अर्थशास्त्र

hii अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र असून ते 'सेवा व उत्पादनांच्या' निर्मिती, वितरण आणि वापर या विषयाची माहिती देते. इंग्रजीत अर्थशास्त्राला 'इकॉनॉमिक्स' (Economics) म्हणतात,अर्थशास्त्र (Economics) हा शब्द ग्रीक शब्द oikonomia पासून आला आहे ज्याचा अर्थ होता - घरगुती व्यवस्थापन करणे व अर्थशास्त्राच्या विद्वान अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञ किंवा अर्थतज्ज्ञ असे म्हणतात. हे अर्थशास्त्र राष्ट्राच्या संपत्तीचाही अभ्यास करते.

चाणक्य यांनी इसवी सनापूर्वीच्या तिसऱ्या शतकात अर्थशास्त्रावर 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिला,या ग्रंथात राजकारण ,तत्वज्ञान ,अर्थशास्त्राचे अनेक महत्त्वाचे नियम सांगितले आहेत .ॲडम स्मिथ यांना ’आधुनिक अर्थशास्त्राचे जनक समजले जाते. त्यांनी ‘राष्ट्राची संपत्ती’ हा ग्रंथ १७७६मध्ये लिहिला. त्या ग्रंथाला अर्थशास्त्राचे बायबल समजले जाते.

अर्वाचीन अर्थशास्त्राची सुरुवात ॲडम स्मिथ यांच्या इ.स. १७७६ मधील वेल्थ ऑफ नेशन्स पासून झाली. अर्थशास्त्राचे अनेक विभाग/प्रकार विविध निकषांनुसार पाडले गेले आहेत. उदा. समग्रलक्षी (Macro) व अंशलक्षी (Micro). समग्रलक्षी अर्थशास्त्र देश-राज्य इत्यादी मोठ्या संस्थांचे मोठे आर्थिक प्रश्न व आर्थिक व्यवहार या व अश्या अनेक बाबीची चर्चा करते तर अंशलक्षी अर्थशास्त्र एखादा माणूस, एखादे कुटुंब किंवा एखादी आर्थिक संस्था इत्यादींच्या व्यवहारसंबंधी प्रश्नांबाबत माहिती देते. अर्थशास्त्र हे कल्याणकारी शास्त्र आहे अर्थिक कल्याण याचा पैशाच्या संदर्भातील मोजमापांशी संबध असतो

सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास ॲडम स्मिथ यांच्यापासून झाला अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयात अनेक घटकचा अभ्यास केला जातो कल्याणाबाबत कसोट्या तयार करणे व अर्थिक धोरणास मदत करणे हे विश्लेषणात्मक काम करणार्‍या अथशास्त्राच्या शाखेस कल्याणकारी अर्थशास्त्र म्हणतात. कल्याणकारी शास्त्राची सुरुवात पिंगू नावाच्या अर्थतज्ज्ञाने केली. कल्याण हा शब्द पिंगूनेच मांडला. पिंगूच्या मते राष्ट्रीय उत्पन्न हे अर्थिक कल्याणाचे निर्देशक असते..

सूक्ष्मलक्षी व समग्रलक्षी या संज्ञाचा वापर सर्वात पहिल्यात रॅग्नर फ्रिश यांनी १९३३ साली केला.

काही जगविख्यात अर्थतज्ज्ञ मराठी माहिती

ॲडम स्मथ ,जॉन मेनार्ड केन्स, कार्ल मार्क्स, रिकार्डो, मिल्टन फ्रिडमन, पॉल क्रुगमन, पॉल सॅम्युएलसन, अमर्त्य सेन ,जोसेफ स्टिग्लिट्झ ,पॉल क्रुगमन

ॲडम स्मिथ पासून सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची सुरुवात झाली.भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा त्याने पुरस्कार केला . "बाजारपेठेतील  घटकावर कुठलेही  नियंत्रण ठेवु नये.या घटकावर बाजारच स्वत: नियंत्रण ठेवत असतो असे मत त्याने मांडले ,जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्याने मांडला. माल्थसने समग्रलाशी अर्थशास्त्राची मांडणी केली.

सूक्ष्मलक्ष्मी अर्थशास्त्रामध्ये बाजारपेठेचा अभ्यास केला जातो. मक्तेदारीयुक्त स्पर्धांची संकल्पना व गट संकल्पना या सिंबार्लिनने मांडल्या.

माल्थसच्या मते अन्नधान्याचे उत्पादन गणिती श्रेणीने होते. माल्थसच्या मते लोकसंख्या ही भूमिती श्रेणीने वाढते.

प्रा मार्शल यांनी १८९०मध्ये प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनोमिक्स हा ग्रंथ लिहिला.

शाखा

अर्थशास्त्राच्या काही प्रमुख शाखा :

 1. कृषी अर्थशास्त्र
 2. विकास आणि संशोधन अर्थशास्त्र
 1. आंतराष्टीय  अर्थशास्त्र
 2. स्थूल अर्थशास्त्र
 3. सूक्ष्म  अर्थशास्त्र
 4. सार्वजानिक आयव्यय
 5. गणितीय  अर्थशास्त्र
 6. वर्तुणूकीचे  अर्थशास्त्र
 7. पर्यावरणीय अर्थशास्त्र
 8. अर्थमिती
 9. श्रमाचे अर्थशास्त्र

अर्थशास्त्रात वापरले जाणारे शब्द

 • अर्थशास्त्र संज्ञा - सिद्धान्त कोश (डॉ. भीमसेन रंगाचार्य जोशी) - या कोशात अर्थशास्त्रातील संज्ञा, संकल्पना आणि सिद्धान्तांचे स्पष्टीकरण वगैरे माहिती दिली आहे. (प्रकाशक - सुनिधी पब्लिशर्स)
 • डायमंड अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-मराठी) - डायमंड प्रकाशन, लेखक व्ही.जी. गोडबोले).
 • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी, संपादक जी.आर. वर्मा)
 • अर्थशास्त्र शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; हिंदी-इंग्रजी. लेखक बारबरा कोल्म, राजपाल प्रकाशन)
 • अर्थशास्त्र शब्दकोश (हिंदी, लेखक - सी.एस. बरला) (प्रकाशक जैन प्रकाशन नंदिर, जयपूर)
 • अर्थशास्त्र एवं वाणिज्यशास्त्र का पारिभाषिक शब्दकोश (इंग्रजी-हिंदी; लेखक - राज दत्त आणि रुद्र दत्त; प्रकाशन - एस.चंद पब्लिशिंग)
 • अर्थशास्त्र परिभाषा कोश (हिंदी, लेखक - सुदर्शन कुमार कपूर; प्रकाशक - राजकमल प्रकाशन)
 • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)

अर्थशास्त्रावरील मराठी पुस्तके

 • अर्थक्षेत्रातील मराठी तारे (उदय कुलकर्णी)
 • गुंतवणूक गाथा (गोपाल गलगली)
 • ग्यानवाचे अर्थशास्त्र (न.वि. गाडगीळ)
 • जागतिक अर्थकारणाचे नवे संदर्भ (सी. पं. खेर)
 • नव्या जगाचे अर्थकारण (डॉ. मधुसूदन साठे)
 • पतसंस्था व्यवस्थापन (डॉ. अविनाश शाळीग्राम)
 • डायमंड बँक व्यवहार व वित्तीय सेवा शब्दकोश (वि.ज. गोडबोले)
 • बँकिंग जिज्ञासा (वंदना धर्माधिकारी)
 • भटकंती (रमेश पाध्ये)
 • भारतातील बँक कायदे आणि व्यवहार पद्धती (थॉमस दियोग फर्नांडिस)
 • भारतीय अर्थव्यवस्था (सतीश श्रीवास्तव)
 • मैत्री बँकिंगशी (वंदना धर्माधिकारी)
 • शिवाजी महाराजांचे अर्थशास्त्र (प्रा. नामदेवराव जाधव)
 • संघराज्याचा वित्त व्यवहार भाग १, २, ३ (डॉ. मधुसूदन साठे)
 • सी. ई. ओ. भूमिका व जबाबदारी (माधव गोगटे)
 • सूक्ष्म अर्थशास्त्र (डॉ. पुष्पा तायडे)
 • अर्थात (अच्युत गोडबोले  )
 • भारतीय अर्थव्यवस्था (देसाई ,भालेराव)

हेही पहा

अमर्त्य सेन

अमर्त्य सेन (बांग्ला: অমর্ত্য সেন , उच्चार - ओमोर्तो शेन; रोमन लिपी: Amartya Sen) (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गरिबी ,आरोग्य ,शिक्षण , मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे . भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे हे अध्यक्ष आहेत एकूण ४० वर्षात, ३०हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहे. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत.

अर्थतज्ज्ञ

अर्थ विषयक माहिती असणारे व त्याबाबत सल्ला देवू शकणाऱ्यांना अर्थशास्त्राच्या विद्वानाला अर्थतज्ज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणतात. यासाठी अर्थशास्त्र या विषयात पदवी अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. शिवाय भारतात चार्टर्ड अकाउंटंट (सी.ए.)(इंग्रजी:Charterd Accountant) हा अभ्यासक्रमही पुर्ण करावा लागतो. अर्थतज्ञ होण्या साठी जगभर अशाच पद्धतीचे अभ्यासक्रम आहेत जसे ऑस्ट्रेलिया येथे सी.पी.ए. हा अभ्यासक्रम. अर्थतज्ञांना कर व अर्थ विषयक कायद्यांचे ज्ञान असणे आवश्यक असते.

काका गाडगीळ

नरहर विष्णु ऊर्फ काकासाहेब गाडगीळ (जानेवारी १०, इ.स. १८९६ - जानेवारी १२, इ.स. १९६६) हे मराठी राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, लेखक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना एकूण आठ वेळा कारावासाची शिक्षा झाली व प्रत्यक्ष कारागृहात त्यांना एकूण साडेपाच वर्षे काढावी लागली.

चलन

अर्थशास्त्रात चलन या शब्दाचा अर्थ देवाणघेवाणीचे स्वीकारार्ह माध्यम असा सर्वसाधारणपणे घेतला जातो. चलन हे बहुतांशी देशाच्या सरकारने नाणी आणि बँक नोटांच्या स्वरूपात तयार केले असते आणि देशाच्या वितपुरवठ्याचा भौतिक पैलू असते.आधुनिक अर्थव्यवस्थेत पैसा म्हणून चलन , पतपैसा ,आणि इ-पैसा हे प्रमुख प्रकार प्रचलीत आहेत

द प्रॉब्लम ऑफ द रूपी

द प्रॉब्लम् ऑफ द रूपी : इट्स ओरिजिन ॲन्ड इट्स सोल्युशन (मराठी: रुपयाची समस्या) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शोध प्रबंध आहे. तो त्यांनी ऑक्टोबर १९२२ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डॉक्टर आफ सायन्स (डी.एस.सी.) च्या पदवीसाठी प्रस्तुत केला होता. हा प्रबंध डिसेंबर, १९२३ मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित झाला. या ग्रंथात डॉ. आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे की, मुद्रा समस्याच्या अंतिम निर्णयात, कशा प्रकारे ब्रिटिश शासकांनी भारतीय रुपयाच्या किमतीला पाऊंडसोबत जोडून आपला जास्तीत-जास्त फायदा होण्याचा मार्ग निवडला. त्यांच्या या हेराफेरीनेच भारतीय नागरिकांना गंभीर आर्थिक समस्येत लोटले गेले. ब्रिटिश शासकांच्या या निर्णयामुळे, भारतीय धन ब्रिटिश खजिन्याच्या दिशेने निरंतर वळवले गेले. या व अशा अनेक प्रकारे भारतातली संपत्ती ब्रिटिश सरकारच्या व ब्रिटिश जनतेच्या फायद्यात जात राहिली.

दान

दान हे दातृत्वशक्ती किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून नसते तर,अर्थिक मोहावर,व आसक्तीवर अवलंबून असते.दान हे सत्पात्री व गरज असणाऱ्यांना व्यक्तिंना दिले पाहिजे.(संस्कृत-वृथा दानम् समर्थस्य)

ध्यानं परं कृतयुगे त्रेतायां ज्ञानमुच्यते |द्वापरे यज्ञमेवाहु: दानमेव कलौ युगे || कूर्म पुराण २७.१७

कृतयुगात ध्यान, त्रेतायुगात ज्ञान, द्वापरयुगात यज्ञ आणि कलियुगात दान ही सर्वश्रेष्ठ साधने आहेत.

दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया

दि इव्हॉलुशन ऑफ द प्रॉव्हिन्शल फाइनॅन्स इन ब्रिटिश इंडिया हा एक ग्रंथ असून मुळात तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रस्तुत केलेला प्रबंध आहे. हा इ.स. १९१६मध्ये लिहिलेला प्रबंध इ.स. १९२४मध्ये पुस्तकरूपाने प्रकाशित झाला. हे पुस्तक बडोद्याचे राजे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांना समर्पित केले आहे. याच महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेत शिकायला जाण्यासाठी आर्थिक मदत केली होती. पुस्तक आर्थिक व्यवहाराशी संबंधित असून त्यात ब्रिटिश नोकरशाहीचे पितळ उघडे पाडले आहे.

नरेंद्र जाधव

डॉ. नरेंद्र दामोदर जाधव (इ.स. १९५३ - हयात) हे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, लेखक व समाजशास्त्रज्ञ आहेत. ते रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थशास्त्र आणि ललित साहित्य तसेच इतर समाजिक विषयांवर मराठी, हिंदी व इंग्लिश भाषांत त्यांनी लेखनही केले आहे. नियोजन मंडळाचे माजी सदस्य होते.

नीलकंठ खाडिलकर

"अग्रलेखांचा बादशहा" म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ खाडिलकर (जन्म : ६ एप्रिल १९३४) हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’ चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत. निळूभाऊ खाडिलकरांचे "हिंदुत्व" हे पुस्तक समीक्षकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरले आहे.

खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या.

नीलकंठ खाडिलकर यांनी आपल्या तर्कशुद्ध आणि संदर्भासहित लेखनातून इतिहासाची मांडणी करत वाचकांना इतिहाससाक्षर केले आणि त्याचवेळी वर्तमान सामाजिक-राजकीय परिस्थितीचे अभ्यासू व विवेकी विवेचन वाचकांपर्यंत पोहचविले. ‘अग्रलेखांचा बादशहा’ ही नीलकंठ खाडिलकर यांची मराठी वाचकांमध्ये ओळख आहे. त्यांच्या झंझावाती, मार्मिक आणि सामान्य वाचकालाही कळेल अशा सोप्या भाषेतील अग्रलेखांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत धुमाकूळ घातला. खाडिलकर यांच्या ग्रंथवाचन व्यासंगाचा अनेक विद्वानांनी गौरव केला आहे. तळागाळातील लोकांसाठी नीलकंठ खाडिलकरांनी आपली लेखणी वापरली.

खाडिलकरांच्या अग्रलेखांचे ५हून अधिक संग्रह प्रकाशित झाले आहेत.

नोबेल पारितोषिक

नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या पाच क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक आल्फ्रेड बर्नार्ड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली होती. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये पहिल्यांदा हे पुरस्कार देण्यात आले.

ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना एकूण ७८१ नोबेल पारितोषिके देण्यात आली आहेत.

इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने (रिक्स बँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात केली.

पेट्रोल

पेट्रोल हे द्रवरुप इंधन असून पेट्रोलियमजन्य पदार्थ आहे. हे अतिज्वलनशील असते. याचा वापर मुख्यतः वाहनांची स्वयंचलित इंजिने चालवण्यासाठी होतो.

बौद्ध संस्कृती

(असंबद्ध विधाने असलेला लेख)

बौद्ध कला, बौद्ध वास्तुशास्त्र, बौद्ध संगीत आणि बौद्ध पाककृती यांच्याद्वारे बौद्ध संस्कृती आहे. भारतीय उपखंडात बौद्ध धर्माचा विस्तार झाला आहे. आशिया खंडातील इतर देशांतील कलात्मक आणि सांस्कृतिक घटकांचा त्यांनी अवलंब केला आहे.

भीष्म

देवव्रत, अर्थात भीष्म, हा महाभारत या संस्कृत महाकाव्यात उल्लेखलेला कुरुवंशीय राजपुत्र होता. हस्तिनापुराचा कुरुवंशीय राजा शंतनू व गंगा यांचा हा पुत्र होता. शंतनूचे धीवरकन्या सत्यवती हिच्याशी लग्न व्हावे व तिच्याच पुत्राला हस्तिनापुराचे राज्य मिळावे, म्हणून याने हस्तिनापुराच्या सिंहासनावरील आपला हक्क सोडण्याची व आजन्म ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतली. त्याच्या या कृत्यामुळे शंतनूने प्रसन्न होऊन त्याला इच्छामरणी होण्याचा वर दिला होता. महाभारतीय युद्धात याने सेनापती म्हणून कौरवपक्षाच्या सैन्याचे नेतृत्व केले. सशस्त्र पुरुषाशिवाय अन्य कुणाविरुद्ध शस्त्र न धरण्याची याची नीती ठाऊक असल्याने अर्जुनाने शिखंडीस पुढे घालून युद्धात याच्यावर शरवर्षाव केला. बाणांनी घायाळ झालेल्या अवस्थेत याने प्राण रोखून धरले व 58 दिवसांनी दक्षिणायन संपल्यावर रणांगणावर प्राणत्याग केला.

सोमवंशातील राजा शंतनू व गंगा यांचा पुत्र आणि महाभारतातील अत्यंत विख्यात असा एक महापुरुष. ⇨ब्रह्मदेवाच्या शापाने गंगा शंतनूची पत्‍नी बनली आणि ⇨वासिष्ठांचा शाप व इंद्राची आज्ञा यांमुळे अष्टवसू हे गंगेचे पुत्र बनले. तिने पहिले सात पुत्र मारल्यानंतर शंतनूच्या विनंतीवरून आठव्या पुत्राला जीवदान दिले. हा आठवा पुत्र म्हणजेच भीष्म होत. एका मतानुसार ते अष्टवसूंचा सारभूत अवतार होते, तर दुसऱ्या मतानुसार ते अष्टवसूंपैकी 'द्यु' या आठव्या वसूचा मानवी अवतार होते.

त्यांचे मूळचे नाव देवव्रत असे होते. परंतु आपल्या वडिलांचे जिच्यावर मन बसले आहे, त्या सत्यवतीनामक धीवरकन्येचा त्यांच्याशी विवाह व्हावा आणि त्यासाठी तिच्या वडिलांनी घातलेल्या अटीनुसार तिच्या पुत्राला राज्य प्राप्त व्हावे, या हेतूंनी त्यांनी आमरण ब्रह्मचर्याची शपथ घेतली. या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांना 'भीषण' या अर्थाचे 'भीष्म' हे नाव कायमचे प्राप्त झाले. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना इच्छामरणी होण्याचा वर दिला. गंगेचा मुलगा असल्यामुळे त्यांनी गांगेय व नदीज अशी नावे मिळाली, तर शंतनूचा मुलगा असल्यामुळे शांतनव असे नाव मिळाले. ते महाभारतयुद्धाच्या वेळी कुरुवंशातील सर्वांत वृद्ध पुरुष असल्यामुळे त्यांना कुरुवृद्ध असे म्हटले जाई तसेच त्यांचा निर्देश 'पितामह', 'भीष्माचार्य' इ. आदरार्थी शब्दांनी केला जात असे

लहानपणी गंगेजवळ असताना वसिष्ठांनी त्यांना सर्व वेद शिकविले होते. त्यांनी ⇨बृहस्पती व ⇨ शुक्राचार्य यांच्याकडून शस्त्रास्त्रांचे, ⇨परशुरामाकडून शस्त्रास्त्रांबरोबरच राजधर्म व अर्थशास्त्र यांचे, च्यवनभार्गवाकडून सांगवेदांचे व मार्कंडेयांकडून यतिधर्माचे ज्ञान मिळविल्याच्या कथा आढळतात. यांतील काही कथा त्यांचे सर्वज्ञत्व दर्शविण्यासाठी रचल्या असण्याची शक्यता आहे. रणविद्या, राजनीती, अर्थशास्त्र, अध्यात्म, धर्म, नीती, दर्शने इ. क्षेत्रांतील त्यांच्या अलौकिक ज्ञानामुळे त्यांना सर्वशास्त्रवेत्ता मानले जाई. महाभारतयुद्धामध्ये शरशय्येवर पडल्यानंतर त्यांनी युधिष्ठिराला [⟶ धर्मराज] केलेला उपदेश ⇨महाभारताच्या अनुशासन आणि शांतिपर्वात विस्ताराने आला आहे. परंतु इतकी विद्वत्ता असूनही ते ⇨दुर्योधनाने केलेली ⇨द्रौपदीची विटंबना थांबवू शकले नाहीत, हा त्यांच्या जीवनावरील कलंक असल्याचे काही अभ्यासक मानतात तसेच ⇨कौरवांचे दोष दिसत असूनही महाभारतयुद्धात त्यांच्याच बाजूने लढणे, युद्धाच्या वेळी आपल्या पराभवाचा मार्ग ⇨ पांडवांना सांगणे, ज्या कुलाचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा केली ते कुल नष्ट होत असतानाही प्रतिज्ञेला चिकटून राहणे इ. प्रकारचे दोष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे टीकाही अनेकजण करतात.

कुरुवंशातील शंतनुपासून दुर्योधनापर्यंत अनेक पिढ्यांची त्यांनी काळजी घेतली. शंतनूसाठी ते आमरण ब्रह्मचारी राहिले. त्यानंतर चित्रांगद व विचित्रवीर्य या सावत्रभावांचेही ते संरक्षक बनले. विचित्रवीर्यासाठी पत्‍नी म्हणून अंबिका व अंबालिका यांना त्यांनीच जिंकून आणले. धृतराष्ट्र, पांडू व विदुर यांचे पालनपोषण, शिक्षण व विवाह त्यांनीच केले. कौरव-पांडवांच्या शिक्षणाची व्यवस्थाही त्यांनीच केली. अशा रीतीने त्यांनी ⇨कुरुवंशातील चार पिढ्यांची काळजी वाहिली.

त्यांच्यावर युद्धाचे अनेक प्रसंग आले. शंतनूच्या मृत्यूनंतर शेजारच्या उग्रायुध राजाने सत्यवतीच्या अभिलाषेने त्यांच्यावर हल्ला केला, तेव्हा त्यांनी तीन दिवस लढून त्याला ठार मारले. काशिराजाने अंबा, अंबिका व अंबालिका या आपल्या मुलींसाठी स्वयंवर घोषित केले, तेव्हा त्यांनी जमलेल्या राजांचा पराभव करून विचित्रवीर्यासाठी त्या मुली जिंकून आणल्या. अंबेच्या सांगण्यावरून परशुरामाने भीष्मांना तिच्याशी लग्‍न करावयास सांगितले; परंतु त्यांनी ते नाकारल्यामुळे परशुरामाने त्यांच्याशी युद्ध केले. तेवीस दिवस चाललेल्या या युद्धात भीष्मांनी परशुरामाचा पराभव केला; परंतु परशुरामाच्या काळाचा विचार करता ही घटना अनैतिहासिक असावी, असे मानले जाते. महाभारतयुद्धात पहिले दहा दिवस ते कौरवांचे सेनापती होते. या काळात त्यांनी बराच पराक्रम केला. एकदा तर ⇨अर्जुनाला त्यांनी मृर्च्छित केल्यामुळे ⇨कृष्णाने हाती शस्त्र न धरण्याची प्रतिज्ञा मोडली. त्यांच्या रथाच्या ध्वजावर तालवृक्षाचे चिन्ह होते.

स्वीकारलेल्या तत्त्वांचे काटेकोर पालन करावयाचे, हा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच आमरण ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेशी ते चिकटून राहिले. ही प्रतिज्ञाही त्यांनी स्वतःहूनच स्वीकारली होती. अंबेशी विवाह करण्याची आज्ञा प्रत्यक्ष परशुरामाने देऊनही त्यांनी ती नाकारली. विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर स्वतः सत्यवतीने आपल्या विधवा सुनांना पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून त्यांना नियोगाची आज्ञा दिली; परंतु तीही त्यांनी मानली नाही. शंतनूने सत्यवतीशी लग्‍न होण्यापूर्वी त्यांना युवराज म्हणून अभिषेक केला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांनी राज्याचा लोभ कधीच केला नाही. अखेरपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी राजा बनवून ते अधिकारपदापासून दूर राहिले.

महाभारतयुद्धाच्या [⟶ कुरुयद्ध] दहाव्या दिवशी अर्जुनाने शिखंडीच्या आडून त्यांच्यावर बाण मारले. भीष्मवधासाठी तपश्चर्येने पुनर्जन्म प्राप्त केलेली अंबा हीच शिखंडी असल्याचे सांगितले जाते. भीष्म शिखंडीला स्त्री मानत असल्यामुळे त्यांनी शिखंडीआडून आलेल्या बाणांचा प्रतिकार केला नाही. त्यामुळे ते जखमी होऊन खाली कोसळले. पौष कृष्ण सप्तमीला फाल्गुनी नक्षत्रावर ही घटना घडली, असे मानले जाते; परंतु त्यावेळी दक्षिणायन चालू होते आणि भीष्म इच्छामरणी असल्यामुळे उत्तरायण चालू होईपर्यंत प्राण न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. अर्जुनाने त्यांना शरशय्या करून दिली. माघ शुद्ध अष्टमीला विनशन नावाच्या क्षेत्रात त्यांनी प्राण सोडले. चित्रावशास्त्रींच्या मते मृत्युसमयी त्यांचे वय १८६ इतके असावे. इरावती कर्वे यांच्या मते त्यावेळी त्यांचे वय कमीत कमी ९० ते १०१ वर्षांचे असावे. माघ शुद्ध अष्टमी ही 'भीष्माष्टमी' मानली जाते. ज्यांचे पितर जिवंत आहेत, त्यांनीदेखील त्या दिवशी भीष्मासाठी तर्पण करण्याची प्रथा आढळते. भीष्म ब्रह्मचारी असल्याने अशी प्रथा पडली. गुजरातमध्ये भीष्माष्टमीला भीष्मप्रतीमेची पूजा करतात. माघ शुद्ध द्वादशीला 'भीष्मद्वादशी' म्हटले जाते. उत्तर भारतात 'भीष्मपूजा' नावाचे एक व्रत केले जाते तसेच कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत पाच दिवस 'भीष्मपंचक' नावाचे एक काम्यव्रतही केले जाते. कुरुक्षेत्राच्या परिसरात 'भीष्मशरशय्या' या नावाचे एक तीर्थक्षेत्र आढळते.

वार्षिक दरडोई उत्पन्न

वार्षिक दरडोई उत्पन्न प्रति व्यक्ती उत्पन्न दरडोई अत्पन्न सकल वार्षीक उत्पन्नास संबधीत लोकसंख्येने भाग दिल्या नंतर उपलब्ध होते.यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भागीदार किती ते कळते ,राष्ट्रीय उत्पन्न समाधानककारक असले ,परंतु लोकसंख्या भरमसाठ असली तर दरडोई उत्पन्न कमी भरते .

वार्षिक सकल उत्पन्न

Hello

विद्या बाळ

विद्या बाळ (१२ जानेवारी, १९३७ - हयात) या मराठी लेखिका व संपादक आहेत. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. महाराष्ट्रामधील व भारतामधील स्त्रियांच्या पुरुषांबरोबरच्या समान हक्कांविषयीच्या सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे.

विष्णु मोरेश्वर महाजनी

रावबहादुर विष्णु मोरेश्वर महाजनी (जन्म: पुणे, १२ नोव्हेंबर इ.स. १८५१ - अकोला, १६ फेब्रुवारी इ.स. १९२३ ) हे मराठीतील समीक्षक, कवी व नाटककार होते. त्यांनी काव्ये, नाटके, कादंबऱ्या, चरित्रे, प्रवासवर्णने इत्यादी वाङ्‌मय प्रकारांबरोबर अर्थशास्त्र, इतिहास, राजकारण, शिक्षणशास्त्र अशा विषयांवरीलही मार्मिक समीक्षणे लिहिली आहेत. महाजनी यांनी पात्रांवर मराठी परिवार चढवून शेक्सपियरच्या तीन नाटकांची मराठीत भाषांतरे केली आहेत.

महाजनी यांचे शालेय शिक्षण धुळ्यात व उच्च शिक्षण पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले. ते इ.स. १८७३साली एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाले. वर्ड्‌स्वर्थ, ऑक्झनहॅम, कीलहॉर्न, केरूनाना छत्रे, चिंतामणशास्त्री थत्ते या प्राध्यापकांचा आणि अनंतशास्त्री पेंढारकर यांसारख्या विद्वानाचा, महाजनींच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा होता.

विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी काही काळ ’ज्ञानसंग्रह’ मासिक चालविले. ते १८८६साली एज्युकेशन इन्स्पेक्टर झाले आणि १९०१मध्ये शिक्षणखात्याच्या डायरेक्टर पदावरून निवृत्त झाले.

मे इ.स. १९०७ साली पुणे येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जळगांव येथे १९०७ साली कर्नल कीर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कविसंमेलन भरले होते. त्या संमेलनात महाजनी यांनी ’कवी आणि काव्य’ या विषयावर दिलेले व्याख्यान फार गाजले होते.

विष्णु मोरेश्वर महाजनी हे प्रार्थनासमाजी नव्हते. पण लोकमान्य टिळकांच्या 'गीतारहस्या'ची मुक्त कंठाने प्रशंसा करणाऱ्या महाजनींनी टिळकांचे व वेदान्ती मंडळींचे मोक्ष हे ध्येय अमान्य केले होते.

शंकर दत्तात्रेय जावडेकर

आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर (सप्टेंबर २६, १८९४ - १० डिसेंबर, १९५५) हे मराठी लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक होते. पुण्यात १९४९ साली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २४ जून १९५० ते १० डिसेंबर १९५५ या कालावधीत ते साधना साप्ताहिकाचे संपादक होते. लोकशाही, समाजवाद, अर्थशास्त्र आदी विषयांवर त्यांनी लेखन केले.सन १९२० ते १९५०-५५ पर्यंत ज्यांनी महाराष्ट्राची तरुण पिढी वैचारिकदृष्ट्या घडविली, बुद्धिवादाचे आणि त्याचबरोबर नैतिकतेचे संस्कार ज्यांनी तिच्यावर केले, आणि तिला ध्येयप्रवण बनविले अशा विचारवंतांमध्ये आचार्य शं. द. जावडेकर यांचा प्रामुख्याने समावेश होतो. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व समाजवादी नेते, कार्यकर्ते, त्याचप्रमाणे राष्ट्रसेवा दलाचे हजारो सैनिक जावडेकर यांच्या वैचारिक शिदोरीवर पोसले गेले.

’आधुनिक भारत' या पुस्तकात जावडेकर यांनी भारताच्या स्वातंत्र्यढ्याची अतिशय मूलगामी चिकित्सा केली आहे. त्यामुळे मराठीतील तत्त्वज्ञ कादंबरीकार वामन मल्हार जोशी यांनी 'गीतारहस्यानंतरचा थोर ग्रंथ' असे त्याचे वर्णन केले आहे. जावडेकर हे आगरकर, टिळक आणि गांधी[ या तिघांनाही गुरू मानत. (त्यात पुढे मार्क्‍सची भर पडली.) या सर्व द्रष्टय़ा नेत्यांचे विचार कोणत्याही प्रकारचे किल्मिष येऊ न देता, त्यातील देशाला व समाजाला उपयुक्त व अनुकरणीय असेल असा भाग जावडेकर यांनी साक्षेपाने महाराष्ट्रीय जनतेसमोर मांडण्याचे काम केले आणि त्यांच्या कामाचे योग्य मूल्यमापन केले. त्यामुळे तत्कालीन महाराष्ट्रातील बुद्धिवंत त्यांच्या लेखनाकडे आकर्षित झाले. जावडेकर यांचे संपूर्ण जीवन हे 'बोले तसा चाले' या वृत्तीचा आविष्कार होते. नैतिक मूल्यांवर हुकमत, शुद्ध आचरण आणि स्फटिकवत चारित्र्य यामुळे जावडेकर यांचा त्यांच्या विरोधकांनाही दरारा वाटत असे.

जावडेकर गांधीवादी अहिंसेचे कट्टर पुरस्कर्ते होते. जावडेकर यांचे जीवन आणि विचार आजही आदर्शवत ठरावेत असे आहेत.

आचार्य जावडेकर यांच्या नावाने इस्लामपूर, जि. सांगली येथे एक निवासी शाळाही आहे. आचार्य जावडेकर गुरूकुल असे त्या शाळेचे नाव असून त्यांचा मुलगा प्रकाश शंकर जावडेकर यांनी ती स्थापन केली. समाजातील गोरगरिबांना उत्तम शिक्षण मिळावे हा त्या मागचा उद्देश.

स्त्री अभ्यास

स्त्री अभ्यास ही एक नव्याने घडत असलेली, आंतरशाखीय स्वरूपाचा आशय विकसित करू पाहणारी अशी ज्ञान शाखा आहे. स्त्री अभ्यास हे आंतर विद्याशाखीय विद्यापीठीय क्षेत्र आहे ज्यात स्त्री-वादी दृष्टीकोनातून समाजाचा राजकीय, आर्थिक, सामाजिक इतिहासाचा बहुसांस्कृतिक अभ्यास केला जातो' आणि ज्यात लिंगभाव, वर्ण, वर्ग, जात, लैंगिकता आणि इतर सामाजिक विषमतांची स्त्रीवादी चिकित्सा केली जाते.

विद्यापिठ अनुदान आयोग अनुदानीत स्त्री अभ्यास केन्द्रे, विविध ज्ञानशाखांमधील लिंगभाव परिप्रेक्ष्यातून संशोधन आणि अध्यापन करणारे अभ्यासक तसेच स्त्री चळवळींतील कार्यकर्ते हे सर्व स्त्री अभ्यास ज्ञान क्षेत्रात योगदान करणारे घटक मानले जातात.

सामाजिकशास्त्राच्या कला शाखा
इतिहास
भाषाशास्त्र
समाजशास्त्रे
इतर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.