रपटामध्ये आमिरने बाल कलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर १९८४ सालच्या होली ह्या चित्रपटामध्ये देखील त्याची भूमिका होती. कयामत से कयामत तक ह्या १९८८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामधून आमिरने जुही चावलासोबत नायकाच्या रूपाने सिनेसृष्टीत पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या तूफान यशानंतर आमिरने अनेक दर्जेदार भूमिका करून बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ अभिनेत्यांमध्ये आपले नाव जोडले. अभिनयासोबतच आमिरने चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मिती देखील केली आहे. २०१२ सालच्या सत्यमेव जयते ह्या दूरचित्रवाणी कार्यक्रमाचा यजमान ह्या नात्याने त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

आजवर आमिरला अनेक फिल्मफेअरसह अनेक पुरस्कार मिळाले असून त्याच्या कला क्षेत्रामधील योगदानासाठी भारत सरकारने त्याला २००३ साली पद्मश्री तर २०१० साली पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. २०११ साली आमिरला युनिसेफने जगातील शिशू आहार सुधारण्याच्या अभियानामध्ये राष्ट्रीय राजदूत ह्या स्वरूपात नियुक्त केले. चित्रपटसृष्टीसोबत आमिरने इतर सामाजिक व राजकीय चळवळींमध्ये योगदान दिले आहे. २००६ साली त्याने मेधा पाटकर चालवित असलेल्या नर्मदा बचाओ आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. आमिर खान हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपले प्रमुख प्रेरणास्थान मानतो.

आय.एस.ओ. ६३९-१

आय.एस.ओ. ६३९-१ (इंग्लिश: ISO 639-1:2002) हा आय.एस.ओ. ६३९ ह्या आंतरराष्ट्रीय भाषा प्रमाणाचा पहिला भाग आहे. ह्यामधील प्रत्येक भाषेसाठी दोन अक्षरी संक्षेप ठरवण्यात आला आहे. हा संक्षेप जगतील एकूण १३६ भाषांसाठी वपरला जातो.

आय.एस.ओ. ६३९-१ ची काही उदाहरणे खालील आहेत:

मराठी भाषा: mr

इंग्लिश भाषा: en

हिंदी भाषा: hi

फ्रेंच भाषा: fr

जर्मन भाषा: de

ग्रीक भाषा: el

डच भाषा: nlसध्या अनेक बहु-भाषिक संकेतस्थळे विविध भाषांचा उल्लेख करण्यासाठी ह्या कोडचा वपर करतात. उदा. विकिपीडियावर mr.wikipedia.org हा पत्ता मराठी विकिपीडियासाठी वापरात आहे.

इंग्लंड

इंग्लंड युनायटेड किंग्डमचा एक घटकदेश आहे. युनायटेड किंग्डमची ८३% लोकसंख्या इंग्लंडमध्ये राहते; तर क्षेत्रफळानुसार इंग्लंड ग्रेट ब्रिटनचे दोन तृतीयांश क्षेत्रफळ व्यापतो. इंग्लंडच्या उत्तरेस स्कॉटलंड, पश्चिमेस वेल्स यांच्या भूसीमा असून इअतर सर्व बाजूंनी उत्तर समुद्र, आयरिश समुद्र, केल्टिक समुद्र, ब्रिस्टल खाडी व इंग्लिश खाडी यांनी इंग्लंडला वेढले आहे. इंग्लंडची राजधानी असलेले लंडन ग्रेट ब्रिटनमधील सर्वात मोठे महानगर असून अनेक मानकांनुसार युरोपीय संघातील सर्वात मोठे नागरी क्षेत्र आहे.

इंग्लंडचे इ.स. ९२७ मध्ये एकत्रीकरण झाले त्या काळापासून आजवर इंग्लंड हा एकच असा देश आहे ज्याच्या सार्वभौमत्वाला कधीही तडे गेले नाहीत. इंग्लंड या देशाने आपल्या लष्करी सामर्थ्याच्या जोरावर संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य केले, वसाहती स्थापन केल्या. या वसाहती विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत इंग्लंडच्या ताब्यात होत्या. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी त्यांनी राज्य केले त्या त्या भागावर त्यांनी कधीही न पुसता येणारा ठसा उमटवला. आज जगातील बहुतेक देशांमधील कायदे, लष्करी रचना, शिक्षण पद्धति, शास्त्रीय पद्धति, संसदीय लोकशाही व सरकार रचना यांत आजही इंग्रजी पद्धतिीचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. इंग्रजांनी त्यांची इंग्लिश भाषा भाषा जगभरात नेल्यामुळे आज इंग्रजी ही अघोषितरित्या जगाची प्रमुख भाषा आहे

इंडियाना

इंडियाना (इंग्लिश: Indiana) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या मध्य-उत्तर भागात वसलेले इंडियाना हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३८वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

इंडियानाच्या उत्तरेला मिशिगन, वायव्येला मिशिगन सरोवर, पश्चिमेला इलिनॉय, दक्षिणेला केंटकी व पूर्वेला ओहायो ही राज्ये आहेत. इंडियानापोलिस ही इंडियानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

एकक

आकार, वस्तुमान, अंतर इत्यादी मोजण्याचे परिमाण म्हणजे एकक हे आहे.दैनंदिन वापरात अनेक एकके असतात. जसे वजन मोजण्यासाठी वापरात असलेले किलोग्रॅम. अंतर मोजण्यासाठी नॅनोमीटर ते किलोमीटर वगैरे. यासाठी असलेला इंग्लिश भाषा प्रतिशब्द 'युनिट'(इंग्रजी : unit) असा आहे.

गर्भाशय

सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. फलित बीजांड (गर्भ) रुजवणे, सुरक्षित वातावरणात वाढवणे व योग्य कालावधीनंतर प्रसूतीची प्रक्रिया घडवून तो बाहेरच्या जगात सोडणे ही त्याची कामे आहेत.

गोपाळ हरी देशमुख

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. . भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. लोकहितवादींनी समाजहिताला प्राधान्य देऊन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीचा आग्रह धरला होता.आपल्या समाजातील दोषांवर त्यांनी टीका केली समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी. अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत. भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांचा जातीव्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्णश्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून देशहितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत. त्यांना शिक्षण व विवाह याबाबत स्वातंत्र्य असावे विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते.

देवनागरी

देवनागरी लिपी ही बऱ्याच भारतीय भाषांची प्रमुख लेखन पद्धती आहे. संस्कृत, पाली, मराठी, कोकणी, हिंदी, सिंधी, काश्मिरी, नेपाळी, बोडो, अंगिका, भोजपुरी, मैथिली, रोमानी इत्यादी भाषा देवनागरीत लिहिल्या जातात. देवनागरी लिपी एकंदरीत देशातल्या व देशाबाहेरच्या एकूण १९४ भाषांसाठी वापरली जाते.

प्रीती झिंटा

प्रीती झिंटा (जन्म : सिमला, ३१ जानेवारी १९७५ ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपटांतसुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली 'दिल से' या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला.

तिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत. दोन्ही गालांवरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हिची जमेची बाजू मानली जाते..

फ्रेंच भाषा

फ्रेंच (Français) ही जगातील एक प्रमुख भाषा आहे. जगातील ५४ देशातील सुमारे ३० कोटी लोक (प्रथम व द्वितीय-प्रभुत्व) फ्रेंच बोलू शकतात. प्राचिन लॅटिन भाषेपासून फ्रेंचची निर्मिती झाली असून. २९ देशांची ती अधिकृत राजभाषा आहे व इंग्लिश भाषा नंतर सर्वात जास्त शिकली जाणारी परदेशी भाषा आहे. ही भाषा इंग्लिश प्रमाणे रोमन बाराखडी वापरुन लिहिली जाते.

बहासा इंडोनेशिया

बहासा इंडोनेशिया (इंडोनेशियन भाषा) ही इंडोनेशियाची अधिकृत भाषा आहे. खरंतर ही मलाय भाषेची एक बोली आहे जिला इंडोनेशियन भाषा म्हणून १९४५ मध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात अधिकृतरीत्या स्वीकारले गेले. त्याआधीही १९२८ पासून "इंडोनेशियन युवक प्रतिष्ठान"नुसार त्यास अधिकृत भाषेचा दर्जा दिला होता.

इंडोनेशिया हा जगातील लोकसंख्येच्या दृष्टीने ४था मोठा देश आहे. आणि या देशातील एकूण लोकसंख्येपैकी सहज बहासा बोलणारी जनता जवळ जवळ १००% आहे. त्यामुळे "बहासा इंडोनेशियन" ही जगातील सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक गणली जाते. बरीचशी इंडोनेशियन जनता बहासा इंडोनेशिया बरोबरच इतर स्थानिक बोलीभाषेतही पारंगत असते. मात्र सगळे दस्तऐवज, शिक्षण, पत्रकारिता आणि अधिकृत संभाषणाच्या इतर माध्यमात बहासा इंडोनेशिया हीच भाषा कटाक्षाने वापरण्यात येते. पूर्व तिमोर या नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशातही बहासा इंडोनेशिया ही इंग्रजीबरोबरच दुसरी राष्ट्रभाषा आहे. बऱ्याच जुन्या इंग्लिश भाषा दस्तऐवजांमध्ये अजूनही ह्या भाषेचा उल्लेख केवळ "बहासा" असा केलेला आढळेल.

ब्रिटिश (निःसंदिग्धीकरण)

ब्रिटिश हा शब्द अनेक संदर्भांत वापरला जातो.

मदुराई

गुणक: 9.8°N 78.10°E / 9.8; 78.10

मदुराई (मराठीत मदुरा Madura), किंवा स्थानिक भाषेत मदुरै-मदुराई किंवा अनेकदा कूडल (कूडलनगर) ह्या नावाने प्रसिद्ध असणारे शहर. [तमिळःமதுரை इतर उच्चार : मदुराय] भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे, तसेच मदुरा हे भारतीय उपखंडातील सर्वात जुने मानववस्ती असलेले ऐतिहासिक नगर म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर मदुराई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असून तमिळनाडूतील ते तिसरे मोठे शहर आहे. या शहरास सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे.

मदुरा हे वैगई ह्या नदीच्या काठी वसले आहे. मदुरेला देवळांचे महानगर (किंवा कूडल मानगर) असे संबोधले जाते. तसेच ते तमिळनाडू राज्याची सांस्कृतिक राजधानी (कलाच्चार तलैनगर) म्हणूनही प्रसिद्ध आहे. या शहराला मोगर्‍याचे नगर, तुंग मानगर (जागृत महानगर), पूर्वेकडील अथेन्स (Athens of the East) अशा नावांनीही ओळखले जाते.

मार्च ११

मार्च ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ७० वा किंवा लीप वर्षात ७१ वा दिवस असतो.

मुंबई

गुणक: 18.96°N 72.82°E / 18.96; 72.82

मुंबई (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: /'mumbəi/ उच्चार ऐका) ही भारतातल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. मुंबई हे भारतातील व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने होणारी ५०% मालवाहतूक होते.

मुंबई १८व्या शतकाच्या मध्यकाळात ब्रिटिशांनी मुंबई ही कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण बनवली. १९व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि २०व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. इ.स. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई या नवीन राज्याचीही राजधानी बनली. १९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता असताना या शहराचे नाव अधिकृतपणे बॉम्बे पासून मुंबई करण्यात आलं.

मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. रिझर्व बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात.

मुंबई हे बॉलीवूड व मराठी उद्योगाचे केंद्र आहे. बोरीवली नॅशनल पार्क किंवा कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईच्या हद्दीतच आहे.

मेलबर्न

हा लेख ऑस्ट्रेलिया तील मेलबर्न शहराबद्दल आहे. मेलबर्न च्या इतर उपयोगांसाठी पहा - मेलबर्न (निःसंदिग्धीकरण).

मेलबर्न हे ऑस्ट्रेलिया देशाच्या व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी व ऑस्ट्रेलियातील प्रमुख शहर आहे. इ.स. २००६ च्या जनगणने नुसार येथील लोकसंख्या ३७ लाख ४० हजार आहे. येथे राहणार्‍या लोकांना मेलबर्नीयन असेही संबोधले जाते. हे शहर ऑस्ट्रेलियाचे सांस्कृतिक राजधानीचे शहरही मानले जाते. येथे मेलबर्न क्रिकेट ग्राउंड आहे. पहिली ऑस्ट्रेलियन संसद या शहरात होती. ती नंतर कॅनबेरा या नवीन राजधानी च्या ठिकाणी हलवण्यात आली. मात्र संसदेची कोरीव काम व सुंदर दिवे असलेली प्रेक्षणीय इमारत येथे अजूनही आहे.

या शहराच्या मुख्य भागातून यारा नदी नावाची नदी वाहते.

विंबल्डन टेनिस स्पर्धा

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन (इंग्लिश भाषा: The Championships, Wimbledon) ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा १८७७ सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे.

पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

शेकरू

शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो.

Flag of India.svg भारत देशामधील अधिकृत भाषा
केंद्र-सरकार
भारतीय संविधानाची आठवी अनुसूची
राज्य स्तरीय

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.