अमेरिकेची संयुक्त संस्थाने

उत्तर अमेरिका खंडातील अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश जगात सर्वत्र केवळ अमेरिका किंवा संयुक्त संस्थाने (युनायटेड स्टेट्स Eng:United States) या नावाने ओळखला जातो.

अमेरिका हा लोकशाही प्रणाली मानणारा जगातील मोठ्या(क्षेत्रफळाने) देशांपैकी प्रमुख असून येथील प्रणाली 'अध्यक्षीय लोकशाही' आहे. अमेरिकेची राजधानी 'वॉशिंग्टन डी.सी.' येथे आहे. अमेरिकेत ५० राज्ये असून केंद्रीय स्तरावरील राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुखपद भूषवतो.भौगोलिकदृष्ट्या कॅनडा, मेक्सिको हे अमेरिकेचे शेजारी देश आहेत, तसेच अमेरिकेच्या सागरी सीमा रशिया, कॅनडा व बहामाज् ह्या देशांना लागून आहेत.

अमेरिका आर्थिक व लष्करीदृष्ट्या जगातील सर्वांत बलशाली देश आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा समिती या महत्त्वाच्या जागतिक समितीमध्ये या देशास स्थायी सदस्यत्व असून नकाराधिकार देखील प्राप्त आहे.

अमेरिकन डॉलर अमेरिकेचे चलन आहे.

अमेरिका
United States of America
अमेरिकेची संयुक्त संस्थाने
अमेरिकाचा ध्वज अमेरिकाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: E Pluribus Unum (पारंपरिक; अर्थ: विविधतेत एकता)
In God We Trust (अधिकृत, १९५६ पासून)
राष्ट्रगीत: स्टार स्पँगल्ड बॅनर
अमेरिकाचे स्थान
अमेरिकाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी वॉशिंग्टन डी.सी.
सर्वात मोठे शहर न्यूयॉर्क शहर
इतर प्रमुख भाषा इंग्लिश
सरकार संघीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख डॉनल्ड ट्रम्प (राष्ट्राध्यक्ष)
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (ब्रिटनपासून)
जुलै ४,१७७६ (घोषित)
सप्टेंबर ३, १७८३ (मान्यता) 
क्षेत्रफळ
 - एकूण ९६,३१,४२० किमी (३वा क्रमांक)
 - पाणी (%) ४.८७
लोकसंख्या
 - २०१० (अनुमान) ३०,९५,६६,००० (३वा क्रमांक)
 - घनता ३२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १२.२८ निखर्व अमेरिकन डॉलर (१वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,३९९ अमेरिकन डॉलर (३वा क्रमांक)
राष्ट्रीय चलन अमेरिकन डॉलर (USD)
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी -५ ते -१०/ -४ ते -१०
आय.एस.ओ. ३१६६-१ US
आंतरजाल प्रत्यय .us, .gov, .edu, .mil, .um
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +१

इतिहास

सुमारे १२,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी, आशिया खंडातून अलास्कामार्गे मूळचे लोक अमेरिका खंडात आले व संपूर्ण द. व उ. अमेरिकेत पसरले. त्यांना मूळचे अमेरिकन (Native American, American Indian किंवा Amerindians) असे म्हणतात. त्यांच्या अनेक भटक्या जमाती अस्तित्वात होत्या.

१९ नोव्हेंबर १४९३ रोजी ख्रिस्टोफर कोलंबस याला अमेरिकेचा शोध लागला. त्यानंतर युरोपियन लोक अमेरिकेत स्थलांतरित होऊ लागले. युरोपातून आलेल्या अनेक साथीच्या रोगांमुळेयुरोपियनांशी झालेल्या संघर्षांमध्ये जवळजवळ ९५ टक्के मूळचे अमेरिकन लोक मरण पावले. युरोपियन लोकांच्या मोठ्या प्रमाणातील स्थलांतरामुळे त्यांचे प्राबल्य कमी होऊन ती भूमी युरोपियन अमेरिकन लोकांच्या ताब्यात गेली व मूळ अमेरिकन लोकांना छोट्या आरक्षित क्षेत्रांमध्ये राहावे लागले.

४ जुलै, इ.स. १७७६ रोजी अमेरिकेला ब्रिटन पासून स्वातंत्र्य मिळाले.

अमेरिका ही प्रथमपासूनच अनेक राज्यांमध्ये विभागली होती. सुरुवातीला पूर्व किनाऱ्यावरील १३ राज्यांमधील अमेरिका हळूहळू पश्चिमेकडे प्रसरत गेली. पश्चिम भागावर हक्क सांगणारे, स्पेन, फ्रान्स, रशिया, मेक्सिको, चीनी स्थलांतरित व स्थानिक अमेरिकन यांचा सर्वांचा लष्करी सामर्थ्याने विरोध मोडून काढत एकामागून एक राज्ये अमेरिकेला जोडत गेली व जगातील एक समर्थ देश म्हणून उदयास आला.

याच काळात प्रचंड भूभागाच्या उपलब्धिने कच्च्या मालाचा मोठा पुरवठादार म्हणून अमेरिकेची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झाली. अन्न धान्ये, खनिज उत्पादने, जंगल उत्पादने, कापूस तंबाखू यांचा प्रमुख निर्यातदार म्हणून अमेरिकाची भरभराट होऊ लागली. एवढ्या मोठ्या भूभागावर कामासाठी माणसे कमी पडत म्हणून अफ्रिकेतून गुलाम आणण्याची पद्दत सुरू झाली. प्रत्येकाला काम व स्वता:ची जमीन या आशेने असाम्राज्यवादी युरोपीय देशातूनही मोठ्याप्रमाणावर अमेरिकेत स्थलांतर सुरू झाले. अश्या प्रकारे अमेरिका हा एक स्थलांतरितांचा देश बनला.

१८६० च्या दशकात अमेरिकेत अब्राहम लिंकनच्या सरकारने गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याचा निर्णय घेतला. याचा दक्षिणेकडीन शेतीप्रधान राज्यांनी कडवा विरोध केला व अमेरिकेपासून वेगळे असे स्वतंत्र राज्यांमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. शेतीप्रधान मालावर ब्रिटन व फ्रान्ससारखे देश गरजू असल्याने ते युद्धात आपल्याला मदत करतील असा अंदाज होता. अब्राहम लिंकनच्या सरकारने देशाची फाळणी वाचवण्यासाठी हा विरोध सशस्त्र मोडून काढण्याचे ठरवले. याचा परिणीती मानवी इतिहासातील सर्वाधिक रंक्तरंजीत गृहयुद्धात झाली. याला अमेरिकन यादवी युद्ध असे म्हणतात.अमेरिकन गृहयुद्धात प्रचंड जीवीत हानी झाली. हे युद्ध उत्तरेकडील राज्ये विरुद्ध दक्षिणेकडील राज्ये असे लढले गेले. रॉबर्ट लींच्या नेतृत्वाखाली दक्षिणेकडील राज्यांनी सामर्थ्यशाली उत्तरेला जबरदस्त आव्हान दिले. जवळपास १० लाख लोक या युद्धात कामी आले. उत्तरेने शेवटी या युद्धात नियंत्रण मिळवून हे बंड मोडून काढले. अब्राहम लिंकन यांची काही काळाने हत्या झाली. युद्धानंतर अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर सामाजिक बदल घडून आले. गुलामगीरी हळूहळू सर्व राज्यात संपवण्यात आली. युरोप प्रमाणेच अमेरिकेने औद्योगिकरण ,शास्त्रीय व सामाजिक सुधारणांचा अंगिकार करून झपाट्याने आर्थिक प्रगती केली.

प्रशासकीय संरचना

अमेरिकची राज्य संस्था ही फेडरेशन (इंग्लिश: federation) स्वरूपाची आहे. राज्यविभागणीची ही पद्धत भारतीय राज्यविभागणीपेक्षा मूलत: वेगळी आहे. भारतीय राज्ये ही स्वातंत्र्योत्तर बहुतांशी एकसंध देशाची, प्रशासकीय उद्देशाने, भाषावार रचना आखणी करून अस्तित्वात आली. ह्याउलट, अमेरिकन रा़ज्ये ही मूलत: वेगवेगळ्या वसाहती होत्या व ह्या वसाहतींनी एकत्र येऊन नवीन इंग्लंडहून स्वतंत्र होऊन सार्वभौम देश स्थापन केला. १७७६ सालच्या मूळ अमेरिकन स्वतंत्रेच्या वेळीस १३ वसाहतींनी राज्य म्हणून स्वघोषणा करून संयुक्त संस्थानांची स्थापना केली. इतर बहुतांश राज्ये ही १८व्या व १९व्या शतकात मूळ संघास येऊन मिळाली. अलास्का भूभाग हा रशियाकडून १८६७ साली खरेदी केला गेला व अनेक प्रशासकीय घडामोडींनंतर १९५९ साली ४९वे राज्य म्हणून संघात सामील झाला.

अमेरिका घटनात्मक प्रातिनिधिक लोकशाही देश आहे. अमेरिकन संघटना हे सर्वोच्च कायदाप्रमाण आहे. अमेरिकन प्रशासन संस्था 'फेडरल' (राष्ट्रीय) (Federal), राज्य व स्थानिक पातळ्यांमध्ये विभाजित आहे. राष्ट्रीय प्रशासनाच्या संसद, अध्यक्ष व न्याय ह्या तीन शाखा आहेत. संघटनेने अतिशय जाणीवपूर्वतेने ह्या तीन शाखांची रचना सत्तेचा समतोल राखण्यासाठी केली आहे.

राष्ट्राध्यक्ष

५० राज्यातील नागरिक संयुक्त संस्थानांचा (अमेरिका) अध्यक्ष निवडतात. निवडून येण्यासाठी उमेदवारास ५३८ पैकी २७० मते मिळवावी लागतात. ही ५३८ मते ५० राज्यात विभागित केलेली आहेत. प्रत्येक राज्यास त्या राज्याच्या अमेरिकन संसदेतील (काँग्रेस) प्रतिनिधींच्या संख्येइतकी मते आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येक राज्याचे २ प्रतिनिधी 'सिनेट' सभागृहामध्ये असतात व लोकसंख्येच्या प्रमाणानुसार काही प्रतिनिधी 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज' मध्ये असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यास (२ + 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज'मधील प्रतिनिधी) इतकी मते मिळतात. उदा. उत्तर डकोटास ३ (२+१) तर कॅलिफोर्नियास ५५ (२+५३) मते आहेत.

प्रत्येक राज्यातील सगळी मते एकाच उमेदवारास मिळतात (काही अपवाद वगळता). ही मते मिळविण्यासाठी उमेदवारास त्या राज्यात साधे बहुमत मिळवावे लागते.

राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल ४ वर्षे असून, राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती राष्ट्राध्यक्षपदावर दोन पूर्ण कार्यकालांहून अधिक वेळ राहू शकत नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून ते इ..स. २०१६ मधील मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापर्यंतच्या सर्व राष्ट्राध्यक्षांची माहिती देणारे ‘अमेरिकी राष्ट्रपती’ नावाचे पुस्तक अतुल कहाते यांनी लिहिले आहे.

काँग्रेस

अमेरिकन काँग्रेस ही अमेरिकन संयुक्त संस्थानातील (अमेरिका) केंद्रीय कायदेसंस्था आहे. अमेरिकन काँग्रेसमध्ये 'हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवज्' (कनिष्ठ सभागृह) व 'सिनेट' (वरिष्ठ सभागृह) ही दोन सभागृहे आहेत.

काँग्रेस ही अमेरिकन केंद्रीय स्तरावरील मुख्य घटनात्मक संस्था आहे. राष्ट्रीय स्तरावरील बहुतांश विषयांसंबंधीचे अधिकार काँग्रेसकडे असून त्यात राष्ट्रीय स्तरावरील कायदे संमत करणे, व्यापार, कर इत्यादींबाबत धोरणे निश्चित करणे, युध्द घोषणा करणे ह्यांचा समावेश होतो.

दोनही सभागृहांचे कार्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथील 'कॅपिटॉल' येथे आहे.

५० राज्ये

संयुक्त अमेरिका देश ५० राज्यांमध्ये विभागला गेला आहे. ह्यांपैकी अलास्काहवाई वगळता बाकी ४८ राज्ये एकसंध आहेत. डेलावेर हे संयुक्त अमेरिकेत (American Union) दाखल झालेले पहिले (७ डिसेंबर १७८७), तर हवाई हे ५०वे व शेवटचे (२१ ऑगस्ट १९५९) राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने अलास्का हे सर्वांत मोठे (६,६३६२६७ वर्ग मैल, १७,१७,८५४ वर्ग किमी) तर र्‍होड आयलंड हे सर्वांत लहान (१,५४५ वर्ग मैल, ४,००२ वर्ग किमी) राज्य आहे. कॅलिफोर्निया हे सर्वांत अधिक लोकसंख्येचे (३,६५,५३,२१५) तर वायोमिंग हे सर्वांत कमी लोकसंख्येचे (५,२२,८३०) राज्य आहे.

अर्थतंत्र

सध्या अमेरिका देश आर्थिक आघाडीवर सर्वांत बलाढ्य मानला जातो. देशाचा वार्षिक सकल उत्पन्नात पहिला क्रमांक आहे. अमेरिकेचा पहिला क्रमांक होण्यात या देशाची लोकसंख्या आकार व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती हे आहे. याच जोडीला अमेरिकेने शास्त्रीय सुधारणांचा अंगिकार करून विज्ञान व तंत्रज्ञानात स्वता:ला अग्रेसर ठेवले आहे. सध्या सर्वाधिक शोध अमेरिकेत लागतात. तसेच २० व्या शतकातील जवळपास सर्वच महत्त्वाचे शोध अमेरिकेत लागले. लोकसंख्येत अमेरिकेचा तिसरा क्रंमाक आहे, लोकसंख्येचा मोठा भाग हा मध्यमवर्गीय असून श्रीमंत व अतिश्रीमंत लोकांचीही संख्या लक्षणीय आहे. हा लोकसंख्येचा मोठा भाग अमेरिकेची मोठी क्रयशीलता दर्शावतात. अमेरिकेत तयार उत्पादनांना अमेरिकेतच मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होते. अमेरिकन अर्थव्यवस्था ही टोकाची भांडवलशाही (Extreme Capitalistic) अर्थव्यवस्था मानली जाते. या टोकाच्या भांडवलशाहीमुळे अमेरिकेत व्यापार अतिशय भरभराटीस आला, जास्तिजास्त नफा कमवण्याच्या दृष्टीने व्यापाराचे जागतिकीकरण करण्यात अमेरिकन अर्थव्यवस्था आघाडीवर होती. परंतु गेल्या काही वर्षात याच भांडवलशाहीचे दुष्परिणाम अमेरिकन अर्थव्यवस्थेवर दिसू लागले आहेत. २००८ मध्ये सबप्राईम संकटानंतर लेहमन ब्रदर्स या मोठ्या कंपनीने दिवाळखोरे जाहिर केले व त्यानंतर आलेल्या मंदिने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. कामगार कपातीचे नियम, सामाजिक सुरक्षितता, आरोग्य विम्याच्या बाबतीतील नियम हे भांडवलदारांच्या बाजूने असल्याने अमेरिकेतील सामान्य मध्यमवर्गात बेकारी व चिंतेचे वातावरण आहे.

वाहन उद्योग हा अमेरिकेतील सर्वांत मोठा उद्योग आहे. दर-माणशी ०.७५ वहाने हे अमेरिकेतील वाहनांचे प्रमाण आहे जे जगात सर्वाधिक आहे[१]. गाड्यांचा खप वाढण्यामागे या देशाचा प्रचंड आकार कारणीभूत आहे. राज्यांचे आकार व शहरांचे अंतर प्रचंड असल्याने युरोपसारखी सार्वजनीक दळणवळणाची साधने अमेरिकेत विकसित झाली नाहीत. अंतरे प्रचंड व हवामान थंड असल्याने विसाव्या शतकात गाड्यांचा खप प्रचंड वाढला जो आजतागायत आहे. फोर्ड, जनरल मोटोर्स हि अमेरिकन उत्पादने प्रसिद्ध आहेत. अमेरिकेत जर्मन व जापानी गाड्यादेखील चांगल्याच खपतात. वाहन उद्योगाखालोखाल युद्ध सामग्री हा अमेरिकेतील सर्वांत जास्त नफा मिळवून देणारा उद्योग आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्धाच्या काळात रशियाविरुद्ध सामरिक वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठ्या प्रमाणात संशोधन करून विविध प्रकारची अस्त्रे, शस्त्रे, क्षेपणास्त्रे, विमाने, युद्धनौका, पाणबुड्या यांच्यात शोध लावत वर्चस्व प्रस्थापित केले जे नजीकच्या काळात कोणाला मिळवता येईल असे दिसत नाही. शस्त्रांस्त्रांचा अमेरिका जगातील सर्वांत मोठा निर्यातदार आहे.

वस्तीविभागणी

Census-2000-Data-Top-US-Ancestries-by-County-1396x955
२००० साली अमेरिकेतील राहणार्‍या लोकांची मूळ देशानुसार विभागणी

अमेरिकेच्या जनगणना संस्थेच्या अंदाजानुसार अमेरिकेची लोकसंख्या ३०,६३,६०,००० इतकी आहे.[२] पैकी १ कोटी १२ लाख व्यक्ती अनधिकृतरीत्या तेथे राहतात.[३] २०१०च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,८७,४५,५३८ इतकी आहे. लोकसंख्येनुसार अमेरिका चीन व भारतानंतर तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. येथील लोकसंख्यावृद्धीदर ०.८९% आहे.[४] जन्मदर दरहजारी १४.१६ आहे.[५] २००७च्या आर्थिक वर्षात १०,५०,००० व्यक्तींना अमेरिकेत कायम वास्तव्य करण्यास मुभा देण्यात आली. गेल्या वीस वर्षांत येथे स्थलांतरित होणार्‍यांत मेक्सिकोच्या नागरिकांचे बहुसंख्यत्व आहे. १९९८पासून भारत, चीन व फिलिपाईन्स येथूनही मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे.[६] जगातील प्रगत देशांतील अमेरिका एकमेव असा देश आहे ज्याची लोकसंख्या पुढील काही दशकांत वाढण्याचा अंदाज आहे.[७]

क्रीडा

Shea Smith-edit1
फुटबॉलचा खेळाडू सहकार्‍याला पास देताना

१९ व्या शतकापासून बेसबॉल हा अमेरिकेचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. अमेरिकन फुटबॉल, बास्केटबॉल व बर्फावरील हॉकी हे अमेरिकेतील सर्वांत लोकप्रिय व्यावसायिक खेळ आहेत. सध्या कॉलेज फुटबॉल व कॉलेज बास्केटबॉल हे अमेरिकेतील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे,[८] बॉक्सिंग व घोड्यांची शर्यत हे एकेकाळी व्ययक्तीक खेळातील सर्वाधिक लोकप्रिय होते परंतु हळूहळू त्यांची जागा गोल्फ व गाड्यांच्या रेसिंगने घेतली आहे. युरोपातील फुटबॉल जो अमेरिकेत सॉकर म्हणून ओळखला जातो त्यामानाने कमी लोकप्रियता आहे व प्रामुख्याने युवा खेळांडूंमध्ये खेळला जातो. टेनिसची पण लोकप्रियता बरीच आहे.

अमेरिकेतील बऱ्याचशा खेळांचे मूळ युरोपीय खेळांमध्ये आहे. परंतु बास्केटबॉल, व्हॉलीबॉल स्केटबोर्डींग, स्नोबोर्डींग चिअरलीडींग हे अमेरिकेत जन्मलेले खेळ आहेत. सर्फिंग हा खेळ अमेरिकेत युरोपीय लोक येण्याआगोदर अस्तित्वात होता. अमेरिकेत आजवर सर्वांत जास्त आठ ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या गेल्या आहेत व अमेरिकेनेच सर्वांत जास्त आजवर कोणत्याही देशापेक्षा जास्त पदके मिळवली आहेत.[९] तर हिवाळी ऑलिंपिक मध्ये २१६ पदके मिळवली आहेत व सद्यस्थितीत दुसऱ्या क्रमांकावर आहे..[१०]

पर्यटन स्थळे

नायगारा धबधबे (नायगारा फॉल्स)

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ दरडोई वहाने देशाप्रमाणे
  2. ^ "U.S. POPClock Projection". U.S. Census Bureau].
  3. ^ Camarota, Steven A., and Karen Jensenius (July 2008). "Homeward Bound: Recent Immigration Enforcement and the Decline in the Illegal Alien Population". Center for Immigration Studies. 2008-08-06 रोजी पाहिले.
  4. ^ "European Union". The World Factbook. CIA. 2007-05-31. 2007-06-15 रोजी पाहिले.
  5. ^ "Rank Order—Birth Rate". The World Factbook. CIA. 2007-05-31. 2007-06-13 रोजी पाहिले.
  6. ^ "Persons Obtaining Legal Permanent Resident Status by Region and Country of Birth: Fiscal Years 1998 to 2007 (Table 3)". U.S. Dept. of Homeland Security. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक १५ जुलै २०१४ रोजी मिळविली). 2008-09-06 रोजी पाहिले.
  7. ^ "Executive Summary: A Population Perspective of the United States". Population Resource Center. May 2000. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक 2007-06-04 रोजी मिळविली). 2007-12-20 रोजी पाहिले.
  8. ^ Krane, David K. (2002-10-30). "Professional Football Widens Its Lead Over Baseball as Nation's Favorite Sport". Harris Interactive. 2007-09-14 रोजी पाहिले. Maccambridge, Michael (2004). America's Game: The Epic Story of How Pro Football Captured a Nation. New York: Random House. ISBN 0-375-50454-0.
  9. ^ "All-Time Medal Standings, 1896–2004". Information Please. 2007-06-14 रोजी पाहिले. "Distribution of Medals—2008 Summer Games". Fact Monster. 2008-09-02 रोजी पाहिले.
  10. ^ "All-Time Medal Standings, 1924–2006". Information Please. 2007-06-14 रोजी पाहिले. Norway is first; the Soviet Union is third, and would be second if its medal count was combined with Russia's.
अमेरिकन

अमेरिकन (इंग्लिश: American) म्हणजे अमेरिका देशाचे रहिवाशी.

अमेरिका खंडाच्या रहिवाशींसाठी देखील हा शब्द/विशेषनाम वापरतात.

अमेरिकन क्रांती

१८व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उत्तर अमेरिकेतिल ब्रिटिश वसाहतींनी केलेल्या उठावास अमेरिकन क्रांती म्हणून संबोधले जाते.

अमेरिकन डॉलर

अमेरिकन डॉलर (इंग्लिश: United States dollar; चिन्ह: $) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने (किंवा अमेरिकेची संयुक्त संस्थाने) या राष्ट्राचे अधिकृत चलन आहे. तसेच भारतासह इतर अनेक राष्ट्रांत ते राखीव साठा चलन म्हणूनदेखील वापरले जाते. या चलनाच्या वितरणाचे नियंत्रण अमेरिकेच्या केंद्रीय रिझर्व बँक या संस्थेद्वारा केले जाते. या चलनासाठी $ हे चिन्ह सामान्यतः प्रचलित आहे. तसेच, ISO 4217 प्रणालीनुसार अमेरिकन डॉलरचे चिन्ह USD असे असून, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार US$ असे आहे.

१९९५ साली ३८० अब्ज डॉलर चलनात होते, व त्यापैकी दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते. एप्रिल २००४ च्या अंदाजानुसार, सुमारे ७०० अब्ज इतके डॉलर चलनात होते, व तेव्हासुद्धा त्यापैकी सुमारे अर्धे ते दोन-तृतीयांश हे अमेरिकेबाहेर होते .

अमेरिका हा डॉलर या नावाचे चलन वापरणार्‍या अनेक देशांपैकी एक आहे. (इतर अनेक देशांची "डॉलर" या नावाची स्वतंत्र चलने आहेत. उदा. कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, सिंगापुर, जमैका इ.) तसेच, अनेक राष्ट्रांमध्ये अमेरिकन डॉलर हे अधिकृत चलन आहे किंवा व्यवहारासाठी वैध चलन म्हणून मान्यताप्राप्त आहे.

अमेरिका फुटबॉल संघ

अमेरिका फुटबॉल संघ (इंग्लिश: United States men's national soccer team) हा अमेरिका देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. अमेरिका आजवर १२ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

इंग्लिश भाषा

इंग्लंड देशात राहणार्‍या लोकांना इंग्रज म्हणतात, आणि त्यांच्या भाषेला इंग्रजी. संस्कृतमध्ये इंग्रजीला आंग्लभाषा म्हणत असल्याने मराठीसह अनेक भारतीय भाषांमध्ये इंग्रजी भाषा ही आंग्लभाषा म्हणूनही ओळखली जाते. इंग्रजी भाषा (इंग्लिश) ही पश्चिम जर्मेनिक भाषाकुळातील एक भाषा आहे. ही भाषा अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड ह्या देशांमध्ये प्रमुख भाषा आहे. ( अमेरिकन संयुक्त संस्थानांमध्ये इंग्लिश प्रमुख भाषा असली तरी तिला राज्यघटना अथवा इतर कोणत्याही कायद्याद्वारे अधिकृत भाषेचा दर्जा नाही. कॅनडामध्ये इंग्लिश व फ्रेंच ह्या दोन अधिकृत भाषा आहेत.) कित्येक देशांची दुसरी भाषा व शासकीय भाषा आहे. जगभरात सर्वांत जास्त शिकवल्या जाणार्‍या व समजल्या जाणार्‍या भाषांत इंग्लिश भाषेची गणना होते.

३५ कोटी लोकांची इंग्रजी ही मातॄभाषा आहे तर जवळजवळ १५ कोटी लोकांची दुसरी भाषा. जगभरात सुमारे १०० कोटी लोक या भाषेत साक्षर आहेत. इंग्रजी ही विज्ञान-तंत्रज्ञान, व्यापार, इंटरनेटसह अनेक विषयात अत्यंत समॄद्ध आहे.

इंग्लिश ही पश्चिम-जर्मेनिक भाषा आहे. अँग्लो-सॅक्सन कुळातील जुन्या इंग्लिश भाषेपासून इंग्लिश भाषेची उत्पत्ती झाली आहे. इंग्लिशची मुळे जर्मेनिक भाषांत आहे व व्याकरण जुन्या इंग्लिशचे आहे. ब्रिटिश साम्राज्यातून पसरलेल्या इंग्लिश भाषेला आंतरराष्ट्रीय महत्त्व अमेरिकेची संयुक्त संस्थाने महासत्ता झाल्यामुळे आले. जागतीकरणामुळे इंग्लिशचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे. संपर्क, रोजगार, शिक्षण इत्यादींकरता इंग्लिशचे किमान ज्ञान असणे गरजेचे आहे. भारत हा इंग्लिश ही दुसरी भाषा असणारा महत्त्वाचा देश आहे व भारतीय इंग्लिश ही इंग्लिशची एक महत्वाची बोलीभाषा म्हणून ओळखली जाते.

ऑलिंपिक

ऑलिंपिक खेळांचा इतिहास (ग्रीसमधील) ३००० वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक खेळांची सुरूवात प्रथम १८९६ मधे अथेन्स येथे झाली. ग्रीस, जर्मनी, फ़्रान्स, इंग्लंड ,भारत सह १४ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सामिल झाले होते. ६ एप्रिल १८९६ रोजी अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली याने पहिले ऑलिंपिक पदक जिंकले.

“ओलंपिक डे” इस दिन को सर्वप्रथम 1948 मे परिचित करवाया ...

स्थापना: 23 जून 1894

जानकारी: विवरण

अध्यक्ष: थॉमस बेच

मुख्यालय: लौसन, स्वीज़लेंड

ऑलिंपिक खेळात अमेरिका

अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाने आजवर १९८०चा अपवाद वगळता सर्व ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. तसेच आजवर अमेरिकेने ८ वेळा (४ उन्हाळी व ४ हिवाळी) ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले आहे.

जार्व्हिस आयलंड

जार्व्हिस आयलंड हे प्रशांत महासागरातील एक प्रवाळी बेट आहे. हे बेट हवाई आणि कूक द्वीपसमूहाच्या साधारण मध्यावर आहे. १९३५पासून हे अमेरिकेच्या ताब्यात आहे. जार्व्हिस आयलंड अभयारण्य संपूर्ण बेट व्यापते. येथे मनुष्यवस्ती नाही. १९३० ते १९९०च्या दशकांदरम्यान येथे रानटी मांजरांची वस्ती होती.

जेम्स रेनवॉटर

जेम्स रेनवॉटर (जन्म: ९ डिसेंबर, इ.स. १९१७ कौन्सिल, अमेरिकेची संयुक्त संस्थाने - मृत्यू: ३१ मार्च, इ.स. १९८६ योन्कर्स, अमेरिकेची संयुक्त संस्थाने) हे शास्त्रज्ञ आहेत. यांना इ.स. १९७५ साली त्यांच्या भौतिकशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

जॉन्स्टन एटॉल

जॉन्स्टन एटॉल किंवा कालामा एटॉल हे प्रशांत महासागरातील चार प्रवाळी बेटांचा समूह आहे. हा द्वीपसमूह होनोलुलुच्या नैऋत्येस १,३९० किमीवर असून १८५६पासून हा प्रदेश अमेरिकेच्या ताब्यात आहे. १९२६मध्ये स्थापन केलेले जॉन्स्टन एटॉल अभयारण्य या द्वीपसमूहातील सगळ्या बेटांभोवती आहे. येथे अमेरिकेचा सैनिकी तळ आहे परंतु इतर मनुष्यवस्ती नाही.

येथे अनेक प्रकारचे मासे, कासवे, सील, पक्षी व इतर प्राणी आढळतात.

नव्हासा द्वीप

नव्हासा द्वीप (इंग्लिश: Navassa Island) हे कॅरिबियन मधील अमेरिकेची संयुक्त संस्थाने

ह्या देशाच्या अधिपत्याखालील एक बेट आहे. ह्या बेटावर हैती देशाने १८०१ सालापासुन आपला संवैधानिक मालकी हक्क असल्याचा दावा केला आहे. ह्या बेटावर लोकवस्ती नाही.

नासा

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन, लघुरूप नासा, (इंग्लिश: National Aeronautics and Space Administration, NASA ;)ही अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे.

बेकर बेट

बेकर आयलंड हे प्रशांत महासागरातील एक बेट आहे. अमेरिकेने १८५७ साली या बेटाचा ताबा घेतला.

येथे मनुष्यवस्ती नाही. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बांधलेली आणि आता वापरात नसलेली एक धावपट्टी या बेटावर आहे.

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक

भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (स्वीडिश:नोबेलप्राइसेट इ फिसिक) हे स्वीडनमधील कारोलिन्स्का इन्स्टिट्युटकडून दरवर्षी प्रदान करण्यात येणारे पारितोषिक आहे. आल्फ्रेड नोबेलने आपल्या मृत्युपत्रात लिहिल्याप्रमाणे हे पारितोषिक १९०१पासून दरवर्षी दिले जाते. या शाखेतील पहिले पारितोषिक विल्हेल्म रॉन्टजेनला त्याच्या क्ष-किरणांचा शोध लावून मानवजातीची असाधारण सेवा केल्याबद्दल देण्यात आले.

हे पारितोषिक इतर चार शाखांमधील पारितोषिकांबरोबर देण्यात येते - रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता. नोबेल फाउंडेशनद्वारे नियमन केली जाणारी ही पारितोषिके सहसा जगातील सर्वोच्च सन्मान समजली जातात. आल्फ्रेड नोबेल च्या मृत्युदिवशी (डिसेंबर १०) हे पारितोषिक स्वीडनच्या राजाच्या हस्ते प्रदान केले जाते. त्यावेळी स्वीकारणाऱ्यास एक पदक, प्रमाणपत्र व बक्षिसरकमेची हमी दिली जाते.

रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: डेमोक्रॅटिक पक्ष). हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा जी.ओ.पी. ह्या नावाने देखील ओळखला जातो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भूमिकांमुळे रिपब्लिकन पक्ष अमेरिकन राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो.

वेक द्वीप

वेक आयलंड उत्तर प्रशांत महासागरातील छोटे बेट आहे. हे बेट अमेरिकेच्या आधिपत्याखाली आहे.

हाउलँड आयलंड

हाउलँड आयलंड हे प्रशांत महासागरातील एक प्रवाळी बेट आहे. हे होनोलुलुच्या नैऋत्येस ३,१०० किमीवर असून १८५६पासून हे अमेरिकेच्या ताब्यात आहे. हाउलँड आयलंड अभयारण्य संपूर्ण बेट व्यापते. येथे मनुष्यवस्ती नाही.

हॉलिवूड

अमेरिकेतील चित्रपटउद्योग हॉलिवुड या नावाने ओळखला जातो.

अमेरिकेत चित्रपटांची निर्मिती बव्हंशी कॅलिफोर्नियातील लॉस एन्जल्सजवळील हॉलिवुड या गावात वा त्याच्या आसपास होते. त्यामुळे अमेरिकन चित्रपट उद्योगाला हॉलिवुड हे नाव प्रचलित झाले आहे.

हे सुद्धा पहा - बॉलिवुड कॉलिवुड टॉलिवुड मॉलिवुड

उत्तर अमेरिका
मध्य अमेरिका
कॅरिबियन
दक्षिण अमेरिका

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.